आझाद हिंद सेना १ - प्रास्ताविक

     NS portait 

आझाद हिंद सेना!

प्रत्येक हिंदुस्थानियाच्या अंगावर रोमांच उभे करणारे शब्द. आझाद हिंद सेना म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगाला गवसणी घालणारे नेताजी सुभाषचंद्र बोस, चलो दिल्ली च्या गर्जना करीत हिंदुस्थानच्या दिशेने कूच करणारी स्वातंत्र्यसमराच्या कल्पनेने मोहरलेली सेना आणि देशासाठी प्राणार्पण करायला आसुसलेल्या हिंदुस्थानी स्त्रीयांची झाशी राणी पलटण. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसमरात झोकुन देणाऱ्या झाशीच्या राणीचे नाव घेतलेली पलटण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील निर्णायक पर्वातल्या लढ्यासाठी शस्त्रसज्ज झाली हा एक असामान्य योग आहे. भारताचे स्वातंत्र्य 'लक्ष्मिच्या पावलांनी' आले हे शब्द सर्वार्थाने खरे ठरतात.

हसा पण लठ्ठ होऊ नका

सदानंद हॉटेल. क्रॉफर्ड मार्केट येथील एक प्रसिद्ध हॉटेल. हॉटेलची सजावट अतीशय उत्तम. पदार्थही चवदार.पण तेथे एक मोठी समस्या मालकाला भेडसावत आहे. ती म्हणजे, तेथे लावलेली झाडे वाढतच नाहीत. आतां तुम्ही म्हणाल. " ती झाडे शोभेची असतील. प्लास्टीकची असतील " तर तसेही नाही. मी हात लावून पाहिले. अगदी सर्व झाडे, जिवंत, सशक्त आहेत.

उंदीर खिदळतात! ... मला माहित नव्हते. तुम्हाला?

हो. खरे आहे ते म्हणे.

उंदीर आणि आपण ह्यांच्यात शरीररचने शिवाय बरेच काही साम्य आहे. उंदरांना स्वतःचे भान असते. अंगाला ठराविक ठिकाणी गुदगुल्या केल्या की ते खिदळतात. ते आपल्यासारखी स्वप्नेही पाहतात. स्वप्नात संकटांपासून दूर पळू पाहतात.

जमलं का!!

ऑफ़ीस मधून घरात पाउल ठेवताच तुम्हाला बायकोने विचारले  "काय हो, जमलं का ?" तर तुमची काय प्रतिक्रिया असते?

तिने नक्की कशाचं जमलं का विचारले हे कळायला मार्ग नसल्याने सर्व साधारण नवरा (त्यात मी पण आलोच) भांबावून जातो ( प्रामाणिकपणे सांगायचे बरं का !!)

वासूचे ‘वस्तु’शास्त्र...

वासूचे ‘वस्तु’शास्त्र...

