हसा पण लठ्ठ होऊ नका

जंगलातून जात असतानाना एका वाघाची डरकाळी ऐकून गजाननराव टरकलेच. पण करणार काय. एवढ्यात वाघ समोरच आला. गजाननरावानी हनुमानचालिसा सुरू केली.

वाघाने एक उडी मारून " वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे " सुरू केले.

गुरुजी

लोकशाही..

"लोकशाही चे आधारस्तंभ" कोणते आहेत? या बाबत कोणास माहीती असेल तर मला सांगावी.

१. पोलिस यंत्रणा

२. न्यायालय.

मला इतकेच आठवताहेत. बाकीचे माहीती करून घ्यायचे आहेत.

- प्राजु.

लादेन आणि पुण्यातील रिक्‍शावाला....

पुणे तेथे काय उणे, याबाबत कुणाचेही दुमत नसावे. पुणे ते पुणेच. तेथील सारे काही वेगळे. रिक्षावाले सुद्धा....!
बाकी सर्व ठिकाणचे रिक्षावाले चालवताना किंचित तिरके (म्हणजे सुकाणुच्या उजव्याबाजूला अधिक झुकलेले) बसलेले असतात. तर पुण्यातले भाऊ सरळच. गंतव्य ठिकाण सांगितले तर चेहऱ्यावरची रेषही न हलवता मिटरचा खटका खाली ओढतात. आम्हालाही असाच एक भेटला.
खाकी पॅन्ट. किंचित पिवळसर झालेला पांढरा शर्ट. उंची जेमतेम पाच फूट असेल. तब्येत मजबूत. खुरटी दाढी. वरचं जंगल मात्र "तम्मा तम्मा लोगे' गाण्यातील संजय दत्त सारखं. आधीच लांबुळकं तोंड. त्यात गुटख्याचा तोबऱ्यामुळे त्याचा झालेला हनुमान आणि डोक्‍यावर सदैव सैनिकासारखे ताठ उभे असलेले केस. काहीसा डायनासोरसारखा दिसणारा.

आखाती मुशाफिरी ( २८ )

  मी आज्ञाधारक मुलाप्रमाणे ते कागद फाडून टाकले आणि कामाच्या ठिकाणी निघालो.
---------
बॅटीने गजानन-महादू या जोडगोळीकडून ब्रॅंच डक्ट्स्‌चे काम जवळ जवळ संपवत आणलेले होते. तिकडे मी दाखवल्याप्रमाणे सुर्वेने वामनच्या मदतीने मेन डक्टस्‌चे उचकलेले जोड ठीक करण्याचे काम सुरू ठेवले होतेच. आता आभासी-छत (false ceiling) लावण्याचे काम सुरू होणे गरजेचे होते. त्यानंतर वात प्रसारक जाळ्या (air diffuser grills)  लावण्याचा कामाचा शेवटचा टप्पा सुरू करत आला असता. मला तिकडे येतांना पाहून बॅटी सामोरा आला. त्याचाशी थोडी चर्चा करायचीच होती.

एक वात्रटणाचा किस्सा

मी विद्यापीठामधे शिकत असतानाची गोष्ट आहे. तेंव्हा आताच्या सारखे मेसेंजर्स/चॅट नव्ह्ते. अहो मेसेंजर्स काय तर तेंव्हा आमच्या लॅबमधे इंटरनेट पण नव्हते. त्यामुळे लॅबमधे एक्मेकाशी चाट करता येत नसे. ही अडचण सोडविण्यासाठी मग मी स्वत:च एक साधे सॉफ्टवेअर डेव्हलप केले ज्याने लॅन वरील दोन संगणकांमध्ये चाट सारखे संभाषण करता येऊ शकत होते. आता ह्या सॉफ्टवेअर विषयी सर्वाना सांगण्यापुर्वी मला एक गम्मत करायची सुचली. त्यानुसार मी माझ्या महेश नावाच्या एका मित्राला पलिकडच्या एका संगणकावर बसविले आणि काही मुलांना बोलवून सांगितले की मी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) वापरून हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. तुम्ही काहीही प्रश्न विचारा, माझे सॉफ्टवेअर त्याचे उत्तर देईल. झाले! मुलानी प्रश्न विचारले आणि महेशने तिकडून उत्तरे दिली. अर्थात, त्यावेळी एआय बेस्ड असे दुसरे एक सॉफ्टवेअर आमच्या वर्गात फ़ार गाजत होते त्यामुळे माझे हे सॉफ्टवेअर पण तसेच काही असेल असे वाटल्याने कुणाला काही शंका पण आली नाही. सर्वाना वाटत होते की माझे सॉफ्टवेअरच उत्तरे देत आहे.

दिवाळीच्या गोष्टी - भाग १

अतीव उत्साहाने दीपावलि साजरी करताना अनेकदा 'हे असेच का ?' हा प्रश्न आबालवृद्धांना सतावतो. दीपपर्वाशी संबंधित असलेल्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकी काही अशा आहेत.

नरक चतुर्दशी

कामरुप देशात नरकासुराचे अत्याचार वाढत्या प्रमणात होते. देव आणि मानव यांना त्याच्या मगरमिठीतून सुटण्याची इच्छा होती. तेव्हा भगवान विष्णूनी नरकासुरास आपल्या सुदर्शन चक्राचे भक्ष्य वनविले. परंतु अंतसमयी चलाख नरकासुराने भगवंताकडे एक वर मागितला.

