चौतीस तास

दोन वर्षांपूर्वीची २६ जुलै, या वर्षीची ३० जून आणि तत्सम कोसळपावसाचे अनुभव वाचून मला अठरा वर्षांपूर्वी (१९८९ साली) चौतीस तास खर्चून केलेला मुंबई-पुणे प्रवास आठवतो. त्याचा हा वृत्तांत.

आता मी चाळिशीची (अदृश्य) भिंत पार केलेली आहे. त्या वेळी मी ऐन तेविशीत होतो. माझ्या वयाचा या निवेदनाशी काही संबंध नाही. म्हणूनच हा उल्लेख.

सोयरा - २

भारतात स्थलांतराची तयारी करायला लागलो, तेव्हाच खरंतर कुत्रा पाळण्याचं मिनी-ऍडवेंचर माझ्या आणि बायकोच्या मनात उचल खाऊ लागलं होतं. पण स्थलांतरानंतरच्या पहिल्या तीनचार महिन्यात मुक्ताची मानसिक स्थिती इतकी नाजुक झाली, की (मुक्ताच्या सुदैवाने म्हणा वा दुर्दैवाने) एक थेरपी/विरंगुळा म्हणून पिलू आणायची घाई करावी असा विचार डोकावू लागला.

हल्ले - चुकवण्यास अवघड

       काही हल्ले इतक्या अनपेक्षित दिशेतून आणि अचानक आपल्यावर होतात की त्यातून वाचावे कसे हा मोठाच प्रश्न माझ्यासारख्याला पडतो.म्हणजे असे पहा तुम्ही तुमच्या मित्राकडे अगदी त्याला पूर्वकल्पना देऊन गेलात पण अचानक त्याचे काही काम निघाल्यामुळे तुम्ही जाता  तेव्हां तो तुम्हाला बसायला सांगून आताच परत येतो असे सांगून शेजारीच त्याच्या छोट्या गोड मुलाला राजूला "अरे काकाशी गप्पा मार बरका " असे बजावून जातो. अशा वेळी मित्रपत्नी पण आपले कर्तव्य पार पडण्याच्या उद्देशाने तेथे येते आणि इथेच सगळा मामला बिघडतो.कारण आपल्या मनोरंजनासाठी राजूचा उपयोग करायचा तिने ठरवलेले असते ( किंवा राजूच्या मनोरंजनासाठी माझा ?) आपण पेपर वाचण्याचा बहाणा केला तरी ती राजूला अगदी पलीकडल्या फ्लॅटमधील व्यक्तीसही ऐकू जाईल अशा आवाजात विचारते," राजू तुझ नाव नाही का सांगणार काकाना ?"(किंवा तुज्य नाव नाही का छांगनाल काकाना लाजुड्या " अस राजूपेक्षाही बोबड्या भाषेत) अर्थात आपणही इतके काही माणुसघाणे नसतो की अशा आवाहनाकडे दुर्लक्ष्य करावे ( आणि असलोच तरी राजूमाता थोडीच बसलीय आपल्याला ते स्वातंत्र्य द्यायला।) अर्थातच आपल्याला खोटे खोटे का होईना मार्दव  सुरात आणून व तोंडावर उसने अवसान आणून विचारावच लागत," अरे वा ,बाळ कायरे नाव तुझ सांग बर "पण राजूच्या आईला अशा जुनाट पद्धतीने नाव विचारणे मुळीच मंजूर नसते.ती माझ्याकडे एकाद्या बावळट प्राण्याकडे पहावे तसा केविलवाणा दृष्टिक्षेप टाकून मला म्हणते "अहो तो इंग्लिश मीडियममध्ये जातो ना त्यामुळ त्याला तसेच विचाराव लागत," राजू, व्हॉट इज युवर नेम ?" खरतर दोन मिनिटापूर्वीच तिन मराठीतच नाव विचारलेल असत हे तिच्या निदर्शनाला आणावे अस मला वाटत पण आपला मान आपणच राखावा असे म्हणतात ना म्हणून मी गप्प बसणे पसंत करतो.

पाऊस आणि मुंबई

मी २६ जुलै २००५ आणि २७ जुलै २००७ या दोन्ही वेळेस पावसात अडकलो आहे. २६ जुलै २००५ च्या पावसानंतर चार दिवसानंतर लोक कामाला जायला निघतात. इकडे ट्रेन सुरळीत चालू होत नाही तरी प्रचंड गर्दीत ही, १-१ तास ट्रेन उशिरा ने ही धावत असतील तरी हि लोक लटकत लोंबकळत आपल्या ऑफिस पर्यंत गेली होती. मी विचार करतो कशासाठी हे सगळं. मी २६ जुलैला कुलाबा ते विक्रोळी पायी प्रवास केला आहे या प्रवासात लोक किती थकली होती हे दिसत होते तरीही चार पाच दिवसा नंतर पुन्हा कामाला. कालच्या पावसात भांडूप ते मुलुंड पायी प्रवास केला सगळी कडे पाणीच पाणी झाले होते आज सकाळी हि पाऊस पडतच होता अश्या परिस्थितीत हि आज भरपूर लोक कामाला जाताना दिसले.

