पोहे

वाढणी
२ जण

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • जाड पोहे अडीच वाट्या, चिरलेला कांदा १ वाटी
  • बटाट्याचे त्रिकोणी पातळ काप अर्धी वाटी
  • भाजलेले दाणे अर्धी वाटी, मटार अर्धी वाटी,
  • चिरलेली कोथिंबीर व ओला नारळ पाउण वाटी
  • साखर, मीठ, तेल अर्धी वाटी, अर्धा चमचा लाल तिखट
  • मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या १-२

मार्गदर्शन

`नावा'त काय आहे?

राजधानीतील महाराष्ट्र सदनातल्या दालनात नारायण राणे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होते. त्यांना आज त्यांचे हे नेहमीचे दालन मिळण्यास उशीर झाल्याने ते वैतागले होते. त्यातून तिथल्या कर्मचाऱ्यानं 'साहेब, परवाच तर येऊन गेलात ना? मग आत्ता परत कसे? काम झालं नाही का? ' असा उद्धट प्रश्न विचारल्यानं राणे आणखी अस्वस्थ झाले होते. गेल्या सहा महिन्यांसाठी आणि पुढच्या सहा महिन्यांसाठी हे दालन बुकच करून ठेवलं असतं, तर बरं झालं असतं, असा विचार त्यांच्या डोक्यात चमकून गेला. 'मुख्यमंत्री झाल्यावर दाखवेन तुला बेटा! ' असं म्हणून मनातल्या मनात ते चरफडलेही; पण चेहऱ्यावर तो संताप त्यांनी आणू दिला नाही. कुठल्या तरी 24 तासांच्या न्यूज चॅनेलचे कॅमेराधारी त्यांचा प्रत्येक 'मूड' टिपण्यात मग्न होते.

`रामदास'बोध

सं त अंबुमणी रामदास महाराजांचा वर्ग सुरू होता. स्वतः रामदासबुवा व्यसनमुक्तीवर प्रवचन देत होते. समोर साक्षात "भीष्माचार्य' अमिताभ, "युधिष्ठिर' आमिर, "दुर्योधन' सलमान, संजूबाबा, यांसारखे ज्ञानी, अभ्यासू, विचारवंत श्रोते बसले होते. बिपाशा, करीना, दीपिका, प्रियांका यांसारख्या भक्तिणींचा मेळाही जमला होता. सध्या फारशा चर्चेत नसलेल्या मनीषा, राणी, प्रीतीसारख्या भक्तिणी एका बाजूला स्वेटर विणण्याचं सामान आणि तूप व वाती घेऊन बसल्या होत्या.

मोठ्या बाजारातील अनुभव

सध्या मॉल्स चा जमाना आहे. सर्व लोक मोठमोठ्या मॉल्स मध्ये जाउन खरेदी करतात. मी पण तेच करते. पण मला अशाच एके ठिकाणी आलेला अनुभव इथे नमूद करावासा वाटतो जेणेकरून ग्राहकांची फसवणूक होणार नाही. आपण अशा मॉल्स मधून ऑफर्स बघून खरेदी सुद्धा बरीच करतो. एकदा मी आणि माझा नवरा अशाच एका मोठ्या बाजारात गेलो होतो. तिथे आम्ही हव्या त्या वस्तू घेतल्या आणि मग बिलिंग काउंटर ला थांबलो. अशा ठिकाणी  बिल बघितल्यावर एकदा मला शंका आली की आपल्याला इतके जास्त्ती बिल कसे आले? म्हणून बिल नीट तपासून  बघितल्यावर माझ्या लक्शात आले की काही वस्तुंच्या बाबतित लिहीले होते तितके डिस्काउंट दिले गेले नव्हते. पण बिलिंग च्या रान्गेत इतकी गर्दी होती की मी हे बिल बाहेर येउन बघितले होते. मग  पुन्हा आत जाउन संबन्धित व्यक्तिंच्या निदर्शनास आणून देणे आणि मग ते पैसे घेउन येणे ह्यात बराच वेळ गेला. मनस्ताप ही बराच झाला. असाच अनुभव त्याच ठिकाणी पुन्हा  २/३ दा आला. कधी घेतलेल्या वस्तुचे डिस्काउंट न मिळणे तर कधी घेतलेली वस्तू ६० ग्राम ची असताना ८० ग्राम चे वजन आणि चुकिची किम्मत बिल वर छापून येणे. तर सर्व ग्राहकान्ना माझी अशी विनंती आहे की बिल चेक करून घेणे. आमच्यासारखी फसवणूक व मनस्ताप इतर लोकान्ना होवू नये ह्यासाठी हा लेखनप्रपंच. 

राहून गे`लेले'....