सकाळपासून घर नुसतं धुमसत होतं. कशावरून तरी बायकोचं बिनसलं होतं. पण वासु शांत होता.
घरात नेहमी धुसफूस व्हायला लागल्यावर, काही वास्तुदोष तर नाही ना, हे पाहण्यासाठी वासुनं संजूबाबांना वर्तमानपत्रात पत्र लिहिलं, आणि संजूबाबाचं उत्तर आल्यावर ती पिशवी समोरच्या खुंटीवर अडकवून ठेवली.
घरातल्या कटकटींना वैतागलेल्यांना संजूबाबा त्यांच्या वास्तुशास्त्राच्या सदरातून सल्ला देतात आणि एकदम जालीम उपाय सुचवतात असं ऑफिसातल्या कुणीतरी त्याला सांगितलं होतं.
घरातल्या भांडणापासून मुक्ती हवी असेल, तर दोघांची मिळतीजुळती आठवण असलेली एखादी वस्तू समोरच्या खुंटीवर टांगून ठेवा, असं संजूबाबांनी सुचवलं, तेव्हा पहिल्यांदा अशी कोणतीच वस्तू वासूला आठवेना.
विचार करताकरता अचानक वासूचं लक्ष कोपऱ्यातल्या खुंटीकडे गेलं...
एक मळकट, जुनाट पिशवी तिथे धूळ खात पडली होती. त्या पिशवीचा इतिहास आठवून वासुचे डोळे अचानक चमकले आणि पिशवीवरची धूळ झटकून त्यानं ती समोरच्या खुंटीवर अडकवली.
वासूचा हा उद्योग सुरू असताना पुन्हा बायको बाहेर आली, आणि फणकाऱ्यानं खुंटीवरच्या पिशवीकडे पाहून एक जोरदार हुंकार देत ती आत वळली.
वासूनं पुन्हा त्या पिशवीकडं पाहीलं. बायकोलाही ती पिशवी चांगलीच लक्षात राहिली होती, हे त्यानं ओळखलं.
बायकोच्या चिडण्यामुळे आपण आता अजिबात अस्वस्थ नाही, असा अनुभव वासूला लगेचच आला. त्यानं मनात संजूबाबाचे आभारही मानले.
तेवढ्यात वासूचा मुलगा समोर येउन बसला आणि ठरल्यासारखं त्यानं मुलाला लाकूड्तोड्याची गोष्ट सांगायला सुरुवात केली...
जंगलातनं लाकडं घेऊन येताना एका लाकूडतोड्याला तहान लागली, म्हणून वाटेवरच्या विहीरीतून पाणी काढण्यासाठी तो हातातली कुऱ्हाड बाजूला ठेऊन वाकला, तेवढ्यात कुऱ्हाड विहिरीत पडली. लाकूडतोड्या रडायला लागला. तेवढ्यात प्रत्यक्ष देव विहिरीतून वर आला.
समोर खुंटीवर लटकणाऱ्या पिशवीकडे पाहात वासू गोष्ट सांगत होता...
देवाच्या हातात सोन्याची कुहाड होती. त्यानं लाकूड्तोड्याला विचारलं, ‘हीच का तुझी कुऱ्हाड?’
लाकूड्तोड्यानं रडतच मानेनंच नाही म्हणून सांगितलं आणि तो पुन्हा रडायला लागला...
मग देवानं चांदीची कुऱ्हाड आणली. लाकुड्तोड्या पुन्हा नाही म्हणाला, म्हणून त्यानं लोखंडाची कुऱ्हाड आणली.
लाकूडतोड्या लगेच म्हणाला, ‘हीच माझी कुऱ्हाड’... लाकूडतोड्याच्या प्रामाणिकपणावर देव खुश झाला, आणि त्याला सोन्याची आणि चांदीचीपण कुऱ्हाड बक्षीस देऊन अंतर्धान पावला.
... गोष्ट सांगून संपली तरी वासूचं मन गोष्टीतच अडकलं होतं. मधेच त्याची नजर खुंटीला टांगलेल्या पिशवीकडे वळत होती... विचार करताकरता त्याचा डोळा लागला..
----------
संध्याकाळची वेळ होती. बायकोबरोबर वासू गावाबाहेर फिरायला गेला होता, बायकोही खुशीत दिसत होती, म्हणून वासूनं सहज तिच्या माहेरचा विषय काढला. आणि अचानक काहीतरी बिनसलं. बायको थबकून रस्त्याकडेच्या विहिरीच्या कठड्यावर बसली.

मल्हारगड आणी कानिफ़नाथ

पुण्याजवळचा मल्हारगड हा तसा दुर्लक्षीत किल्ला. एका दिवसाची सहल मारायची असेल तर हे एक ठिकाण विचारात घ्यायला काहीच हरकत नाही. ह्याच्या बरोबरच कानिफनाथही जोडता येते. वरपर्यंत गाडीमार्ग जात असल्यामुळे चढण फार नाही..
विकीमॅपिआ वरचे
कानिफनाथ आणी मल्हारगड

कानिफनाथ ...
पुण्यावरून जाताना हडपसर मधून सासवड कडे एक फाटा जातो.. हडपसर चा फ्लायओव्हर च्या खालून हा फाटा असल्यामुळे हा फ्लायओव्हर न घेता खालून गेले तर उत्तम.. नाहीतर परत मागे येऊन रस्त्याला लागावे लागते.

