'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

भारत देशात जरी हिंदू बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो. आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता. पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसून येत की सांप्रदायिक शक्तींना विरोधाचे कारण पुढे करून प्सुडोसेक्युलर पक्ष संधिसाधुपणा करतात. यामध्ये अनेक उदाहरणे देता येतील. सध्याचच सगळ्यात गाजणार उदाहरण म्हणजे समाजवादी पक्ष.

क्लृप्ती की क्लुप्ती?

योग्य शब्द कोणता? क्लृप्ती की क्लुप्ती ( idea या अर्थी) ?

माझ्या मते क्लृप्ती बरोबर, पण माझ्या एका मित्राच्या मते क्लुप्ती बरोबर.

मनोगत वर "शोधा" विभागात मी शोधून पाहिले, पण क्लृप्ती आणि क्लुप्ती हे दोन्ही शब्द असलेले लेख सापडले.

भ्रष्टाचार एक शिष्टाचार.....!!!!

"आरे भाऊ, रुख्माबाईले बलाई ले, मना आते शेवटला टाईम जोळे यी जायेल शे. "

"तू गप्प, पडी राह्य, नाना आते येतच हुई डॉक्टरले लीसन." एवढं बोलून तात्या, डॉक्टर आणि नानाकाका अजून का आले नाहीत हे बघायला निघून गेले. माईआजीशिवाय तिच्या खाटेशेजारी मी, काकू आणि आई. "

राजकन्या सॅली

   सॅली. 

सॅली हे नाव तिला कसं पडलं, हे कोणालाच माहीत नाही. तिच्या फुलांच्या मांडणीत सायलीची फुलं सर्वात जास्त, म्हणूनच असेल  कदाचित.
     पहिल्या प्रहराला, पोस्ट ओफिस जवळच्या रस्त्यावरून निघालं की पुढच्याच वळणावर सॅली आपल्या फुलांचा संसार थाटात मांडायची. फुलं दिसण्याआधीच, वळणावर त्यांचा सुगंध येणाऱ्याचं स्वागत करायचा.
    बारा वर्षांची इवलीशी सॅली स्वतःभोवती फुलं पसरून, त्यांच्या मधोमध बसायची, फुलासारखीच. तिला तिच्या फुलांबरोबर बघितल्यावरच पहाट खुलल्याचं समाधान मिळायचं. गावातल्या सगळ्यांच्या घरी फक्त सॅलीकडचीच फुलं दिसणार. सकाळी सगळ्या ताया आणि संध्याकाळी सगळे दादा तिच्याकडूनच फुलं आणि गजरा घ्यायचे.

अनमोल भेट

जवळ जवळ पंधरा वर्ष जुना प्रसंग, पण माझ्या आजही आठवणीत आहे
दिवाळी जवळ आली होती. घरोघरी सजावट केल्या गेली होती. फराळाचा घमघमाट वातावरणात तरतरी आणत होता. फटाक्यांची दुकाने बालगोपालांच्या ताब्यात दिसत होती. माझीही तयारी जोरात चालली होतीच!
कोणता ड्रेस घ्यायचा, कोणते दागिने घालायचे, सगळं आधीच ठरलेलं! आता बाकी होतं ते कॉस्मेटिक्स आदी ची खरेदी... तशी मी फार "मटकी" नव्हते, पण आईच्या भाषेत सांगायचं झालं तर "नाटकी" होते फार... त्यामुळे आई माझ्याबरोबर खरेदीला यायला जरा का.. कू.. करत होती.... तीला तिचे कामं सोडून माझ्याबरोबर उगाच दुकानं हिंडण हा "टाईम पास" परवडणारा नव्हता... पर्यायी उरलेली खरेदी मला एकटीलाच करायची होती..