एक वाईट बातमी आहे.
अरूण गेला.
मागं मी अरूणनं सांगितलेली, त्या लेलेंची- सिद्धिविनायकाच्या शेजा-याची - गोष्ट तुम्हाला सांगितली, त्या लेल्यांना भेटायचं आमचं ठरलं होतं.
नेहेमी आम्ही भेटलो, की त्या लेलेंची आठवण यायची, आणि, कधीतरी नक्की त्यांच्याकडे जाऊ असं अरुण म्हणायचा...
गेल्या आठवड्यात, तो अचानक, अगदी अकल्पितपणे, निघून गेला...
गुजरातेतल्या गावी वृद्ध आईला भेटायला गेला होता, तिथेच त्याला हार्ट ऎटॆक आला...
... त्या दिवशी सकाळीसकाळी, माझ्या एका सहकाऱ्याचा फोन आला, आणि माझ्या मनात कसलीतरी पाल चुकचुकली... आमच्या माहितीतल्या कुणाकडेही, काहीही झालं, की आम्हा सर्वांना हा हळवा सहकारी ते जाणीवपूर्वक कळवतो...
अगदी सकाळी त्याचा फोन म्हणजे काहीतरी गडबड असणार, असा विचार करतच मी हॆलो म्हटलं, आणि त्यानं ही बातमी सांगितली.
मी क्षणभरासाठी अक्षरश: बधीर झालो.
अरूण राहायचा त्या सोसायटीतल्या त्याच्या शेजाऱ्याला फोन केला.
बातमी खरी होती.
.... आम्हा पत्रकारांचं खाजगी जग खूप छोटं आहे.
गेल्या वर्ष-दोन वर्षांत मुंबईतल्या आमच्या या जगानं असे खूप आघात सोसले.
अरूणच्या जाण्याच्या आणखी एका आघातामुळे त्या दिवशी आमचं छोटंसं जग पार कोलमडून गेलं...
त्या दिवशी प्रत्येकजण अरूणच्या आठवणींनी हळहळत होता.
माझी व्यथा वेगळी होती...
अनेक आनंदाचे, गंमतीचे क्षण आम्ही शेअर केले होते.
तो माझ्या क्षेत्रातला, अनुभवी, ज्येष्ठ सहकारी होताच, आणि कधीकाळचा माझा सख्खा शेजारीही होता.
माणुसकीला हात घालणा-या अनेक उदाहरणांचा खजिना अरूणच्या अनुभवांच्या पोतडीत होता...
कितीतरी लेले त्याला भेटले होते...
कितीतरी लेल्यांना त्यानं प्रोत्साहन दिलं होतं...
... त्या दिवशी सिद्धिविनायकाच्या शेजाऱ्याची, त्या लेलेंची हकीकत मी तुम्हाला सांगितली, त्यानंतर पुन्हा आम्ही लेलेंना भेटायचं पक्कं ठरवण्यासाठी एकमेकांशी बोललो.
... आणि एका नव्या ‘लेले’ची माहिती मिळाली.
*** *** ***
मुंबईतल्या टाटा हॉस्पिटलच्या आसपास दिवसादेखील अकल्पिताची एक भयाण सावली वावरत असल्याचा भास होतो. अनेक हतबल जीव, उपचाराच्या आशेनं आजूबाजूच्या कट्ट्यांवर, फूटपाथवर आसरा घेऊन दिवस ढकलत असतात... कितीकांनां मुंबईची ओळखदेखील नसते... कुठल्याश्या कोपऱ्यातल्या आपल्या एवढ्याश्या खेडेगावातून, गाठीची सारी पुंजी कनवटीला बांधून कुणीतरी आशेनं एखादा मरणासन्न जीव घेऊन इथे येतो, आणि रुग्णाबरोबरच, स्वत:ही इथल्या जगण्यामरण्याच्या लढाईत उतरतो...
कधीतरी कनवटीची पुंजी रिती होते, आणि त्या रुग्णाला वाचवण्याच्या लढाईबरोबरच, जगण्याचीही लढाई सुरू होते...
कधी कल्पनेतही विचार केला नसेल, अशी, जगासमोर मदतीसाठी हात पसरायचीही वेळ येऊन ठेपते, आणि जगणंही केविलवाणं होतं...
*** *** ***
.... घाटकोपर किंवा तिथल्याच आसपासच्या एका गार्डनमध्ये एका संध्याकाळी फेरफटका मारणा-या दोनचार मित्रांसमोर असाच एक दीनवाणा, हतबल हात पसरला गेला.
