डोसा

वाढणी
४ जण

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • तांदुळ २ वाट्या (लाँग ग्रेन राइस)
  • उडदाची डाळ १ वाटी
  • चवीपुरते मीठ

मार्गदर्शन

२ वाट्या तांदुळ व १ वाटी डाळ दोन्ही वेगवेगळ्या पातेल्यात दुपारी १२ ला भिजत घालणे. रात्री १० ला मिक्सर/ब्लेंडर मधून बारीक वाटून घेणे. वाटून झालेले पीठ एका पातेल्यात झाकून ठेवणे. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता न्याहरीला किंवा दुपारी १२ वाजता जेवायला डोसे करणे. दुसऱ्यादिवशी हे झाकून ठेवलेले पीठ फसफसून वर येते. आंबट होते.

स्वामी अभिनयाचा 'ऑफर'विना भिकारी!

चित्रपटसृष्टी फार निर्दय आहे. ती नको त्याला डोक्यावर बसवते आणि गरज असेल त्याला बाहेर फेकून देते. याच नियमानुसार एका अतिशय गुणी, प्रतिभावंत कलाकारावर सध्या अन्याय होतोय. गेली काही वर्षं तो पडद्यावर फारसा दिसत नाहीये. पडद्यावर काही वेळा दिसतंय, ते फक्त त्याचं नाव. तो आता (अभिनयाला कंटाळून की काय? ) निर्माता झालाय. 'खेल', 'रक्त', 'भागम भाग', 'मिशन इस्तंबूल'सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे (म्हणजे परदेशात चित्रित झालेले) चित्रपट त्यानं काढलेत. एखादा अपवाद वगळता ते फारसे कुणाला माहीत असण्याची शक्यता नाही, हा भाग वेगळा. पण त्याची चित्रपटसृष्टीवरची निष्ठा वाखाणण्यासारखी आहे. देव आनंद, सावनकुमार, अर्जुन रामपाल, सेलिना जेटली यांची अभिनयावरची निष्ठा कौतुकास्पद आहे ना, तशीच! विशेषतः जी गोष्ट आपल्याला काही केल्या शक्य नाही, तिच्यासाठी आयुष्य खर्ची घालणं, याला निष्ठा म्हणायचं नाही, तर काय?

माझे हैदराबादमधिल प्रशिक्षण

१ ऑक्टोबर २००७ रोजी तुमचे प्रशिक्षण सुरू होत असल्यामुळे ३० सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत कंपनीच्या हैद्राबाद येथिल ऑफिसला पोचावे अशा आशयाची मॅनेजरची इमेल आली तेव्हा पोटात गोळाच आला. खरेतर मी ही कंपनी जॉइन केली तेव्हा मुलाखतीच्या वेळीच मला सांगण्यात आले होते की हैदराबाद येथे प्रशिक्षणासठी जावे लागेल. त्यामुळे मनाची तयारी केलेली होतीच. पण तरीही प्रत्यक्षात जेव्हा जाण्याची वेळ आली तेव्हा मात्र टेन्शन आले. इमेल वाचून मी केदारला, माझ्या नवऱ्याला फोन केला. ती सप्टेंबरची २० तारीख होती. म्हणजे १० दिवसात सर्व तयारी करायची होती. प्रशिक्षण ४ महिन्यांचे होते. (नंतर ते ५. ५ महिने झाले हा भाग वेगळा). त्या  दृष्टीने आम्ही १ यादी केली. तिथे कंपनीच्या कँटीनमध्ये जेवणाची व्यवस्था असल्यामुळे ते सामान न्यायचे नव्हते. इतर आवश्यक वस्तू आम्ही यादीप्रमाणे खरेदी केल्या. आणि बॅगा भरायला सुरुवात केली.

गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ४

सुरीनाम मधे सुरीनाम डॉलर अशी करन्सी वापरली जाते. १ सुरीनाम डॉलर म्हणजे तेव्हा अंदाजे १५/१७ रुपये होते.