ह्या रस्त्यानेच पुढे गेल्यावर वडकी गावापाशी, दिवेघाटाच्या अलीकडे, एक कमान लागते. त्या कमानीच्या जवळपास २०० मी. अलीकडे कानिफनाथाकडे असा बोर्ड लावला आहे ( विकीमॅपिआ ). वडकी गावात कोणालाही विचारले तरी तो रस्ता सांगेल.. आम्ही ज्याला विचारले तो बिहारी निघाला.. तो बहुतेक आम्हाला मराठीत बोलताना बघून घाबरला आणी मालूम नही म्हणून चालू लागला.. नंतर तोच परत आला आणी पहाडका मंदीरना असे विचारून रस्ता सांगितला.

हा रस्ता आहे छोटेखानी ट्रेककरता.. ह्या रस्त्याच्या आजूबाजूला शेती असल्यामुळे पावसाळ्यात हा परिसर नयनरम्य दिसतो. वाटेवर एक बंधाराही बांधला आहे. त्याला फोटो मध्ये मी न्याय देऊ शकलो नाही.. पण प्रत्यक्षात हे तळे १०-१५ मिनिटे बसून डोळ्यात साठवून घेण्यासारखे आहे. जरासे पुढे गेल्यावर रस्ता एका ओढ्याच्या कडेने जातो.. पावसाळ्याच्या दिवसात हा ओढा भरून वाहत असल्यामुळे गाड्या इथेच सोडून पायी निघावे लागते. पावसाळा नसेल तर गाड्या पुढे कुठल्यातरी घरात लावता येतील. पण पावसाळ्यात उघड्यावर (बीना राखणीच्या) गाड्या लावून पुढे जावे लागते. वाट तशी मोठी आणी बर्‍यापैकी मळलेली आहे.. कानिफनाथाचे मंदिरही दिसत असल्यामुळे चुकण्याची शक्यता नाहीच.. जवळपास ५-६ पर्वती इतकी चढण आहे( फोटो ). चढायला १ ते १:१५ तास खूप झाला.. वाटेत सावलीला झाडे कमी आहेत... त्यामुळे उन्हाचे चढणे टाळावे.. हे आहे वाटेवरून खाली दिसणारे दृश्य

वरती गेल्यावर दोन मंदिरे दिसतात. एक उंचावर आहे ते कानिफनाथाचे. डावीकडून एक गाडीरस्ता वरपर्यंत आलेला दिसतो. तो सासवड कडून आला आहे. खाण्याच्या टपर्‍या, पाण्याची टाकी इथे असल्यामुळे खाण्याचे काही नेले नाही तरी चालू शकते.

कानिफनाथाच्या मंदिरासाठी अजून काही पायर्‍या चढून वर यावे लागते ( फोटो ).. मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे. त्यात सरपटत आत शिरावे लागते. तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो.. आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते. कदाचित ह्यामुळेच महिलांना आतमध्ये प्रवेश नसेल.. आतमध्ये शिरल्यावर अंधाराला डोळे सरावतात आणी थोड्याच वेळात समाधी नीट दिसू लागते. मशीदी सारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसले. बाहेर येताना जसे आत शिरलो तसेच बाहेर पडता येते..

मंदिराच्या इथून पुण्याचे दर्शन होते. लांबवर कात्रज मधले जैन मंदिर, बापदेव घाट असे दिसते. कानिफनाथ ते बापदेव घाट ह्यामध्ये डोंगरावर बांधकाम दिसले. विचारल्यावर कळले की ती जमीन आता बंगले बांधण्यासाठी कुणीतरी विकत घेतली आहे. दिवे घाटाच्या पलीकडे दूरवर मल्हारगडाचा एक भाग दिसतो.