‘माझी बायको कॆन्सरनं आजारी आहे... मला मदत करा’ कसंबसं एवढंच वाक्य उच्चारताना त्या माणसाच्या दु:खानं करपलेल्या चेहे-यावरच्या दीनवाण्या रेषा आणखीनच गडद झाल्या आणि हे मित्र चालताचालता थबकले.
... मुंबईत एखादा माणूस पैसे उकळण्यासाठी प्रसंगी मरणाच्या कहाण्याही रंगवितो, ह्याचा अनुभव असलेल्या त्या मित्रांनी ह्या केविलवाण्या देहाकडे अगोदर तशाच नजरेनं पाहिलं...
त्याचा चेहेरा खोटं बोलत नाही, हे त्यांना पटलं.
पण बागेत फिरायला येताना एखाद्याजवळ असतील, तेव्हढेच पैसे त्यांच्याकडे होते.
तरीही सगळ्यांनी आपले खिसे त्याच्या पसरलेल्या ओंजळीत रिकामे केले.
पण ते अपुरं दान त्यांना समाधान देऊ शकलं नाही.
बायकोच्या आजाराच्या चिंतेनं खंगलेल्या त्या माणसाला त्यांनी हॊस्पिटलाचा पत्ता, वॊर्ड नंबर विचारला, आणि दुस-याच दिवशी हे मित्रमंडळ हॊस्पिटलमध्ये पोहोचले...
तो खंगलेला, श्रमलेला दीनवाणा माणूस आणकीनच थकल्या शरीरानं रुग्णशय्येवरल्या बायकोच्या पायाशी बसलेलाच होता...
त्याच्या हाती नोटांचं एक बंडल सोपवून, त्याच्या पाठीवर थोपटून, काहीही न बोलता हे मित्र तिथून बाहेर पडले.
... पण तो केविलवाणा माणूस आणि त्याची मरणपंथाला लागलेली बायको त्यांच्या नजरेसमोरून हलत नव्हती.
दुस-या दिवशी कामधंद्याला निघताना ट्रेनमध्ये पत्ते खेळताखेळता त्यांच्यतल्याच एकानं ग्रूपमधल्या आपल्या इतर दोस्तांना ही हकीकत सांगितली,
आणि पत्ते खेळणारे हात थबकले....
पुढच्या क्षणाला ते हात खिशात गेले होते...
माणुसकीच्या एका झऱ्याचा उगम झाला होता...
पुन्हा त्या संध्याकाळी हॊस्पिटलमध्ये जाऊन ते जमलेले पैसे त्यांनी त्या माणसाच्या स्वाधीन केले...
एका आगळ्या समाधानाचा अनुभव त्या दिवशी सगळ्या ग्रुपनं घेतला होता...
दुसऱ्या दिवशी तो ग्रूप ट्रेनमधून प्रवास करताना पत्ते खेळत नव्हता...
... बऱ्याच चर्चेनंतर, अशा गरजूंसाठी आपल्या खिशाचा एक कोपरा राखून ठेवायचा निर्णय त्या तसाभराच्या प्रवासात झाला होता.
... आता ह्या ग्रूपमध्ये आणखी कितीतरी हातांची भर पडलीये.
... एक ट्रस्ट उभा राहिलाय.
... पैशाअभावी उपचार घेऊ न शकणाऱ्या रुग्णांसाठी हे हात सैल होतात...
आजवर कितीतरी रुग्णांना ह्या ट्र्स्टनं जीवदान दिलंय...
ट्रेनमधला, पत्ते कुटणारा, एक गट, एका अपघातानं घडलेल्या साक्षात्कारातून, माणुसकीचं आगळं रूप घेऊन नव्या जाणीवांनी ‘जबाबदार’ झालाय.
*** *** ***
लेलेंच्या निमित्तानं गप्पा मारतामारता त्या दिवशी अरूणकडून मिळालेल्या या नव्या माहितीमुळे, त्या ग्रुपला भेटायची माझी इच्छा तीव्र झाली आहे.
पण आता त्यांना भेटायला घेऊन जायला अरूण सोबत असणार नाही.
... ‘कोणत्याही मदतीसाठी सदैव तत्पर’ अशी ख्याती असलेले ज्येष्ठ पत्रकार, ‘हिंदू’ या दैनिकाचे महाराष्ट्र ब्यूरोचे उपप्रमुख अरूण भट यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले’ अशी बातमी गेल्या आठवड्यात मुंबईतल्या सगळ्या मराठी वर्तमानपत्रांत आपण वाचली असेल...
... लेलेंच्या निमितानं त्याच अरूणशी मी तुमची ओळख करून दिली होती.