गिरीश ला ऑफिस कडून अमेरिकन डॉलर मध्ये पैसे मिळायचे. पण ते कन्व्हर्ट करून घेण्यासाठी आम्हाला कधिच बॅंकेत जायची वेळ आली नाही. ते पैसे आम्ही कॅंबिओ मधून एक्स्चेंज करायचो. हा प्रकार एकदम सोप्पा होता. हे म्हणजे ATM सारखे होते. जाऊन अमेरिकन डॉलर्स टाकायचे आणि त्याच्यातून सुरीनाम डॉलर्स बाहेर यायचे. काही काही तर Drive through होते. म्हणजे कार मध्ये बसून च अमेरिकन डॉलर्स द्यायचे आणि तो माणूस आपल्याला सुरीनाम डॉलर्स देणार. त्यामुळे तिकडच्या लोकान्ना मी जर कधी म्हणाले की हे एकदमच छान आहे की ते म्हणायचे की मग तुमच्या इथे तुम्ही कसे कन्व्हर्ट करता? मी म्हणायचे की बॅंकेत जाऊन.

मसाला कारलं

वाढणी
४ जण

पाककृतीला लागणारा वेळ
45

जिन्नस

  • ३ मध्यम आकारची कारली
  • अर्धी वाटी हरबरा दाळ पीठ भाजून
  • अर्धी वाटी बारीक खोबरे
  • अर्धी वाटी दाण्याचे कुट
  • अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
  • एक मोठा चमचा लिंबाचा रस
  • गुळाचा खडा
  • लसून जीरे कुटून एक मोठा चमचा
  • धने पुड, जीरे पुड
  • दोन मोठे चमचे गरम मसाला
  • चवीनुसार ति़खट, मीठ
  • हिंग, कोथिंबीर, कडिपत्ता, तेल

मार्गदर्शन

रूपाली

मी साधारणपणे चौथ्या वर्गात  असतांना ती एका गुरुवारी आमच्या घरी आली. त्याआधी माझे वडील व मी तिला बघायला गेलो होतो. त्यावेळी तिचे रुप बघून वडिलांच्या तोंडून "रूपाली" असे सहजच निघून गेले. ती खरेच रूपाली होती. डोळ्यात भरणारी शरीरयष्टी, मोठी बाकदार शिंगे व वर्ण पांढरट पण शुभ्र पांढरा नाही. क्षणभर असे वाटायचे की ही कामधेनू तर नाही ना!

गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) ३

नंतर च्या सोमवार पर्यंत मी बऱ्यापैकी रुळले होते. आणि मग मी उत्साहानी सोमवारी सकाळी लवकर उठून प्लॅंट वर जायची तयारी करायला लागले. तिथे पोचल्यावर सर्वात आधी मला कार्ड नसल्याने तेथिल फाईल मध्ये नाव लिहायला सांगितले. मग मला सेफटी ची CD बघायला सांगितली. एक हेल्मेट, एप्रन आणि १ गॉगल दिला. शुज पण देणार होते. पण माझ्या साईज चे शिल्लक नसल्याने शूज साठी मला थोड्या दिवसान्नी दिले. i-card नसल्याने मला आधी फोटो काढून घ्यावा लागला. आणि मग लगेचच त्या लोकान्नी मला i-card तयार करून दिले. ह्या सगळ्या प्रकरणात तृप्ती माझ्या बरोबर होतीच. त्यामुळे ह्या लोकांबरोबर बोलायचे मला काहीच दडपण आले नाही. कारण हे लोक इंग्रजी त बोलताना j ला y म्हणायचे. त्यामुळे मला काही गोष्टी कळायच्या नाहीत.

नारायण धारप - अमानवी अज्ञाताचा आलेख

'रात्री अचानक तुम्हाला दचकून जाग येते.   मिट्ट काळोख. खोलीत दुसरं कुणीतरी असल्याची तुम्हाला शंका येते. मेणबत्तीच्या दिशेनं तुम्ही हात पुढं करता आणि तुमच्या उघड्या तळहातावर कुणीतरी काडेपेटी ठेवतं...... '