सोयरा - १

"'सरमा' कसं वाटतं?", बायकोने हुकुमी एक्क्याची उतारी केल्याच्या अविर्भावात माझ्याकडे पाहिलं.

नावामागचा संदर्भ माहीत होता. लगेच गूगल करून खात्री करून घेतली. "सरमा: इंद्राच्या हरवलेल्या गाईंचा पाताळापर्यंत जाऊन शोध घेणारी स्वामीभक्त कुत्री". पर्याय जोरदारच होता. तरीही मी सुचवलेल्या 'सोयरा' ची शान त्यात नाही असं मला राहून राहून वाटत होतं. त्यातून सुदैवाने जी मुलगी 'जिंजर', 'कुकी', 'लिसा' असल्या काहीशा नावांचा हट्ट धरेल असं वाटत होतं, तिलाही 'सोयरा' पहिल्या फटक्यात आवडलं होतं. मग मी, "पिल्लू आणायचं ते पोरीसाठी, त्यामुळे नावाच्या बाबतीतही तिची निवड महत्त्वाची!" असा मतलबी आव आणला, आणि पिलाचं नाव नक्की झालं - सोयरा!

सैनिकांच्या रक्षणासाठी शेळीचे दूध ? ऐकावे ते नवलच!

हो. शत्रूने केलेल्या नर्व्हगॅस च्या माऱ्यापासून सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी असा उपयोग भविष्यात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा विषारी ऒर्गॅनोफॉस्फेट च्या रेणूशी भिडून त्याला निकामी करणारे जवळ जवळ १५ किलो औषध जनुकसंस्कारित शेळीच्या दुधापासून निर्माण करता आलेले आहे.

आझाद हिंद सेना २ - हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंघर्षाचा आढावा

१८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात वासुदेव बळवंत फडके नावाची उल्का कोसलळी आणि लुप्त झाली. मग पुढची ठिणगी पडली ती चाफेकर बंधुंच्या रुपाने. विसावे शतक उगवले ते नव्या ज्वाला घेउनच - लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर. लोकमान्य टिळकांनी आपली लेखणी तलवारी सारखी चालवीत थंड, अचेतन समाजाला धग दिली तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यदेवतेचे पोवाडे गात थेट हिंदुस्थानच्या हाती पहिले शस्त्र दिले. पनास वर्षे काळेपाणी झालेल्या स्वातंत्र्यवीरांनी शिक्षा देणाऱ्यालाच प्रतिप्रश्न केला, "तितकी वर्षे तुमचे साम्राज्य टिकेल काय?" तर लोकमान्यांनी सरकारला डोके ठिकाणावर आहे का असे ठणकावून विचारले होते. दोघेही आपापल्या पद्धतिने जनजागृती चेतवित होते, क्रांतियज्ञ सिद्ध करीत होते.  याच सुमारास भारतात एक नवा किरण उमटला. गांधी. दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या या माणसाने अहिंसा आणि सत्याग्रह ही नवी अस्त्रे आपल्याबरोबर आणली होती. सहजता, सोपेपणा व कुणालाही अंगीकारता येइल अशी देशभक्ती, ती सुद्धा समाजसेवेच्या स्वरुपात. हा मनुष्य सामान्य जनतेला पटकन आपला वाटला. बघता बघता त्याने जनतेला एकत्रीत करायचा चंग बांधला आणि स्वातंत्र्याच्या प्रयत्नाला एका देशव्यापी संघटित प्रयत्नाचं रुप आलं. क्रांतिकारकांविषयी कितीही आदर असला तरी त्यांच्या अग्नीपथावर चालण्याची हिंमत सामान्य माणसात नव्हती. अग्नी कितीही तेजस्वी असला, पूजनिय असला, तरी त्याची धग इतकी प्रखर असते की आपण त्याच्या जवळ जाउच शकत नाही. या मानाने गांधींचा देशप्रेमाचा मार्ग फार सोपा व सरळ होता. महाराष्ट्राच्या संतांनी 'प्रपंच करावा नेटका' अशी संसार सांभाळून इश्वरभक्ती करायची संथा जनसामान्यांना दिली तदवत गांधींनी जनतेला 'देशभक्ती साठी असामान्यत्वच आवश्यक नाही तर ती सामान्य माणसालाही करता येते" हा कानमंत्र दिला.

इथे बोकाळला मृत्यू ... थक्क करणारी हकीगत

नाही नाही. शीर्षक वाचून घाबरू नका लोकहो.

मृत्यूने थैमान घातले आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही. मला सांगायचे आहे की एका बोक्याला माणसांच्या मृत्यूची हमखास चाहूल लागते. हा बोका रूग्णाजवळ आला की काही वेळाने मृत्यूही त्याला जवळ करणार असे लोक समजून चुकतात अशी बातमी सर्वत्र आहे.

