प्रत्येक भाविकाला व निसर्गप्रेमीला सामावून घेणारं ठिकाण म्हणजे 'घांगरिया'. लक्ष्मणगंगेच्या काठी वसलेलं गाव पण गाव कुठे दिसतच नाही. सगळीकडे हॉटेल्स, धर्मशाळा व गरजेच सामान विकणारी किंवा भाड्याने देणारी दुकानेच दुकाने. जिकडे पाहावं तिकडे शीखच शीख, आमच्यासारखे निसर्गप्रेमी तुरळकच. लक्ष्मणगंगेच्या डाव्या बाजूला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स तर उजवीकडे हेमकुंड साहिब. दुसऱ्यादिवशी सकाळी सहा वाजताच जेवणाचे डबे भरून निघालो. घांगरिया ते व्हॅली हा तीन किमीचा ट्रेक आहे. प्रवेश व क्यामेराचे पैसे भरून निघालो. पुढे आपल्याला सोबत करते पुष्पावती नदी.