पहिला पाऊस कोकणातला

यंदा पावसाने मुंबईत मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर वेळेवर हजेरी लावली. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणाऱ्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच. अशा या पाऊसवेड्यांमध्ये हिरव्या ऋतुत मनसोक्त भटकंती करणाऱ्या पर्यटकांचाही समावेश होतो आणि भिजून चिंब करणाऱ्या ठिकाणाला भेटी द्यायच्या याद्या तयार होऊ लागतात.

अशा या वेड लावणाऱ्या पावसाचे रूप प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असते. घाटमाथ्यावर कमी-अधिक तर कोकणात धुवांधार. म्हणुनच दरवर्षी पावसाळी भटकंतीसाठी जाणारे आम्ही पहिला पाऊस अनुभवण्यासाठी कोकणात जायचे ठरविले.

मलेशियातील माझे खाद्यजीवन

मुंबईहून रात्री निघालेले विमान कोलालंपूरला सकाळी सात वाजता उतरले आणि माझ्या भारतीय मनाला पहिली आठवण झाली ती शरीर आणि मन तरतरीत करणाऱ्या फर्मास चहाची! विमानतळावरील उपाहारगृहात बीओएच टी अशी पाटी दिसल्यावर प्रत्येकी ५रिंगेट (अंदाजे ६२रू, )खर्च करून मोठ्ठा ग्लासभर चहा घेतला. एकघोट घेतल्यावरच मळमळते की काय असे वाटू लागले. कितीही साखर घातली तरी पचकट चव जाईना! शेवटी तो चहा तसाच टाकला. पैसे गेल्याचे दुःख वेगळेच! त्यामुळे कनेक्टींग फ्लाईटमध्ये ग्वावा ज्यूस घेण्यास मन धजावेना. परिणाम दुपारी तीन वाजेपर्यंत उपाशी. ओळखपाळख होऊन विद्यापीठाच्या कॅंटिनमध्ये पाऊल टाकले ते मन प्रसन्न होऊनच. कॅंटीन भव्य आणि वातानुकुलीत होते. बुफेमुळे आणि वेटरच्या व्हेजी, नानव्हेजीच्या गोंधळात काहीच न कळल्याने पानात पकोडा घेतला तो मनसोक्त खाल्ल्यावर कळले की तो चिकनचा होता! पूर्ण शाकाहारी असलेल्य्या माझ्या खाद्यजीवनाला बसलेला तो पहिला धक्का. शेवटी'इदं न मम"म्हणून सोडून दिले. इथे हॉटेलातही प्रत्येक वेळेस सांगावेच लागते 'नो चिकन, नो फिश, नो पोर्क, नो बीफ'एवढे सांगूनही व्हेजी फ्राईड राईस येतो त्यात २-४ कोलंबी डोकावतातच, शांतपणे काढून टाकणे हाच एक उपाय! मलेशियात सी फूड खूप चांगले मिळते असे म्हणतात. "मी गोरेंग"(फ्राईड नूडल्स), "नासी गोरेंग"(फ्राईड राईस), "नासी लेमा"(स्पे. राईस), "नासी आयाम"(चिकन राईस), रोटी चनई, सारडीन करी हे पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. के. एफ. सी. सेंटर्स तर नुसती माण्सांनी भरून वाहत असतात. हॉटेलमध्ये गेलात तर पहिल्यांदा फ्रूट जूस मागवावा लागतो. आपल्यासारखे पाणी येथे मिळत नाही. मागवून घेतलेच तर जेमतेम ग्लासभर देतात पण ते ही गरम!! त्याचे ही वेगळे पैसे द्यावे लागतात. गरम पाणी न दिल्यास, हॉटेल मालकावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. सुंगाई पेटानीसारख्या शहरात फक्त दोन इंडियन हॉटेल्स आहेत. तिथे मात्र केळीच्या पानावर सुंदर दाक्षिणात्य जेवण मिळते.
शनिवार रविवार तिथे जाऊन जेवणे हा आमचा आठवडाभराचा एक ध्यास असतो. बाकी वेळा घरीच रंधा, जेवा आणि भांडी घासा! नाहीतर व्हेजी-नॉनव्हेजीच्या जाळ्यात अडका. अशावेळी 'मेरा भारत महान' असे वाटते. मलेशियातील फलजीवन मात्र रसभरीत आहे. त्यामुळेच  की काय माझे येथील जीवन फ्रूटफुल्ल झाले आहे. येथे एकच ऋतू असल्यामुळे बारमाही फळे मिळतात. अत्यंत रसाळ आणि चवदार अशी काही त्यातील फळे आहेत.
रामबुतान-- वरवर काटेरी दिसणारी ही फळे म्हणजे मलेशियाचा मेवा आहे. इतकी गोड व रसाळ असतात की कितीही खाल्ली तरी मन तृप्तच होत नाही. मँगोस्ट्रीम -- नावावर फसू नका. आंब्याचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही. कठीण कवच्याच्या ह्या फळाच्या आतील पांढऱ्या बिया इतक्या रसाळ असतात की पूछो मत!! ड्यूरियन -- हे फळ मलेशियन लोकांच्या अत्यंत आवडीचे. फणसासारखेच दिसणारे, आतील गऱ्यासारखा भाग अत्यंत गोड व भरपूर प्रथिनयुक्त पण उग्र आणि विचित्र वासाचे. किवी--चिकूसारखे दिसणारे पण आतून हिरवे व काळ्या छोट्या बिया असणारे, चवीने आंबट गोड. येथील शहाळ्याचे पाणी अतिशय गोड जणू पृथ्वीवरील अमृतच. "" ह्या व इतर काही व्हेज खाद्यपदार्थंनी माझे खाद्यजीवन समृद्ध केले आहे. पण तरीही बरेच वेळा मला वडापाव, पाणीपूरी इ. चटपटीत पदार्थंची आठवण येतेच. अशावेळेस मी रामबुतानचे एक फळ तोंडात टाकते आणि मानते की मी पाणीपूरी खात आहे. शेवटी काय, समाधान-असमाधान, तृप्ती-अतृप्ती आपल्या मानण्यावरच अवलंबून असते ना???

शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार

शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अनेक परदेशी इतिहासकारांनी आढावा घेतला. काही शिवकालीन होते तर काही नंतरचे होते. यांनी शिवरायांच्या कार्याचे कशा पद्धतीने अवलोकन केले आहे यातून परदेशी लोक शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करतात हे दिसून येते. त्यापैकी काही उद्गारांचे भाषांतर करत आहे.

वारी २०

              त्यादिवशी संध्याकाळी आम्ही घरी परतलो. जयवंत तेथेच थांबला. ती ऑक्टोबरची तीन तारीख होती म्हणजे प्रणव बरोबर तीन आठवड्यांचा झाला होता. त्यानंतर एक आठवड्यानंतर  पुन्हा आम्ही चॉपला गेलो. यावेळी आम्ही सगळेच गेलो.. चॉप हे लहान मुलांचेच हॉस्पिटल असल्यामुळे हॉस्पिटल आणि गेस्टहाउस दोन्हीकडे वेगवेगळी खेळणी होती. हॉस्पिटलमध्ये तर त्यासाठी वेगळा विभागच होता, तेथे जाऊन हवी ती खेळणी काढून मुले खेळत होती त्यामुळे प्रथमेशला तेथील गेस्टहाउसमध्ये आणि हॉस्पिटलमध्येही वेळ जाण्याची काही अडचण नव्हती. त्याला बेबाजीकडे नेण्याचे धाडस काही आम्हाला झाले नाही. कारण तश्या अवस्थेत त्याला पाहून त्याला काय वाटेल याविषयी आम्हास शंका होती. त्यामुळे आम्हीच आळीपाळीने प्रणवकडे जाऊन आलो.त्याची परिस्थिती अजूनही काळजी करण्याच्या अवस्थेतच होती. पण डॉक्टर मंडळी आम्हाला धीर देत होती. 
            जयवंत भाग्यश्री प्रथमेश याना तेथेच सोडून आम्ही घरी आलो.
           दुसऱ्या दिवशी प्रणवच्या प्रकृतीची माहिती जयवंतकडून किंवा care page वरून मिळत होती. फारसा फरक नसल्यावर त्याची तब्येत कालच्यासारखीच आहे अशी नोंद आढळायची. १२ तारखेस तो एक महिन्याचा झाला. जयवंतलाही दररोज तेथे राहून आणि थोडेबहुत तरी ऑफिसच्या कामाकडे लक्ष द्यावे लागत असल्याने कधी सर्दी कधी ताप कधी खोकला. फ्ल्यू होतेच. भाग्यश्री आणि प्रथमेशचे तेथे राहणे ही आणखीच एक जबाबदारी होती. तरी तेथील वाहतूक व्यवस्थेशी परिचित झाल्यामुळे दोघे स्वतंत्रपणे गेस्टहाउस ते हॉस्पिटल अंतर पार करू शकल्यामुळे जयवंतला थोडाफार हातभार मिळाला. इतके करून प्रणवच्या प्रकृतीत जशी व्हावी तशी सुधारणा घडत नसल्यामुळे कुणालाच उत्साह वाटत नव्हता. एक दिवस त्याची लक्षणीय प्रगती व्हायची, डॉक्टर आता तो स्वतंत्रपणे लघवी करू लागेल उद्या कॅथेटर काढून टाकू म्हणेपर्यंत दुसऱ्या दिवशी त्याचा रक्तदाब वाढल्यामुळे ते रद्द करावे लागे. त्यामुळे सूज येत असे. २१ तारखेस त्याचा रक्तदाब कमी झाल्यामुळे रात्रभर डॉक्टर त्याच्याजवळ बसून होते, असे जयवंतने फोन केला तेव्हा सांगितले.
        २२ तारखेस प्रथमेशला घेऊन तो घरी आला पण फार उत्साहात वाटला नाही. प्रथमेशला सोडून तो परत गेला. मला त्यावेळी त्याच्या(जयवंतच्या) जन्माच्या वेळची आठवण झाली. त्याचा जन्म आजोळी झाल्यामुळे मी त्यावेळी त्याच्याजवळ नव्हतो. पण जन्मताच त्याच्या आजोबांचा टेलिग्राम आला होता कारण त्यावेळी फोन हीसुद्धा फार चैनीचीच बाब होती, आणि त्यानंतरही मी बराच उशीरा सासुरवाडीस गेलो होतो. त्याच्या जन्माच्याही वेळी डॉक्टरनी लगेच पेढे आणू नका असे आमच्या सासऱ्यांना सांगितले होते इतका तो बारीक होता(मी पाहिला तेव्हांही बारीकच होता )असे नंतर सासऱ्यांनी मला सांगितले. पण नंतर अशी काळजी करावी लागली नव्हती.
       २४ तारखेस प्रणवची लघवी बंदच झाली आणि लिव्हर पण बिघडायला लागली आहे असा जयवंतचा फोन आला आणि आता हा काही आम्हाला लाभत नाही अशी माझी खात्री झाली. त्याची जीवनज्योत आता केवळ बाहेरील प्राणवायूवर धुगधुगत होती. तो आधार काढून घेतला की त्याचे अस्तित्व केवळ पार्थिव शरीरापुरतेच उरणार होते. पुढ्यात ज्ञानेश्वरी ठेवून मी मूकरूदन करत होतो. चॉपच्या डॉक्टर्सनीही आशा सोडली आणि सपोर्ट सिस्टिम्स काढायच्या की नाही याचा निर्णय घ्यायला सांगितले.