मी खरेदीला गेले खरे; पण दुकानातली प्रचंड गर्दी पाहून आत जायची इच्छा होईना. तेंव्हा फटाक्यांच्या दुकानात फेरफटका मारला. लहान भावासाठी फटाके घेतले, आणि बाहेर पडले. गाडीजवळ एक चिमुकला माझ्याकडे बघत उभा होता
काटकुळी अंगकाठी, जुने कपडे, बोलके डोळे काळवंडलेला चेहरा, आसा हा पाच सहा वर्षाचा मुलगा एकदा माझ्याकडे आणि एकदा माझ्या हातातल्या फटाक्याच्या बॅग कडे पाहत होता. त्याच्या चेह-यावर फटके उडवण्याची तीव्र इच्छा दिसत होती. त्याचे बोलके डोळे त्याच्या आर्थिक परिस्थितिचे वर्णन करत होते. फटक्यांची किमंत त्याच्य परिस्थितिला परवडणारी नक्कीच नव्हती.
मी माझ्या हातातली फटाक्यांची बॅग त्याला दिली, आणि त्याच्या चेह-यावरचे भाव वाचू लागली. माझ्या हातातली बॅग घेऊन तो उत्सुकतेने फटाके बाहेर काढू लागला. त्याच्या चेहे-यावर उमलणारं हसू, डोळ्यातले आश्चर्य, त्याच्या मनातला आनंद बघताना मी मलाच हरवून बसले.
फटाके जमिनिवर अस्ताव्यस्त पसरवून तो मिनिटभर काय उचलू यातच रमून गेला... लगेच त्यातली चार पाच टिकल्यांची पाकिटं भरा भरा उघडून घेऊन तो ती टिकल्यांची बाजूलाच पडलेल्या दगडाने फोडू लागला... अव्यक्त इच्छा अनपेक्षित पणे पूर्ण झाल्यावरचे त्याचे हाव भाव मला कळत होते. समाधान झाल्यावर उरलेले फटाके घरी नेण्यासाठी तो एकत्र करू लागला.
"काय रे बाळ? काय नाव तुझं? ".. मी विचारलं. "श्श्याम".. " कुठे राहतोस तू? "... "मरारटोळी.... माझा बापू रिक्षा चालवतो, सवारी होती म्हणून मला बसवल इथे" तो सांगत होता.... "भुक लागली असेल न रे तुला? " मी विचारलं... "चल आपण समोसे खाऊ! ".. समोस्याचं नाव ऐकताच त्याची भूक बळावली असणार! तो तयार झाला.. लक्ष्मी भुवन चौकातल्या नेहमीच्या समोसेवाल्याकडे मी त्याला घेऊन गेले, त्याल दोन प्लेट समोसे घेऊन दिले, त्यातला एकच समोसा त्यानी खाल्ला, आणि बकिचे कगदात बांधून घेतले.. "काय रे, खा नं" मी म्हणाले.. " माझ्या बहीणीसाठी नेतो घरी" तो उत्तरला...
त्याला पुन्ह त्याच्या जागेवर बसवून मी घरी निघाले, घरी आल्यावर आईला त्याच्याबद्दल सांगितलं.. आईनी लगेच फराळाचं बांधून दिलं. मी फराळाची पिशवी घेऊन पुन्हा तिथे आले.. पण तो तिथे नव्हताच! मला घरून जाऊन यायला पंधरा विस मिनिटं लागली असावी, तेव्हढ्या वेळात त्याचे वडील त्याला घेऊन गेलेतही.. त्यानंतर कितितरी दिवस माझी नजर त्या समोशाच्या दुकानाकडे भिरभिरत राहीली, पण शाम मला पुन्हा भेटलाच नाही. कदाचित तो आज समोर आला तर मी त्याला ओळखू देखिल शकणार नाही तरीही.... त्यानंतर आजपर्यंतची प्रत्येक दिवाळी मला आठवणीत घेऊन जाते. या घटनेला आज पंधरा वर्ष होत आलीत, पण मी शाम ला विसरूच शकले नाही.. अर्थात त्याला कारणही तसच आहे...
मी शामला पाच पन्नस रुपयांचे फटाके दिले असतील, त्यानी ते एक झटक्यात उड्वून संपवले ही असतील, ते थोडेसे समोसे देखील तासाभरात संपले असतील, मात्र शामनी मला जन्मभर पुरेल अशी भेट दिली. त्याच्या चेह-यावरचा निरागस आनंद, तो आनंद टिपून घेण्याची मला मिळालेली संधी, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं असं, मला मिळालेलं समाधान, जे आजन्म माझ्याजवळ राहणार आहे, यापेक्षा अनमोल भेट अजून कोणती असू शकते