खरी गोष्ट

रेवा गावात रामचन्द्र नावाचा एक माणूस होता. उपदेशपुर्ण व्याख्याने देण्यात तो मोठा पटाईत होता. चांगला प्रसिद्ध वक्‍ता होता तो, त्याच्या व्याख्यानांना चांगली गर्दी जमे. पण तो थोडासा विसराळू होता. त्यामुळे कधी-कधी त्याची चेष्टा केली जाई.

विजयकुमारची चतुराई

फार फार दिवस झाले. किरणनगरीत विजयकुमार नामकं एक तरुण राहत होता. अतिशय शूर, वीर आणि चतूर होता तो. एकदा एका लढाईत तो जखमी झाला. परदेशी सेनेनं घायाळ कुमाराला पकडून नेलं व कैदेत ठेवलं. काही दिवसांनी विजयला बादशहासमोर दरबारात आणलं. तिथं शहाला लवून सलाम करणं जरूरी होतं पण अभिमानी कुमाराला ते का रुचतं ? तो गुपचिप उभा राहिला. हे बघुन शहाच्या डोळ्यातून आगीची बरसात होऊ लागली. अन तोच कुमाराला यावर तोड सुचली.

लोकमान्य मुद्रा

सर्वांना आनंद आणि अभिमान वाटावा अशी बातमी आज ई सकाळमध्ये वाचायला मिळाली. तुम्हालाही ती सांगावी म्हणून खाली उतरवीत आहे -

ई सकाळातली मूळ बातमी : पाच रुपयांच्या नाण्यावर लोकमान्यांची प्रतिमा

पुणे, ता. २० - लोकमान्य टिळक यांच्या १५० व्या जयंती वर्षाची सांगता होत आहे. या वर्षाच्या सांगतेचे औचित्य साधून लोकमान्यांना आदरांजली वाहण्यासाठी लोकमान्यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे नाणे केंद्र सरकारतर्फे तयार करण्यात आले आहे. ........
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत २३ जुलैला आयोजित करण्यात येत असलेल्या विशेष कार्यक्रमात या नाण्याचे अनावरण होणार आहे.

लोकमान्य टिळकांच्या जीवनाचा वेध घेणारा "मेकर ऑफ मॉडर्न इंडिया' हा ग्रंथ टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने तयार करण्यात आला असून, या ग्रंथाचे प्रकाशनही या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. डॉ. दीपक टिळक यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना, त्यांच्या आठवणी; तसेच लोकमान्यांची दुर्मिळ छायाचित्रे आदींचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे.

डॉ. दीपक टिळक यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ""नवी दिल्लीत तीन मूर्ती भवन या ऐतिहासिक वास्तूत हा कार्यक्रम होणार आहे. केसरी-मराठा संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ व लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमासाठी गृहमंत्री शिवराज पाटील, कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह विविध नेते उपस्थित राहणार आहेत.''

लोकमान्यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे नाणे एक ऑगस्टनंतर पुण्यात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अजुन आठवे ती...

                अनुभव गाठीशी जमावा म्हणून केलेल्या नोकर्‍याच कधीकधी आपल्याला काही अविस्मरणीय अनुभव देतात. साडेपाच कधी वाजतायत याकडे डोळे लागलेले असायचे त्या चाकरमानी कालखंडातलीच ही गोष्ट. तेव्हा एका जपानी बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये मी भाषांतरकार/दुभाषी म्हणून नोकरी करत होते. यंत्रसामुग्री तयार करणारी ती एक इंजिनीयरींग कंपनी होती. साहजिकच एखाद्या फॅक्टरीला असणारी सर्व वैशिष्ट्ये (आणि वर जपानी शिस्त!) तिथेही होती. उदाहरणार्थ सर्व स्टाफला (टेक्निकल असो वा नसो) युनिफॉर्म अनिवार्य असणे, लंचटाईम किंवा शिफ्टची वेळ अधोरेखित करण्यासाठी शाळेसारखी बेल होणे वगैरे वगैरे. एक सकाळी नऊची बेल झाली की मग दुपारी लंच अवरची आणि मग संध्याकाळी पहिली बेल ५:२० ला आणि शेवटची बेल ५:३०ला असा सिलसिला असायचा. (५:२०ची बेल अशासाठी की युनिफॉर्म बदलून घरी जाता यावे म्हणून. यासाठी १० मिनिटे उदार मनाने देण्यात आली होती. पण केवळ ऑफिस ते घर इतक्या अंतरासाठी युनिफॉर्म बदलण्याचा मला प्रचंड कंटाळा यायचा त्यामुळे ५:२०लाच मी सर्वांच्या आधी घरी जायला तयार असायचे. युनिफॉर्म मुळे 'अनेक वर्षे एकाच यत्तेत नांदणार्‍या' प्रजेतलीच मी एक असा सर्वांचा समज होण्याची शक्यता नाकारता येत नसे. पण मला त्याची पर्वा नसायची. (अशीच एक समविचारी मैत्रिण तिथे होती. त्यामुळे या युनिफॉर्म न बदलण्याच्या बाबतीत आमच्या दोघींचं 'कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना' हे मत ठाम असायचं.)