प्रवास...१

'प्रवास' शब्दाला थोडं फिरवलं की एक आदेशवजा शब्द तयार होतो...प्रसवा. प्रवासाच्या सृजनक्षमतेचा विचार केला गेला असावा आंणी म्हणूनच 'बारा गांवचे पाणी पिलेला' सारखे शब्दप्रयोग रूढ झाले असावेत. अनोळखी प्रदेशातल्या अनोळखी लोकांचा संपर्क बहुश्रुतता नक्कीच देतो. म्हणून मी म्हणायचो 'फिराल तर तराल'. कुटुंबाच्या चार भिंतीत राहिलेली व्यक्ती बहुधा विहिरीतल्या पाण्यासारखी राहते. तिला गतिमानता असेलच असे सांगता येत नाही. आकाशातली चांदणी जोपर्यंत एकाच जागेवर आपल्या कक्षेत असते, तिचा प्रकाश मिणमिणता दिसतो.

सॉक्रेटिस आणि त्याची प्रश्नांतून शिक्षणपद्धत

सॉक्रेटिस आणि त्याची प्रश्नांतून शिक्षणपद्धत
[खालील लेख हा भाषांतरित आहे.]
सॉक्रेटिस हा एक थोर शिक्षक गणला जातो. त्याची शिक्षणपद्धत ही हटके होती व तो प्रश्न विचारत-विचारत शिकवे व लोकांकडून उत्तरे मिळवे. "ex duco" चा अर्थ "lead out" होतो जो "education" ह्या शब्दाचा गाभा आहे. उत्तरे "मिळवणे" हे "lead out" किंवा त्यातूनच मार्ग दाखवणे अशा अर्थाने पाहिले तर अशा शिक्षणपद्धतीचे महत्त्व पटते. 

कीर्तनाचे रंगी... ??

एका रविवारची दुपार... टी. व्ही. वर देव आनंदचा ‘तेरे घर के सामने’ पाहत बसले होते. पुढ्यात टी-पॉयवर टी. व्ही., डीश टी. व्ही., म्युझिक सिस्टीम आणि होम-थिएटरचा प्रत्येकी एक रीमोट, एक ए. सी. चा रीमोट आणि दोन सेल फोन असा सगळा संसार मांडलेला होता. इतक्यात दोनपैकी एका सेल फोनचा ‘दिल का भॅंवर’ पुकार करायला लागला. बघितलं तर बहिणीचा फोन होता. रविवारची दुपार आणि सख्ख्या बहिणीचा फोन म्हणजे किमान अर्धा तास तरी गप्पा ह्या ठरलेल्या! तोपर्यंत टी. व्ही. म्यूट केलेला बरा असा विचार करून पुढे झाले तर त्या ढीगभर रीमोटस मधून नक्की कुठला पटकन उचलायचा तेच क्षणभर कळेना.