अर्थाचा विनोदी अनर्थ (भाग १-शेअर, दगड आणि लैंगिक शिक्षण)

(अर्थाचा विनोदी अनर्थ- या नव्या मालिकेत मी वेगवेगळ्या हलक्या फुलक्या प्रसंगातून विविध विषयांवर विडंबन सादर करत आहे-)

गेल्या वर्षीपासून आपल्या भारतात थोड्या थोड्या कारणावरून लोक रस्त्यावर येवून तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करू लागलेत. या वर्षी त्याचे प्रमाण तर सरासरी रोज एक याप्रमाणे झाले आहे. आज जर अशी स्थिती आहे, तर उद्या काय होईल? आणि प्रसारमध्यमांचे प्रतिनिधी तर लगेच तयारच असतात त्याचे चित्रण करायला आणि विविध 'अर्थपूर्ण प्रश्न' विचारायला! 'कशालाही' आजकाल बातमी बनवले जाते. याकडे मी थोड्या 'विनोदी' नजरेने बघितले आणि माझ्या 'भविष्यकालीन' मनात खालील बातम्या भुंग्यासारख्या 'भुण भुण' करायला लागल्या--- एका बातमीचा संबंध कसाही कुठेही जोडला जातो. आणि आपण ते बघतो.  

'उघड्यावरची' कारवाई

थेट मंत्रालयातून आलेलं फर्मान बघून वरिष्ठ आरोग्य अधिकारी मानकामे हडबडलेच. एकतर नुकतीच दुपारच्या भरपेट जेवणानंतर त्यांना डुलकी लागत होती. चहा प्यायला कॅंटिनमध्ये जायला अजून वेळ होता. टेबलावरचा फायलींचा ढिगारा थोडासा बाजूला सारून त्यांनी मस्त निद्रादेवीची आराधना सुरू केली होती. बाकी, सरस्वतीशी लहानपणापासून कधीच जमलं नसलं, तरी सरकारी कार्यालयात चिकटल्यापासून निद्रादेवीशी मानकाम्यांनी चांगलंच जुळवून घेतलं होतं. मागल्या दारानं चोरपावलांनी लक्ष्मीही अधूनमधून पाणी भरत होती. जनू जमदाडे शिपायानं आणलेल्या अर्जंट टपालामुळे मानकामे जाम वैतागले.