कानिफनाथाला एक वाट दिवे घाटातूनही येते. डोंगराच्या माथ्यावरून चालत चालत कानिफनाथापर्यंत येता येते.
वरती ज्या गाडीरस्त्याबद्दल सांगितले आहे तो सासवडमधून येतो. सासवड मध्ये एक चौक आहे..( विकीमॅपिआ ) त्यातील एक रस्ता नारायणपूर ला जातो. एक जेजुरी ला जातो. आणी एक बापदेव घाटाकडे येतो. हाच बापदेव घाट पुण्याला कोंढव्याला (लुल्लानगर) निघतो. बापदेव घाटाच्या रस्त्यावरून निघाले की जवळपास १०-१२ कि.मी. वर कानिफनाथाकडे फाटा फुटतो ( विकीमॅपिआ ). एक मोठी कमान असल्यामुळे हा फाटा चुकण्याची शक्यता नाही.. कोणाला फक्त कानिफनाथ करायचे असेल तर कोंढवा-बापदेव घाट ह्या मार्गाने करता येईल.. सासवडपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही..

मल्हारगड ..
पुण्यावरून येताना दिवे घाट पार केल्यावर झेंडेवाडी म्हणून एक गाव लागते (
विकीमॅपिआ ). काळेवाडीतूनही घुसता येते.. दोन्ही रस्ते नंतर एकमेकांना मिळतात.. तिथून हा किल्ला जवळ आहे... रस्ता पार वरपर्यंत जातो. सोनोरी गावातूनही रस्ता आहे.. पण त्यासाठी दिवे घाट ओलांडून जरा अजून पुढे जावे लागते.. सोनोरी गावात बरीच देवळे सुद्धा आहेत.

झेंडेवाडीतून पुढे गेल्यावर मल्हारगड दिसायला सुरुवात होते ( फोटो ). रस्ता खडीचा आहे.. पण बाइक नेण्यासारखा आहे ( फोटो ). आजूबाजूला शेती आहे आणी पावसाळ्याच्या दिवसात सगळे हिरवेगार दिसते. ( फोटो )
गडाच्या जवळपास वरपर्यंत गाडी जाऊ शकते (
विकीमॅपिआत वरपर्यंत रस्ता दिसत आहे). पण खाली पायथ्याशी गाडी लावून वरती चालत गेले तरी १५-२० मिनिटांत माथ्यापर्यंत पोचता येते. डोंगर बोडका असल्यामुळे आपण चढू ती वाट असे म्हणायला हरकत नाही..( फोटो ) ह्या बाजूने दरवाज्याचे अवशेष दिसत नाहीत. पण बुरूज पूर्णपणे ढासळला आहे त्यावरून चढून गडात प्रवेश करू शकतो.. ( फोटो )

गडाचा पसारा मोठा नाही. जराश्या उंचीवर बालेकिल्ल्यासारखी तटबंदी आहे.. त्यात दोन मंदिरे ( फोटो ) आणी काही जोती दिसतात ( फोटो ). २ विहिरी आणी एक मोठे टाकेही गडावर आहे. टाक्यात उतरून पाणी सहज काढण्याजोगे आहे. ( फोटो )

सोनोरी गावाच्या बाजूला गडाचा मुख्य दरवाजा आहे.. हा दरवाजा बर्‍यापैकी शाबूत आहे. ( फोटो ) गडाच्या कडेकडेने पूर्ण गडाला प्रदक्षिणा घालता येते. उत्तरेकडे अजून एक दरवाजा दिसतो.. पण तिथून कोणी आताशी चढत नसावे..

वरती असलेल्या दोन मंदिरांपैकी एक शंकराचे आहे तर दुसरे मल्हारदेवाचे असावे ( फोटो ). शंकराच्या मंदिरात कुणीतरी राहत असल्यामुळे कुलूप होते..पण दुसर्‍या मंदिरात आतमध्ये बसून विश्रांती घेता येईल. ६-७ जण बसू शकतील एव्हढे मोठे हे मंदिर आहे.