     आता प्रणवने शेवटचा श्वास सोडल्यावर त्याचे शरीर घेऊन पुढे काय करावयाचे कोठे करावयाचे, याचा विचार सुरू झाला. आमच्याजवळपासचे सर्वच भारतीय आमच्यासारखेच या प्रकारास अनभिज्ञ होते. आमच्या परिचयाचे एक डॉक्टर येथेच फिलाडेल्फियातच गेली दहा पंधरा वर्षे स्थायिक होते त्यामुळे त्याना माहिती असेल म्हणून फोन केला पण त्यानीही या बाबतीत आपणही तेवढेच अनभिज्ञ आहोत असे सांगितले. काही हिंदू मंदिरांच्या व्यवस्थापनाकडे चौकशी केली पण त्यांच्याकडे या प्रकारची व्यवस्था नाही असे कळले.
      आमच्या अशा चौकश्या चालू असताना संयुक्ताने मात्र मुकाट्याने संगणक चालू करून महाजालावर पहायला सुरवात केली, आणि निरनिराळ्या पद्धतीने शोध घेतल्यावर तिला India Funeral  चा शोध लागला. त्या संस्थेची संचालिका ऍना नावाची ख्रिश्चन स्त्री होती. तिला फोन केल्यावर अतिशय कनवाळूपणे चौकशी करून पुढची सगळी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले.
         शेवटी २६ ऑक्टोबरला म्हणजे प्रणवच्या जन्मानंतर दीड महिन्यानी पुन्हा एकदा मी सुजितबरोबर फिलीला चॉपमध्ये गेलो. आता ही आपली शेवटचीच फेरी अशी माझी खात्री होती. सकाळी साडेदहा वाजता आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो. पहिल्या वेळी जो उत्साह होता तो दुसऱ्या वेळी कमी झालाच होता पण यावेळी मनात दु:खाचा कल्लोळ माजला होता. प्रणवकडे पाहण्यासारखी त्याची स्थिती नव्हती, शरीरावर सर्वत्र सूज आलेली आणि त्याचा सुंदर चेहराही पाहण्यासारखा राहिला नव्हता. काळजावर दगड ठेवून त्याच्या सपोर्ट सिस्टिम्स बंद ठेवायला आम्ही संमती दिली. आणि त्याच्या एक एक नळ्या काढून टाकत शेवटी व्हेंटिलेटर काढून टाकल्यावरही त्याच्या नाडीचे ठोके चालू राहिले आणि एकदम काहीतरी चमत्कार होऊन प्रणव पुन्हा हुंकारू लागणार की काय अशी अंधुक आशा मनात जागृत झाली पण ती दिवा विझण्यापूर्वीची फडफड होती. त्यानंतर पंधरा मिनिटात प्रणव आम्हाला कायमचा सोडून गेला.
     तेथील डॉक्टर्स किंवा नर्सेस यांची वागण्याची पद्धत खरोखरच अशी होती की आमच्या मनास जराही यातना होऊ नयेत याविषयी ते फारच दक्ष होते. थोडा वेळ असाच जाऊन दिल्यावर त्यांनी हलकेच जयवंतला विचारले अशा प्रकारच्या रोगात काय गुंतागुंत होते याचा अभ्यास करता यावा म्हणून प्रणवची ऍटोप्सी करण्याची आमची इच्छा आहे पण तशी तुमची जर इच्छा नसेल तर  तशी जबरदस्ती आम्ही करणार नाही. प्रणव तर आम्हाला सोडून गेलाच होता पण त्याच्यामुळे पुढे काही बालकांचा फायदा होणार असेल तर काय हरकत आहे असा विचार करून आम्ही त्यास अनुमती दिली.
     आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडिया फ्यूनरल्सच्या ऍनाचा हॉस्पिटलला अगोदर फोनही आला होता त्यामुळे ऍटोप्सीनंतर प्रणवचा देह तीच घेऊन जाईल आणि पुढे काय करणार याचे मार्गदर्शन तीच आम्हाला करेल असे आम्हाला सांगण्यात आले. अमेरिकेत इतके भारतीय असून अशा प्रकारची कोणतीही भारतीय संस्था नाही हे पाहून आश्चर्य वाटले. कारण ऍनाच्या संस्थेचे नाव जरी इंडिया फ्यूनरल्स असले तरी ती अमेरिकन संस्थाच होती. ऍनाची छोटी मुलगी अशीच मरण पावली आणि त्यानंतर तिने आपले जीवितकार्यच हे असे ठरवले त्यामुळे लहान मुलांच्या फ्यूनरलसाठी शवपेटीचाच खर्च ती घेत असे इतर कोठलेही खर्च ती घेत नाही असे कळले.
