बटाटा भजी

वाढणी
२ जण

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • २ बटाटे मध्यम आकाराचे
  • लाल तिखट १ चमचा,
  • धनेजीरे पूड १ चमचा, मीठ
  • चिरलेली कोथिंबीर मूठभर
  • हरबरा डाळीचे पीठ १ ते दीड वाटी
  • तळणीसाठी तेल

मार्गदर्शन

माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-४

१८ ऑक्टोबरला रात्री ८. ४० ची पुण्याची बस होती. सुदैवाने बस सुटण्याचे ठिकाण आमच्या कंपनीच्या बसेस जिथे थांबत तिथेच होते. आम्ही १८ तारखेला प्रशिक्षण संपवून ६. ४५ च्या बसने सामान घेऊन निघालो. तशी मी पहिल्यांदाच असा एकटीने प्रवास करत होते. पण माझ्या बरोबर माझा १ पुण्याचा सहकारी होता. ७. ४५ वाजता आम्ही कंपनीच्या बसमधून उतरलो. आणि जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलो. पण पुण्याला येण्याच्या आनंदात मला काही जेवण गेलेच नाही. ८. ३० वाजता आम्ही पुण्यासाठीच्या बसच्या स्टॉपवर येवून उभे राहिलो. बस ८. ४० ची होती पण ती ९. ३० ला आली. आणि ९. ४५ ला निघाली. गाडीत हिंदी चित्रपट लागला होता. तो बघता बघता कधी झोप लागली कळलेच नाही.

अहमद फराज - दुःखद निधन

परवा, २५ ऑगस्ट रोजी, इस्लामाबादामध्ये आजच्या काळातील सर्वोत्तम उर्दू कवीपैकी एक, श्री. अहमद फराज ह्यांचे प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या ७४व्या वर्षी दुःखद निधन झाले. फैज अहमद फैज ह्यांचा वारसा सांगणाऱ्या फराज ह्यांचेही फैजप्रमाणेच पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांशी कधीच पटले नाही. रिवायती रोमँटिक गझलांसाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या शायराने पाकिस्तानातील राजकीय स्थितीवर व तेथील हुकूमशहांनी सामान्य माणसांच्या केलेल्या गळचेपीवर देखील अनेक कविता केल्या. (ह्याचे उत्तम उदाहरण आहे त्यांची कविता मोहासरा). त्यामुळे त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. काही वर्षे देशत्याग करून युरोप, इंग्लंड व कॅनडात राहावे लागले. त्यांच्या काही प्रसिद्ध रचना आहेत :

माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-३

  पुण्याहून येताना मी 'मृत्युंजय' पुस्तक घेऊन आले होते. मग मी ते वाचायला घेतले. (आधी एकदा वाचलेले होतेच). मग जरा वेळ बरा गेला. आणि मग कधीतरी झोप लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता आवरून ट्रेनिंग रूममध्ये जाऊन बसलो. बरोबर नाओ होतीच. त्याच दिवशी सकाळी माझे पुण्याचे सहकारी तसेच चेन्नईचे १ सहकारीही आलेले होते. मग हळूहळू ५ जपानी व १ चेन्नईचे सहकारी ह्यांच्याशी ओळख करून घेतली. पुण्याच्या सहकाऱ्यांशी एकत्र काम केल्यामुळे माझी आधीच ओळख होती.

गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ७

तृप्ती ला सारखे वाटत होते की संदिप च्या वाढदिवसाला काहीतरी सरप्राइज द्यावे. तिथे एका चॅनेल वर अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा देता यायच्या. आणि त्या शुभेच्छा आम्ही नेहेमी जात असलेल्या त्या भारतिय माणसाच्याच रेस्टॉरंट मध्ये जाऊन द्यायच्या होत्या. म्हणून खरेतर आम्ही असे ठरवले की ते आम्हाला तृप्तीनी लिहून द्यायचे आणि मग काही दिवस आधी मी आणि गिरीशने ते त्या भारतिय माणसाच्याच रेस्टॉरंट मध्ये नेऊन द्यायचे. त्याच माणसाकडे तृप्ती पराठ्यांची ऑर्डर पण देणार होती. ते पराठे आणायला तृप्ती आणि संदिप गेले की मग आम्ही त्यांच्या घराची किल्ली घेऊन त्यांचे घर सजवणार होतो. पण संदिपने असेच सहज तृप्ती ला विचारले की आपण च माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ह्या चॅनेल वर देऊ म्हणुन. तेव्हा मग तृप्ती म्हणाली की माझे तसे ठरलेच होते. मग शेवटी तृप्ती आणि संदिप च ते लेखन घेऊन पराठ्यांची  ऑर्डर ही द्यायला गेले. मग असे ठरले की ते दोघे खाद्द्यपदार्थ आणायला जाणार होते तेव्हा आम्ही बाकीचे ग्रुप मधले लोक त्यांचे घर सजवणार होतो. पण नेमके त्याच दिवशी सकाळपासून आमच्या घरातले(आख्ख्या बंगल्यातले) दिवे गेले होते. काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. मग पार्टी बाकी मित्रांच्या घरी करायची असे ठरले. मी आणि गिरीशने आधीच फुगे फुगवून ठेवले होते. मग ते फुगे आम्ही लॉंड्री बास्केट मध्ये घालून बाकी मित्रांच्या घरी न्यायला लागलो. ते तृप्ती ला तिच्या घरातून दिसत होते. ते संदिप ला दिसू नये म्हणून ती संदिप ला कशात न कशात गुंतवून ठेवत होती. आणि आमची तर कसरत च चालली होती. फुगे कार मध्ये ठेवताना वाऱ्यामुळे ते फुटत च जास्ती होते. मग आम्ही ते बाकीच्या मित्रांना देऊन पुन्हा नवीन फुगे आणायला बाहेर पडलो. पुन्हा ते नेऊन फुगवून  सजवले. इतकी सगळी तयारी झाली आणि नेमके आमच्या घरचे दिवे आले.  

गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ६

आम्ही तिकडे असताना काही भारतिय सण ही आम्हाला तिकडेच साजरे करावे लागले. आम्ही तिकडे असताना अशा सणांपैकी होळी, रंगपंचमी आणि महाशिवरात्री आम्ही तिकडे साजरे केले.

होळी तिकडे एके ठिकाणी असते असे संदिप ला माहीत असल्याने आम्ही संध्याकाळी ६ जण (तृप्ती, संदिप, सौजन्या, वेंकट, गिरीश आणि मी) असे त्या होळीच्या ठिकाणी गेलो. तिकडे खूप च गर्दी होती. एका मैदानात ती होळी होती. अगदी आपल्या इथल्यासारखी होळी होती. क्ष्णभर मला तर असे वाटू लागले की आम्ही भारतातच आहोत की काय. अगदी नारळाच्या झावळ्या ही होत्या. नंतर तिकडे हिंदी गाण्यांवर काही नृत्ये झाली. दुसऱ्या दिवशी सुट्टीच होती. नेहेमीप्रमाणे सकाळी खरेदी ला जायचे म्हणून मी आणि गिरीश उठून तयार झालो. नंतर तृप्ती ला फोन केला तर ती म्हणाली की सुरीनाम मध्ये होळी च्या दुसऱ्या दिवशी हे लोक फागवा म्हणजेच रंगपंचमी खेळतात. तर आज सगळी दुकाने बंद असतील. तरीही माझे आणि गिरीश चे आवरल्याने आम्ही घराबाहेर पडलो. खरेच सर्व सुरीनामी मंडळींची दुकाने बंद होती. पण काही चायनीज लोकांचे मॉल्स चालू होते. त्यांच्यात एक माणूस आम्हाला रंग खेळलेला दिसला. झाले! माझ्या आणि गिरीश च्या डोक्यात आले की आपण ही रंग खेळायचे. आणि मग आम्ही रंग शोधू लागलो. रंग काही मिळेनात. पण अखेर एका चायनिज मॉल मध्ये आम्हाला रंग सापडले. तिकडचे रंग पण छान होते. आपल्या पावडर च्या डब्यासारख्या डब्यात होते. आणि पावडर सारखेच मऊ होते. आम्ही दोन रंग घेऊन घरी गेलो.

गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ५

आम्ही तिकडच्या लोकान्नाही एकदा  पार्टी दिली होती. ह्या सगळ्या ग्रुप चे बॉस एकत्र अशी. त्यासाठी आमचे घर च एकदम सोयिस्कर होते. कारण एकतर मी आणि तृप्ती अशा दोघी सगळी तयारी करणार होतो. तसे ग्रुप मधली मुले चिकन बनवणार होती. पण बाकी सगळे आम्ही बनवणार असल्याने बरे पडले. सौजन्याला आमच्या घरी यावे लागले इतकेच. पण आम्ही केलेले सलाड, छोले, पराठे (हे पराठे आम्ही बाहेरून आणले होते. ), जीरा राईस आणि दाल फ्राय. गोड म्हणून गुलाब जाम केले होते आणि बुंदी रायता. सर्व पदार्थ चांगले झाले होते. पण लोक कमी आल्यामुळे पदार्थ उरले. आलेल्या लोकान्नी मात्र खूप एंजॉय केले. आम्ही तिघी तेव्हा साडी नेसलो होतो. त्यामुळे त्या लोकान्नाही आपला पारंपारीक पोषाख कळला.