वरून पुरंदर, कानिफनाथ वैगरे दिसू शकतात ( फोटो ). कानिफनाथ, मल्हारगड ही सर्व भुलेश्वरच्या रांगांवरील ठिकाणे. जास्ती उंचही नाहीत. पूर्वेकडे पाहिले तर लांबच लांब पठार दिसते. बाकीच्या गडांसारखे मनोहारी दृश्य दिसत नसल्यामुळे हा किल्ला तसा उपेक्षीतच आहे. (मनोहारी हा शब्द व्यक्तीसापेक्ष आहे) .
गडावरून दिसणारे
दृश्य .

वरती मस्तानी तलावाविषयी लिहायचे राहिले. दिवे घाट चढताना मस्तानी तलाव दिसतो. तलाव बर्‍यापैकी मोठा आहे.. आणी जुन्या पद्धतीचे बांधकाम आहे. दिवेघाटातून दिसणारा मस्तानी तलाव ( फोटो ).

बापदेव घाटाच्या माथ्यावरही एक मंदिर आहे. ह्या घाटातूनही पुणे मस्त दिसते. बापदेव घाटापासून कानिफनाथ पर्यंत जागा बहुतेक विकली गेली असावी. तिथे तालाब असा बोर्ड आहे.

एका दिवसात मल्हारगड-कानिफनाथ करून संध्याकाळच्या आत पुण्यात येता येते.

सकाळी ८:३० ला निघून वडकी वरून आम्ही कानिफनाथ केले आणी झेंडेवाडी तून जाऊन मल्हारगड केला.. येताना बापदेव घाटातून परत पुण्यात ३:१५ च्या आसपास पोचलो.

:-आनंद

चित्रपट गृहातला विनोद.

मी आणि माझ्या पेक्षा मोठा माझा आतेभाऊ-बबलू, आम्ही दोघे 'चोरी चोरी चुपके चुपके' सीनेमा बघायला गेलो होतो. मी त्यावेळी लहान होतो, पण इतक माहीत होते कि तो दोनदा नापास झाला आहे.

                   सीनेमा चालू होता. एका प्रसंगात राणी मुखर्जी गरोदर असते आणि अपघाताने जीन्या वरून खाली पडते. तिला तातडीने दवाखान्यात नेतात. डॉक्टरांचा रीपोर्ट येतो, की तीचा गर्भपात झाला आहे. सगळीकडे चिडीचुप शांतता पसरलेली होती. प्रेक्षक गंभीर झाले होते. एवढ्यात बबलू पचकला-'अरेरे, बिचारीचे वर्श वाया गेले'.

हितचिंतक

एकदा मी माझ्या तंद्रीत चाललो होतो. एका वळणाशी येऊन पुढचे पाऊल टाकणार तोच मला आवाज आला, "थांब!! एक पाऊलही पुढे टाकू नकोस. वरची बाल्कनी तुझ्या डोक्यावर पडेल." मी थांबलो, अन काय आश्चर्य खरेच वरून एक आख्खीच्याआख्खी बाल्कनी माझ्या पुढ्यात पडली. मी मागे वळून पाहिले, तिथे कुणीच नव्हते. आजूबाजूसही लोकं अपघात पहायला पुढे धावली होती. त्यात कुणीही माझ्याकडे पाहत नव्हता.

असेच काही दिवस गेले. मी रस्त्याने चाललॊ होतो. हातात हिने खरेदी केलेल्या कपड्यांच्या पिशव्या होत्या. ही बरीच मागे आपली पर्स सांभाळण्यात गुंतली होती. मी रस्ता क्रॉस करणार तोच मला पुन्हा त्यादिवशीचा आवाज ऎकू आला, "थांब. एक पाऊलही पुढे टाकू नकोस. एका ट्रकचा ताबा सुटलाय अन तो लाल दिवा तोडणार आहे." अन खरंच काही क्षणातच माझ्या समोर एक ट्रक भरधाव वेगाने सिग्नल तोडून गेला.