जगातली सर्वात  छोटी भयकथा म्हणून ही इंग्रजी गोष्ट प्रसिद्ध आहे.   इंग्रजी साहित्यात भयकथा, गूढकथा, रहस्यकथा या साहित्यप्रकारांना दुय्यम समजले जात नाही. मराठी साहित्यात मात्र हे प्रकार रंजनप्रधान आणि म्हणूनच काहिसे उथळ मानले जातात. एकतर जे जे लोकप्रिय ते ते दर्जाहीन असा एक समीक्षकी समज आहे. तो अगदीच गैरवाजवी आहे असे नाही ( कलाप्रकारांची लोकप्रियता आणि त्यांचा दर्जा यावर नुकताच झालेला एक प्रदीर्घ वाद 'मनोगतीं' च्या स्मरणात असेलच! ). पण अशा सरसकट वर्गीकरणामुळे या प्रकारचे लेखन करणारे सगळे लेखकही सुमार दर्जाचे मानले जाणे हे बाकी चुकीचे आणि अन्यायकारक आहे. नारायण धारप हे अशा अन्यायाचे (कदचित सर्वात मोठे ) उदाहरण आहे. धारपांचा वाचकवर्ग मोठा असला तरी आपल्या आवडत्या लेखकांच्या यादीत धारपांचा समवेश करणे किंवा धारपांची पुस्तकं विकत घेऊन वाचणं असं करायला मराठी वाचकाला अजून संकोच वाटतो असंच चित्र आहे. 'भयकथा' या प्रकाराची उणीपुरी चाळीस वर्षे 'समर्थ' पणे हाताळणी करूनही धारपांना मराठी साहित्यविश्वात मानाचे पान नाही हे मराठी साहित्याचे आणि पर्यायाने मराठी वाचकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.
नारायण धारप यांच्यावर प्रामुख्याने भयकथा लेखक असा शिक्का बसला असला तरीही धारपांची प्रतिभा ही त्याहून अधिक कितीतरी क्षेत्रांना स्पर्श करून जाते.   गूढकथा, विज्ञानकथा, रहस्यकथा, सामाजिक कादंबऱ्या एवढेच काय पण 'चोवीस तास' नावाचे एक नाटकही धारपांनी लिहिले आहे. स्वतः विज्ञान शाखेचे पदवीधर आणि केमीकल इंजीनिअर असलेल्या धारपांनी विस्तृत वाचन केले आहे. अर्थात धारपांचा 'बायो-डाटा' देण्याचे हे काही स्थळ नव्हे, पण धारपांच्या लिखाणातली तर्कसंगती, काल्पनिक कथा लिहितानाही त्यांनी विज्ञानाशी राखलेले इमान आणि त्यांची वस्तुनिष्ठता  ही  धारपांची ही पार्श्वभूमी कळाल्यावर समजून येते. याशिवाय कुशाग्र कल्पनाशक्ती आणि मानवी स्वभावाचे, वागण्याबोलण्याचे अचूक आकलन हे कोणत्याही साहित्यीकाला आवश्यक हे गुणही धारपांमध्ये आहेतच.
या लेखात मी फक्त भयकथाकार धारपांविषयी लिहिणार आहे.   इतर सर्व रसांप्रमाणेच 'भय'  ही मानवी मनाला उत्तेजित करणारी, कदाचित त्यातल्या अनपेक्षिततेच्या छटेमुळे जास्तच उत्कंठावर्धक असणारी भावना आहे.   अज्ञाताचे भय - 'फिअर ऑफ दि अननोन'  हे समजातील सर्व थरांमध्ये दिसून येते. लहानपणी दाराआड लपलेल्याने ' कूक.. ' केल्यावर वाटणाऱ्या हव्याहव्याशा भीतीपासून ते रोलर कोस्टरमधील 'स्केरी राइडस' पर्यंत भयाचा माणसाने मनोरंजनासाठी    वापर करून घेतला आहे. अमानवी शक्ती किंवा सामान्यांच्या भाषेत 'भूत' ही तर भयाची फारच जुनी संकल्पना. धारपांच्या भयकथेमधल्या अमानवी शक्ती रामसे बंधूंच्या सिनेमातल्या भुतांप्रमाणे हिडीस आणि किळसवाण्या नसतात ( काहीवेळा असतातही! ). बहुदा त्या सर्वसामान्य माणसांप्रमाणे, कधीकधी तर त्या अमानवी असल्याबद्दल चुटपुट लागावी अशा लोभसवाण्या असतात. या शक्तींचा उल्लेख करतांना धारप बऱ्याच वेळा 'ते आलं होतं... ' अशी वगैरे वाक्यं लिहून जातात. धारपांच्या कथेची बांधणी इतकी घट्ट आणि पिळदार असते की वाचक जणू एका अदृष्य(अमानवी? ) शक्तीने कथेबरोबर खेचला जातो. आयुष्यभर कटकट्या बायकोच्या वचकाखाला राहिलेली नवरा अखेर मरतो आणि तिच्याच शरीरात शिरून तिच्या देहाचा ताबा घेतो ( 'कवटीतला कैदी'), कुणीतरी  गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या कवठाच्या झाडाच्या आसपास वावरणारी शक्ती रात्री तिथे येणाऱ्या प्रत्येकाला आत्महत्येला प्रवृत्त्त करते ('कवठीचे वळण'), चंद्रप्रकाशात खून झालेली स्त्री चांदण्यात सर्व सजीवांना आपल्या विश्वात खेचून नेते ('चंद्राची सावली'), विमान अपघातात सापडून आपल्या आईवडीलांना मदतीची हाक देत वेदनेने तडफडत मरण पावलेली  छोटी मुलगी आख्खे गावच आपल्या ताब्यात घेते ('सैतान').... धारपांच्या अमानवी सृष्टीची अशी किती उदाहरणे सांगावीत!

