नएक क्षण............... आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला स्वतःविषयी विचार करायला वेळ नाही तर आपण रोज जे असंख्य क्षण जगतो त्याविषयी काय बोलायचे..?
पण नियती.... नियती अस होऊन देत नाही, ज्या मजेत आपण जीवन जगत असतो तिथे कुठेतरी ति अगदी दबक्या पावलांनी येते आणि जाणीव करून देते... की तू जे आयुष्य जगतो आहेस ते किती क्षणभंगुर आहे ते.
मी सुधा जीवनात फार बिनधास्त होते, अगदी काही प्रमाणात येवढी की जीवनातले एकमेव सत्य "मृत्यू", यालासुद्धा अगदी सहज घेत होते. असे म्हणतात की ज्याने हे सत्य जवळून पाहिले त्याची जीवनाची व्याख्याच बदलते. असच काही माझ्या बाबतीत झालं.