सिंहासन बत्‍तिशी - 'सिंहासन सापडलं'

फार फार पूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी माळव्यांत राजा भोज राज्य करीत होता. त्याची राजधानी 'धारा' येथें होती. राजा रसिक, विद्वान व शूर असल्यानें त्याचे पदरी अनेक विद्वान लोक होते. कलावंत होते. प्रजेच्या हितासाठी राजा खूप पैसा खर्च करीत असे. न्यायदानाच्या बाबतीत तर त्याचें कौशल्य वाखाणण्यासारखे होते. कुणावर थोडाही अन्याय होऊ नये यासाठी तो जागरुक राही.

एक दिवस काय झाले? दरबारांत एक फिर्याद दाखल झाली. वारा नगरीत एक श्रीमंत सावकार मरण पावला होता. त्याला दोन मुलगे होते. मृत्युपत्रांत सावकारानें एक विचित्र अट घातली होती, त्याच्या मुलांचे दोन सुंदर घोडे होते, त्या घोड्यांवर दोघांचेहि प्राणापलीकडे प्रेम होते. घोडेही मालकाच्या आज्ञेंत वागत असत.

मृत्युपत्रांत अशी अट होती की, 'या दोन घोड्यांची शर्यत लावावी. जो घोडा मागे राहील त्याच्या मालकाला संपत्‍तीतला सर्वात मोठा अमूल्य असणारा नीलकंठ हिरा मिळावा. उरलेल्या संपत्‍तीचे सारखे तीन भाग करावेत. दोन दोन्ही भावांनी घ्यावेत व तिसरा धर्मकार्यासाठी खर्च व्हावा.'

भोजराजाने दोन्ही घोड्यांची शर्यत लावण्याचा हुकुम दिला, पण काय आश्चर्य ! घोडे जागचे हालेचनात. बरं एखादे पाऊल टाकलं तरी तें अगदी बरोबर ! आतां काय करावं ! नीलकंठ हिरा सरकारी खजिन्यात जमा करावा असाहि सल्‍ला कांहींनी दिला. पण राजाला तो पटला नाही. संपत्‍तीची वाटणी करणें सोपे होते. हिरा राजाच्याच ताब्यांत होता.

एक दिवस राजा शिकारीला बाहेर पडला. मनांतले विचार नाहींसे व्हावेत म्हणून तो एकटाच खूप दूर निघून आला. अवंती नगरीजवळच्या रानांत आल्यानंतर त्यानें आपला घोडा चरायला सोडून दिला व आपण एका विशाल वटवृक्षाखाली आरामांत बसला.

थोडा वेळ गेला. शेजारीच त्याला गडबड ऎकूं आली म्हणुन त्यानें सहज मागे वळून पाहिले. कांबळी पांघरलेली, हातांत काठ्या घेतलेल्या गुराख्यांची पोरे एका झाडाखाली खेळ खेळत होती, त्याचा न्यायदानाचा खेळ चालला होता. शेजारच्या वृक्षाच्या घनदाट छायेखाली एक छोटासा मुलगा बसला होता.

आतां राजा उत्सुकतेनें त्यांच खेळ बघूं लागला. कांही सटरफटर तक्रारी विचारल्या गेल्या. न्यायदान करणारा मुलगा मात्र गंभीरपणें व अस्खलीत भाषेंत बोलत होता. शेवटी एका मुलानें विचारले, 'राजा भोज यांच्या दरबारी खटला चालू आहे. त्याचा निकाल कसा काय लावावा हे अजून कोणाला समजले नाही तरी तो नीलकंठ हीरा कुणाला द्यावा ते आपण सांगावे ---'

आखाती मुशाफिरी ( ३० )

मुदीरचा, पाहुण्याचे उत्तम समाधान केल्याबद्धल माझे साभार कौतुक करणारा मला फोन आला.
---- 
          कारागृहाच्या स्थळावर आमच्या कामाची धामधूम आता अंतिम टप्प्यावर आलेली होती. आभासी छताचे काम तर इतक्या झपाट्याने सुरु झाले आणि संपतही आले होते की पहाणारे थक्क व्हावे. आठ कामगार आणि त्यांच्यावर देखरेख करणारा वाहिद नावाचा मुकादम यांचा सुसंघटित मेळ जितका अचंभित करणारा होता तितकाच तो प्रेरकही होता. कामासाठी लगणारे साहित्त्य आणणे, त्याची गरजेनुरुप आणि कामानुरुप मांडणी करून ठेवणे, त्याची प्रत्यक्ष जोडणी, जोडणीची क्रमवारी, सारे कसे यंत्रवत्‌ चालले होते.  जणू एखाद्या सैन्याच्या तुकडीची शिस्तबद्ध कवायत चालली होती. सुयोग्य नियोजनाचा तो एक आदर्श वास्तुपाठ होता. कुणी कोणाशी फारसे बोलत नव्हते. त्याची तशी गरजही नसावी.  वाहिद तर कमालीचा अबोल माणूस. पण तो एकसारखा धूम्रपान करीत असे. तेवढे मात्र मला आवडत नव्हते.