         प्रणवला मग तेथेच सोडून आम्ही गेस्ट हाउस मध्ये जाऊन सर्व सामान गोळा करून निघायचे ठरवले. जयवंत भाग्यश्री तेथे बरेच दिवस राहिल्यामुळे गेस्ट हाउसमधील बऱ्याच लोकांना त्यांची आणि प्रणवची माहिती झाली होती, त्यामुळे सगळ्यांनी काय झाले याची आवर्जून चौकशी केली आणि काय झाले हे कळल्यावर सगळ्यांनी दोघांनाही उराशी धरून त्यांचे सांत्वन केले. त्यात नाश्त्याच्या वेळी भेटलेली आणि गप्पा मारणारी मुलीची आई पण होती. सगळ्यांनी प्रणव किती गोड मुलगा होता याची आवर्जून आठवण काढली आणि जयवंत भाग्यश्रीचे अश्रू पुसले.
    घरी यायला जवळजवळ संध्याकाळचे साडेसात वाजले. प्रथमेश अर्थातच घरात होताच पण त्याने बेबाजीविषयी एक शब्दही उच्चारला नाही जणू तो हॉस्पिटलमध्येच तो राहणार असे त्याने मनोमन ठरवून टाकले होते.
    दुसऱ्या दिवशी ऍनाला फोन केल्यावर तिने फ्यूनरल शुक्रवारी म्हणजे २९ ऑक्टोबरला करायचे असे सांगितले, त्याचबरोबर वैदिक मंत्र वगैरे म्हणायचे असल्यास एक फोन नंबर देऊन त्यावर संपर्क साधावयास सांगितले. लहान मुलाच्या बाबतीत दाहसंस्कार करत नसल्यामुळे  शवपेटी ठेवण्यासाठी खोदून ठेवले जाईल हे पण सांगितले. आशचर्य म्हणजे आम्ही अजून ऍना या व्यक्तीस पाहिलेही नव्हते. तिच्या सांगण्याप्रमाणे कौशिकशास्त्रीना फोन केला आणि त्यानीही त्यादिवशी येण्यास मान्यता दिली.
      शुक्रवारी फ्यूनरलला मी, जयवंत, सुजित आणि सौ. असे चौघे जायचे ठरले. त्याप्रमाणे आम्ही साडेदहा वाजता फ्रँकलीन पार्कच्या सीमेटरीत पोचलो. हे एक चर्चच आहे आणि त्याच्या आवारात स्मशानभूमी आहे. कौशिकशास्त्री अगोदरच आले होते. जयवंतचे आठ दहा मित्रही आले होते. थोड्या वेळाने ऍनाही आली. तिने एका पेटीतून प्रणवला आणले होते आणि ती पेटी चॅपेलमध्ये ठेवल्याचे सांगून त्याचे अंत्यदर्शन घ्यायला सांगितले. इतका छान तो जन्मानंतर एकदाच पाहिला होता. जणू "कर ले सिंगार चतुर अलबेली साजनके घर जाना होगा" याची जाणीव ठेवूनच ऍनाने त्याला इतक्या चांगल्या स्वरुपात आणले होते. आता अंगावर सूज नव्हती. पहिल्यानेच त्याच्या अंगावर छान कपडे घालून शालीमध्ये गुंडाळून त्याला ठेवले होते. पेटीत काही छोटी खेळणी ठेवली होती. आम्ही सर्वानी एकदा प्रणवचा निष्कलंक देह प्रथमच डोळा भरून पाहिला. त्याचेजवळ ठेवलेली फुले सर्वानी त्याच्या पार्थिवावर वाहिली.
       त्यानंतर ती पेटी तेथून ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करावयाचे त्या जागी आणली. त्या ठिकाणी अगोदरच पुरेसे खोल खणून त्यावर एक लाकडी फळी ठेवलेली होती. त्या फळीवर एक कपडा टाकून त्यावर प्रणवचे नाव लिहिलेली पाटी लावलेली होती. पेटी तिकडे नेऊन कौशिक शास्त्र्यांनी त्या जागेची गंगाजल, दूध नारळ, मीठ टाकून यथासांग समंत्र पूजा केली. नंतर पेटीतील पार्थिवावर योग्य ते मंत्र म्हणून गंध फुले वाहिली काही मंत्र म्हटले. आम्ही सर्वांनीपेटीवर फुले वाहिली आणि मग जड अंत; करणाने पेटी खड्ड्यात ठेवून तेथील दोन कर्मचाऱ्यांनी त्यावर माती लोटून ती जागा पूर्ण सपाट केली आणि त्यावर प्रणवच्या नावाची पाटी लावली. या सर्व घटनेत ऍनाची भूमिका तिच्याच घरातील व्यक्ती मरण पावल्यासारखी होती. आश्चर्य  म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी खड्डा तयार केला आणि त्यानंतर माती लोटली त्यांनी जयवंतने देऊ केलेले पैसेही घेण्यास प्रथम नकार दिला पण मग ऍनाच्या सांगण्यावरून त्यांनी ते घेतले. स्मशानातही अडवणूक करणाऱ्या आपल्याकडील काही व्यक्तींची त्यावेळी आठवण झाली. अशा रीतीने १२ सप्टेबरला संध्याकाळी सात वाजता सुरू झालेला प्रणवाध्याय २९ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता संपला.  