माझे हैदराबादमधील प्रशिक्षण-२

त्या दिवशी रविवार असल्याने कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोकांनाही कंपनी कँपसमध्ये प्रवेश करण्याची परवानगी होती. मग बाबा व काका माझ्याबरोबर विजिटर्स पास काढून आत आले. आत थोडे अंतर पुढे गेल्यावर डॉर्मिटरीचा स्वागत कक्ष होता. तिथे मी माझे नाव व डिपार्टमेंट सांगून रूम बुकिंग आहे असे सांगितले. रिसेप्शनिस्टने थोडा वेळ शोधून अशा नावाचे कुठलेच बुकिंग नाही असे उत्तर दिले. माझ्या पोटात गोळाच आला. पण तरीही धीर एकवटून मी 'असे होणार नाही. आमच्या मॅनेजरने आमचे बुकिंग केलेले आहे' असे सांगत त्याला इमेल प्रिंट आउट दाखवली. (खबरदारी म्हणून ती मी नेलेली होतीच). मग त्याने पुन्हा नीट पाहिल्यावर त्याला एकदाचे माझे नाव दिसले. त्याआधी जपानहून माझे ६ सहकारी दाखल झालेले होते. ५ मुले व १ मुलगी होती. डॉर्मिटरीच्या खोल्या ह्या ट्वीन शेअरिंग पद्धतीच्या असल्याने जपानी मुलीच्या खोलीतिल जागा रिकामी होती. त्या रिसेप्शनिस्टने मला 'तू नाओ बरोबर रहाशिल का? ' असे विचारले. मी क्षणभर विचारात पडले पण जपानी मुलीबरोबर राहण्याचा एक वेगळा अनुभव येईल आणि आपले जपानी पण सुधारेल ह्या विचाराने लगेचच हो म्हणून टाकले.

गाणी : खणखणीत नाणी!

काही गाणी हृदयाचा ठाव घेतात. काही सतत गुणगुणावीशी वाटतात. काही नकळत पाठ होतात. काहींचा ठेका आपल्याला भारून टाकतो. काय असतं त्यामागचं गौडबंगाल? का करतात ही गाणी मनावर गारूड?

पूर्वी नव्या सिनेमांतली गाणी सिनेमा आल्यानंतरच ऐकायला मिळायची. किंवा आकाशवाणीवरून. नंतर 'छायागीत' वगैरे प्रकार सुरू झाले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी 'झी'वर 'टॉप टेन' आलं. नवीन गाणी ऐकण्यासाठी मी अक्षरशः अशा कार्यक्रमांवर झडप घालायचो. 'छायागीत'मध्ये आता कुठलं गाणं लागणार, याची कोण उत्सुकता असायची! 'मटा'वगैरे मधल्या जाहिरातींतून 'आज या चित्रपटातील गाणे 'छायागीत'मध्ये पाहा' असा उल्लेख असायचा. आम्ही त्यासाठी अगदी देव पाण्यात बुडवून तन-मन अर्पून भक्तिभावानं टीव्हीपुढे बसायचो.

कटकट---कुणाची?

(आठ वर्षांच्या वरदाने लिहिलेलं नाटुकलं)

"मिनू ssssss ,! कुठे आहेस तू? " आई.
"आई, मी घरचा अभ्यास करतेय. " मनीषा.
"सोड तो गृहपाठ!  आधी मला मदत कर. "
"प्लीज, नको ना!  मला बाई रागावतील. "
"मिनू, आता मुकाट्याने ऊठ.  नाहीतर-----!  ते जाऊदे.  ऊठतेस की नाही? "
"नाही उठत जा!  सारखी आपली कटकट. "
"मिनू,--"
"तुम्ही मोठी माणसं सारखी कटकट करता बुवा!  एक मिनीट विश्रांती घेऊ देत नाही!"
"मिनू, उलट उत्तर देऊ नकोस!"  आई मिनूच्या खोलीत येत म्हणाली.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली.  बाबा आले.  आईला म्हणाले, "अगं सरिता, जरा पाणी दे गं!  घसा कोरडा पडलाय. "
"आत्ता आणते.  जरा एक मिनिट थांबा" सरिता.
एवढ्यात मिनू रडू लागली. रडत रडत म्हणाली, "बाबा, कंटाळा आला---"
"चूप बस! " बाबा--म्हणजे श्रीकांत.
--"आत्ताच दमून आलोय.  ऊठसूट कटकट करतेस! "  बाबा
"मनू, टी. व्ही. बघ. छान गोष्टी लागल्या असतील बघ. " आई.
"हां! " मिनू.
"टी. व्ही. बघायचा नाही. "बाबा.
"का? " मिनू.
(गालातल्या गालात हसत बाबा)-"चक्रम, उलट बघ तू.  छान कार्यक्रम लागलेत. मी आत्ताच बघितलं टी. व्ही. वर. "
"थँक्यू बाबा!"
_____________________________