एक सुवर्णयोग !!!

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात थोडेफार तरी सुवर्णयोग येत असतात कधी कळत तर कधी नकळत. असे हे योग अपार समाधान देऊन जातात. माझ्याही आयुष्यात १७ ऑगस्टला असाच एक सुवर्णयोग अवतरला. प्रसंग होता आमच्या 'एम्स्ट'विद्यापीठाच्या औपचारिक उद्घाटनसमारंभाचा. उद्घाटन होणार होते मलेशियाचे पंतप्रधान दातो(माननीय)स्री अब्दुल हजी अहमद बडावी यांच्या शुभहस्ते! आम्हाला सकाळी साडेनवालाच ग्रेट हॉलमध्ये बोलाविले होते. हॉलची क्षमता सुमारे २५०० माणसे बसण्याची परंतु तेवढीच माणसे बाहेरही होती. पाहूण्यांचे आगमन १०. ३०वाजता होणार होते. त्या आधी एक तास अत्यंत सुरेल असा संतूरवादनाचा कार्यक्रम झाला‌. सर्वत्र मंगलमय व उत्साहाचे वातावरण होते. ठीक १०. ३० वाजता पंतप्रधानांचे आगमन झाले. नवल ह्याचे वाटत होते की ते कोणाशीही सहजपणे हस्तांदोलन करीत होते.आपल्यासारखी कडक सुरक्षाव्यवस्था नव्हती्. हा कार्यक्रम मलेशियन इंडियन काँग्रेसने आयोजित केला होता. विद्यापीठ स्थापन करण्यामध्ये ह्या पक्षाचा व पक्षातील मान्यवर नेते दातो स्री.सँम्यू वेल्लू ह्यांचा मोठा सहभाग आहे. कार्यक्रमाची सुरूवात महागणपतिवंदनम या नयनरम्य भरतनाट्याने झाली̱. गंमत अशी की नृत्याची सांगता''गणपती बापा मोरया''च्या निनादात झाली. नंतर विद्यापीठाच्या चेअरमनचे स्वागतपर भाषण होऊन मा‌. स्री‌. वेल्लुसाहेबांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर अर्थातच मा. पंतप्रधानांचे भाषण! त्यांनी विद्यापीठाला शुभेच्छा दिल्या‌‌. संगणकाची कळ दाबून उदघाटन केले. भारत व श्रीलंकेचे हायकमिशनरही ह्या समारंभाला हजर राहिले होते. त्यानंतर सर्वांनाच सुग्रास भोजन होते.