जगलेले अनुभव - २

        पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून जागा झालो... घड्याळात बघितले तर जेमतेम पाच वाजत होते. तसा मी उठण्याच्या बाबतीत आळशी, पण त्या दिवशी झोप नाही लागली परत. बिछान्यात पडल्या पडल्या, तो किलबिलाट लक्ष देऊन ऐकू लागलो. कितीतरी पाखरे चिव-चिव करत होती. त्यातले कोण कुणाला काय काय म्हणत असेल, अन् ते ज्याचे त्याला कसे अचूक समाजात असेल असा प्रश्ना मला पडला. मग म्हटले, आपलेही असेच होत नाही काय? सतत इतके आवाज ऐकू येत असतात पण आपण आपले काम अचूक करू शकतो ना.. मग पाखरांचेही तसेच व्हायला काय हरकत आहे!!
        पाखरांचा विचार करता करता आठवलं, आमच्या घरी बाबांनी मोठ्या हौसेने एक राघू आणला होता. लहानपणी त्याच्याशी तासन् तास गप्पा मारणे हा माझा आवडता छंद! शाळेतून आल्याबरोबर आधी त्याची वास्त-पुस्त नि मग बाकीचे काम!! आजीने त्यावेळेस रामायण वाचण्याचा नेम केलेला होता. तेव्हा त्याचा पिंजरा जवळ घेऊन ती आतल्या खोलीत वाचत बसायची. रात्री मग रामायणातल्या गोष्टी तिच्याकडून ऐकण्यासाठी अभ्यास झटपट उरकून, मग आजीजवळ जाऊन बसायचे, तिच्याजवळ गोष्ट सांग म्हणून भुणभुण-भुणभुण लावायची!! "झोपताना सांगेन" हे तिचे ठरलेले उत्तर असल्यामुळे आपली लवकर झोपण्याचीही तयारी असायची . तिच्यामुळे रामायण नि नंतर महाभारतातल्या सगळ्या गोष्टी मला लहानपणीच माहीत झालेल्या.
        बाकी आजीचा गोष्टी रंगवून सांगण्यात अगदी हातखंडा होता. जास्त शिकलेली नसूनसुद्धा कितीतरी गोष्टी तिला माहीत होत्या. श्रावणबाळाची गोष्ट, पुंडलिकाची गोष्ट.. या गोष्टी ऐकतांना मी कितीदातरी हमसून-हमसून रडलोय! जात्यावरच्या ओव्या अन् बरेच अभंग तिला माहीत होते. बऱ्याचदा ती ते अभंग म्हणायची. मस्त वाटायचे एकदम. तिची देवपूजा म्हणजे अगदी बघण्यासारखी असायची. इतक्या प्रेमाने पूजा करताना मी क्वचितच कुणाला पहिले आहे. आज मी प्रयत्न करतो तसा पण ती सर येत नाही. प्रेम रुजावे लागते म्हणतात ना... ते हेच!
        प्रेमासाठी प्रत्येक प्राणी किती तळमळत असतो याची मी कित्येक उदाहरणे बघितलीत. माझ्या एका मित्राकडे एक कुत्रा आहे, छोटू. घराजवळच, अत्यंत जखमी अवस्थेत, हा छोटू त्यांना सापडला. मित्राच्या वडिलांनी, 5-6 दिवस सुट्टी काढून घरी बसून, त्याची खूप सुश्रुषा केली; ज्यामुळे तो जगला. तेव्हापासून त्याला त्यांचा एवढा लळा आहे की त्यांच्या शिवाय तो जेवतही नाही. त्यामुळे ते 1-2 दिवसाहून जास्त दिवस कुठे बाहेरगावीही जाऊ शकत नाहीत, कारण हा घरी भुकेला असतो!! काय नाते असते पहा!!
        ...
        ...
        अचानक 6 वाजताचा घड्याळाचा ठोका पडला अन् भानावर आलो. कुठून विचार सुरू झाला अन् कुठे येऊन थांबलो मी!! स्वतःच्या नकळत, त्या एका तासात मी अख्खे जग फिरून आलोय, माझे अनुभव सगळे परत जगून आलोय, असे वाटायला लागले. खूप प्रसन्न वाटत होतं तेव्हा! बाकी मनाचे विभ्रम फार मजेदार असतात. त्रयस्थपणे बघत बसावे, दुसऱ्या विरंगुळ्याची गरजही पडणार नाही कदाचित. कुठेतरी वाचलेल्या एका चारोळीत त्याचे सुरेख वर्णन सापडते-

खुर्ची वरची कसरत

मी मागच्या वर्षी पासून शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी सुरू केली, त्या वेळेचा अनुभव

सध्या घरी जास्त वेळ द्यायचा, मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं म्हणून कमी वेळेची आणि सोपी नोकरी ( फक्त वाटणारी)म्हणून शाळेची नोकरी स्वीकारली. मी आणि मुलगा, एकाच शाळेत असल्यामुळे नोकरी अधिकच सोपी वाटू लागली (अर्थात, जोइन करण्या आधी). शिक्षकांचे ट्रेनिंग वगरे आटोपून अखेर तो अविस्मरणीय दिवस उगवला.
मी आणि माझे विद्यार्थी. आम्ही सर्व मिळून केवळ तेवीस जण. शाळेची वेळही फक्त तीन तास. पण हे तीन तास मला खरोखरीच लक्षात राहण्याजोगे आहेत. तारेवरची कसरत कशाला म्हणत असावेत ह्याची कल्पना मला त्या दिवशीच्या "खुर्चीवरच्या" कसरतीतून आली.
माझा हा शळेत शिकवण्याचा पहीलाच अनुभव. मुलांचाही त्यांच्या अयुष्यातला शाळेचा पहिलाच दिवस, जागाही अगदी नवीन... तरीही खुप संयम, अन कॉनफिडन्सचा मुखवटा चढ्वून ,येणऱ्या प्रत्येक मुलाला मी सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होते.