         कोणतीही गोष्ट बरी की वाईट योग्य की अयोग्य हे शेवटी परिणामावर ठरते. भारतातून जयवंत भाग्यश्री गेले त्यावेळी प्रसूती भारतात करून मग अमेरिकेत जावे असे मला वाटत होते. पण अमेरिकेत जन्म झाल्यावर तेथील नागरिकत्व त्याला आपोआप प्राप्त होते, शिवाय त्याच्या जन्मानंतर जायचे म्हणजे पुन्हा त्याचा पासपोर्ट व्हिसा या सगळ्या भानगडी भाग्यश्रीलाच कराव्या लागल्या असत्या. म्हणजे बराच उशीर झाला असता या विचाराने त्यानी त्या वेळी जाण्याचा निर्णय घेतला. त्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे हे कळल्यावर तर इकडे आलो तेच बरे केले असे वाटले कारण अशा प्रकारची शस्त्रक्रिया इतक्या व्यवस्थित भारतात झाली असती की नाही शंकाच होती. शस्त्रक्रिया चांगली झाल्यावर तर जे होते ते बऱ्यासाठीच असे वाटले. कारण अशा प्रकारचा दोष असणारी बालके जगणे शक्यच नसते अशी अमेरिकेतील डॉक्टरांचीही कल्पना होती परंतु अलीकडेच त्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य आहे आणि अशी मुले जगतात असा अनुभव आला होता.
     माझ्या भावालाच पंचवीस तीस वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या मुलात असाच दोष होता आणि तो झाल्यावर लगेचच काळानिळा पडू लागला आणि त्यावेळी डॉक्टरांनी त्यावर काही उपाय नाही असा निर्वाळा दिल्यावर काही काळातच तो गेला होता. प्रणवच्या बाबतीतही त्याचा जन्म भारतात झाला असता तर कदाचित असेच झाले असते, आता जे झाले ते पाहता या चिमण्या जीवावर शस्त्रक्रिया करून आपण त्याला मोठी शिक्षाच दिली असे वाटले. अर्थात आपण कोणतीही गोष्ट चांगल्या उद्देशानेच करतो.
      आता जे झाले ते चांगले की वाईट? हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे पहिल्या वारीच्या वेळीचा आमचा हिडन व्हॅलीतील चांगला शेजारी (याचा उल्लेख पहिल्या भागात आला आहे)एकदा नंतर भेटला. त्याने ओळख दाखवली, म्हणून मी त्याच्याशी बोलू लागल्यावर त्याने आमच्या घरातील दु:खद घटना कळल्याचे सांगून माझे सांत्वन केले. पण पुढे त्याने सांगितले की त्याच्या भावालाही मुलगा झाला आणि त्याच्या हृदयात असाच दोष आढळला. त्याचा जन्म मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये झाला होता आणि त्यावेळी तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर अशीच शस्त्रक्रिया केली आणि तो वाचला पण पुढे तो थोडा मोठा झाल्यावर पुन्हा तशाच प्रकारचा दोष उत्पन्न झाल्यामुळे बंगलोरला नेऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. ती शस्त्रक्रिया व्यवस्थित झाली आणि तरी शेवटी तो वाचला नाहीच. पण अशा मुलांच्या बाबतीत ती वाचली तरी ऑक्सिजनचा  पुरवठा सुरवातीस न झाल्यामुळे त्याच्या मेंदूवर  दुष्परिणाम झाल्यामुळे ती मंदबुद्धी होण्याची शक्यता असते. असेही त्याने सांगितले. त्यामुळे असे मंदबुद्धी मूल पाहिले की त्या जागी प्रणव असता तर असा विचार मनात येऊन अंगाचा थरकाप होतो. त्याचबरोबर जयवंतचे कौतुक अशासाठी वाटते की असा धोका असूनही त्याने प्रणवसाठी काहीही करण्याची कसूर ठेवली नाही.         
   
   

वारी १९

                  प्रणवच्या जन्माच्या  आनंदात   दुसरा दिवस आम्ही मोठ्या उत्साहात सुरू केला. नेहमीप्रमाणे सकाळचे कार्यक्रम पार पाडून मी प्रथमेशबरोबर फिरून आलो. हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी डबा बनवणे वगैरे कामात महिलावर्ग गुंतला. संध्याकाळी आपल्या आईबरोबर प्रणव घरी येणार म्हणून त्यांची खोली तयार करून ठेवायचा विचार काका काकू करू लागले. आज हितेशभाई पण अगदी वेळेत आला आणि प्रथमेश अगदी खुषीत त्याच्याबरोबर शाळेत गेला. घरी आल्यावर तो बेबाजीशी खेळणार होता. काका डबा आणि इतर काही आवश्यक वस्तू घेऊन हॉस्पिटलला गेला.