गॉड झिज मेट ऑन्स सुरीनाम (गॉड बी विथ अवर सुरीनाम) २

बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि त्याचाच आवाज येत होता. घराचे छप्पर ही लाकडी असल्याने आवाज जास्त मोठा येत होता. खिडकीतून बाहेर उंच गवत दिसत असल्याने मला भीती वाटायला लागली. मी गिरीश ला फोन केला. आणि मग नंतर मला धीर आला. नंतर हळू हळू मला त्या वातावरणाची सवय झाली. गिरीश म्हणाला होता की आठवड्यातून २ दा मेड कामाला येते. भांडी घासून आणि घर झाडून पुसून जाते. तिच्याकडे १ किल्ली असतेच. पण त्या दिवशी घरी असल्याने मी आतून कडी लावून घेतली होती. दुपारी दाराचे लॅच वाजले. मी आतून दार उघडण्याच्या आधी विचारले. "who is this? " पलीकडून काहीच उत्तर आले नाही.   ती मेड पण बहुदा आतून कोणाचा आवाज आला म्हणून घाबरली असावी. मग ती गेली असावी. नंतर मग मला सुनीता म्हणून कंपनीच्या लोकांचे घराचे प्रॉब्लेम्स बघणारी होती तिचा फोन आला. मला ती म्हणाली की तू मेड ला दार का नाही उघडलेस? मी म्हणाले की तिनी उत्तर च दिले नाही. म्हणून नाही दार उघडले. मग ती पुन्हा आली. तेव्हा मात्र मी दार उघडले. मग ती तिचे काम करून गेली. तिला फारसे इंग्रजी येत नसावे. मी बोललेले तिला क्वचित कळायचे. माझी भाषा न कळणाऱ्या कोणत्या माणसाशी बोलायची ही अशी वेळ माझ्यावर पहिल्यांदाच वेळ आली होती. पण तरीही आमच्यात तोडके मोडके संवाद व्हायचे.
तृप्ती संध्याकाळी पाच वाजताच घरी यायची.   त्या दिवशी मी तृप्ती ची वाट बघत बसले होते. ती पण आल्या आल्या आधी माझ्या घरी आली आणि म्हणाली की एकटी घरी बसून कंटाळली असशील. चल माझ्या घरी. मग मी तिच्या घरी गेले. तेव्हा बोलक्या तृप्ती ची आणि माझी लगेचच मैत्री झाली. तिनी मला सांगितले की इकडे कणीक, गूळ, कढीपत्ता अशा गोष्टी मिळत नाहीत. मग तिनी स्वतः साठी भारतातून आणलेल्या  सामानातून मला काही सामान दिले. गिरीश लग्नाच्या आधी तिकडे असताना सकाळी कॅन्टिन मध्ये जेवायचा. आणि मग फक्त रात्री च ४/५ जण घरी भात आणि रस्सा सारखी भाजी बनवून खायचे. त्यामुळे त्यालाही कधी ह्या गोष्टींची गरज भासली नव्हती. नाहीतर मीच भारतातून ह्या गोष्टी घेऊन आले असते. नंतर शनिवार, रविवार मार्केट मध्ये गेल्यावर मला तिकडे काय मिळते ह्याची कल्पना आली. आपल्या भाज्यांपैकी फ्लॉवर, बटाटे, कांदे, लसूण,   भरल्या वांग्याच्या साइज ची वांगी, कोबी, (या सगळ्याचा साइज खूप मोठा होता. त्यामुळे गमतीने मी रानटी भाज्या असे म्हणायचे. ), टोमॅटो, कांद्याची पात मिळायचे. तांदळाची पिठी (मी फिरलेल्या सुरीनाम, जपान, मलेशिया, सिंगापूर ह्या सगळ्या देशांमध्ये चायनीज लोक असल्याने तांदळाची पिठी आणि तांदूळ ह्या गोष्टी सगळीकडे मिळतातच. ) असे मिळायचे. तृप्तीने मला तिकडे एक मैद्याच्या सारखा एक प्रकार दाखवला ज्याच्या पोळ्या त्यातल्या त्यात बऱ्या व्हायच्या. बाकी फ्रोजन मटार,   फ्लॉवर पण मिळायचे. इकडून पोळपाट आणि लाटणे नेले होते. तसेच मी इकडून तूर डाळ नेल्याने भात, आमटी, त्या पिठाच्या पोळ्या, भाजी, क्वचित कोशिंबीर असे पदार्थ मी हळू हळू करायला लागले.
तिकडचे मॉल्स  सोमवार ते शनिवार सकाळी ९ ते संध्याकाळी ४ पर्यंतच चालू असायचे. आणि रविवारी बंदच असायचे. मग सगळी खरेदी शनिवारी सकाळीच आम्ही उरकत असू. चायनीज लोकांचे काही सुपरमार्केटस मात्र रात्री १० पर्यंत चालू असायची. त्यामुळे किराणामालासाठी रात्री गिरीश लवकर घरी आला तर जाता यायचे.
एक आठवडा घरी बसून झाल्यावर मात्र मला कंटाळा यायला लागला होता. कारण अख्ख्या बंगल्यात सकाळी ६ पासून संध्याकाळी ५ पर्यंत मी एकटीच घरी असायचे. मग तृप्ती प्लॅंट च्या IT डिपार्टमेंट मध्ये जायची तिकडे तिनी तिच्या बॉस ला सांगितले की माझी आणखी एक मैत्रीण आहे तिला IT त ल्या कामाचा अनुभव आहे. तर तिच्यासाठी काही काम आहे का इकडे? त्या बॉस नि लगेच त्याच दिवशी फोन वर माझा interview घेऊन मला सोमवारी बोलावले. गिरीशला, मला तर आनंद झालाच. पण तृप्तीलाही माझ्यासाठी खूप आनंद झाला....