मी हडबडलो. "तू कोण आहेस?" मी जोरात म्हणालो पण कुणीच उत्तर दिले नाही. पण तो आवाज मला माझ्या मनाचा वाटत होता. मी मनातच विचारलं, "तू कोण आहेस?"

तो म्हणाला, "तुझा मित्र, हितचिंतक, तुझा प्रारब्ध!"

मी डोळ्यात पाणी आणून म्हणालो, "थॅंक यू!"

तो जडावलेल्या स्वरात म्हणाला, "वेलकम"

मी रडत रडत त्याला प्रश्न केला, "खूप उशीरा भेटलास रे! मी लग्न करताना कुठे होतास?"
तो रागात म्हणाला, "तो थेरडा भटजी माईकवर एवढ्या जोराजोरात मंगलष्टके म्हणत होता की माझा आवाज तुझ्या कानांशी पोचण्याधीच विरून गेला!!!!!"

आखाती मुशाफिरी ( २९ )

गृहखात्याचे सचीव उद्या येणार आहेत. तुझे काम बघायला.
--------------------------------------------------
नेहेमीपेक्षा मी कारागृहावर जरा लवकरच पोहोचलो. इदी त्याहीपेक्षा आधी येऊन पोहोचला होता. आज तो नेहमीपेक्षा थोडा अधिकच झकपक दिसत होता. बहुदा गृहखात्याचे सचिव पाहुणे येणार होते हे कारण असावे. मी आत्तापर्यंत झालेल्या कामाचा एक धावता आढावा घेत होतो इतक्यात बॅटी कामगारांसह हजर झाला. मग आम्ही दोघेही झालेल्या कामाचा एकत्रितपणे आढावा घेऊ लागलो. मी कांही टिपणेही तयार केली. नाही म्हटले तरी वातावरणात थोडासा तणाव जाणवत होता. आभासी छताचे काम करणारी टोळीदेखील कांही वेळात येऊन ठेपणार होती. त्यांना तसा निरोप कालच गेलेला होता. पण त्यांना तो काल द्यायला नको होता असं वाटायला लागलं. त्या कामाचाही असाच भलामोठा पसारा असतो हे मला माहिती होते. आता या येणार्‍या पाहुण्यासमोर तो पसारा होऊ नये असं मला वाटलं. हा पाहुणा नेमकी काय काय पहाणार याचा कांही अंदाज करणार नव्हता. अशी वरच्या उद्द्याची माणसे कधी कधी फार काही न पहाता वरवर जुजबी चौकशी करून जातात असाही अनुभव होता. पण न जाणो पाहुण्याने सखोल चौकशी केलीच तर आपली तयारी असलेली बरी म्हणून मी कांही बाबींचा विचार करीत होतो.

एक फुली

स्बअभियांत्रिकी शिक्षण घेत असतानाचा कॉलेज मधला किस्सा:

सबमिशनची तारीख जवळ येउ लागली तसे सगळे विद्यार्थी आपापले प्रयोग-लेख (एक्सपेरिमेंट पेपर्स) पुर्ण करून सरांकडून तपासून घेत होते. माझा लेख सरांनी तपासायला घेतला आणि शेवटी सही साठी शेवटचे पान उघडले. आता एकदाची सही झाली की सुटलो बुवा ! अशा विचारात मी अधीरपणे वाट पहात मी टेबलाजवळ उभा राहीलो. तेवढ्यात सरांचे लक्ष एका आकृतीवर पडले आणि त्यांनी पेन्सीलने एक छोटी फ़ुली करून चूक दाखवली. "तेवढी चूक नक्की दुरुस्त कर बर कां " असे सांगून सही केली व माझा लेख पुर्ण झाला.