कुणाला सांगु ??????

इंग्लंडला येऊन ४ महीने झालेत. आठ वर्षाची गुडीया सोडून.. तीन वर्षाचा क्षितिज सोडून.. फोनवर मलाच सांगतो ` पप्पांचा फोन आला होता..` त्याला समजवताना दमछाक होते.  हृदय तिळतीळ तुटतं... कशासाठी सगळं सोडून आलो ?? फक्त पेश्यासाठी ??? माहीत नाही ...

मन उधाण वाऱ्याचे...

"अगं बाई अरेच्या" (२००४) या चित्रपटातील एक मस्त गाणे...

गायक: शंकर महादेवन, गीतकार: गुरु ठाकुर, संगीतकार: अजय-अतुल, कलाकार: संजय नार्वेकर आणि इतर...

यु-ट्युब वरचा video: http://www.youtube.com/watch?v=qB1Uq9LkUIc

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते

मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते
नात्यांच्या बंधात धुंद मोहरते

मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...
का होते बेभान कसे गहिवरते

मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...
का होते बेभान कसे गहिवरते

मन उधाण वाऱ्याचे...

आकाशी स्वप्नांच्या हरखून भान शिरते
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच फिरते
सावरते बावरते घडते अडखळते का पडते
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते
मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
अन क्षणात फिरुनी आभाळाला भिडते

मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...
का होते बेभान कसे गहिवरते

मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...
का होते बेभान कसे गहिवरते

मन उधाण वाऱ्याचे...

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते
कधी मोहांच्या चार क्षणाला मन हे वेडे भुलते
जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते...
भाबडे तरी भासांच्या मागून पडते

मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...
का होते बेभान कसे गहिवरते

मन उधाण वाऱ्याचे... गूज पावसाचे...
का होते बेभान कसे गहिवरते

मन उधाण वाऱ्याचे...

वाघनखं (भाग १)

"आई गं SS !! हा दुधवालासुद्धा ना! किती जोरानं बडवतोय दार", मी डोळे किलकिले करत दुधाचं भांडं घ्यायला उठणार, एवढ्यात कुणीतरी दार उघडल्याचा आवाज झाला आणि 'हुश्श' करीत मी पुन्हा गादीवर मान टाकली.

" अरे कुठे गेल होतास?" ," ठरल्याप्रमाणं आज तिसरा आणि शेवटचा दिवस. उद्यापासून आपली पुन्हा भेट नाही. आज उठल्याबरोबर  कपाट उघडायचं, दोन कपडे गोळा करायचे आणि तडक गाव गाठायचं".

"आणि हो, एक महत्त्वाचं विसरलोच. वसंतरावांच्या पेटीतली वाघनखं गळ्यात बांधायची आणि मगच घराबाहेर पडायचं, एवढं पक्कं ध्यानात ठेव."

कंत्राटी अध्यापिकेचा नवरा

मे महिन्याचे ऊन चांगलेच तळपू लागले होते. दुपारी जेवणाची वेळ होत आली आणि अर्धांगिनीचा भ्रमणध्वनी केकला. जगातल्या यच्चयावत भ्रमणध्वनीसेवा पुरवणाऱ्या आस्थापना आमच्या घराच्या वाटेला जात नसल्याने आमच्या घरात भ्रमणध्वनीचा 'टप्पा' येत नाही. त्यामुळे त्यावर बोलायचे म्हणजे मुंडके खिडकीबाहेर काढून जगाला संबोधत संवाद करावा लागतो. मी पाने मांडेपर्यंत अर्धांगिनीने ते आन्हिक उरकले आणि हनुवटी किंचितशी थरथरवत ती (म्हणजे तिचे मुंडके; उरलेली ती आतच होती) आत प्रवेश करती झाली. तिच्या महाविद्यालयातून तो भ्रमणध्वनी आला होता.

हसा पण लठठ होऊ नका

सूनबाई नट्टापट्टा करून बाहेर जाताना सासूबाईना (ठमाकाकूना )म्हणाली, " सासूबाई, मी जरा बाहेर जाऊन येते. जरा तुमच्या नातवाला संभाळा. "

" अग त्याला पण घेऊनच जाना, मला आत्ता अगदी कंटाळा आलाय. किती सभाळायच त्याला. " इति सासूबाई.

" हो का!  मग मी दोन मुलाना कशी संभाळते? " सूनबाई.

बाराच्या आत वसतिगृहात

भारनियमनाचे ते दिवस. केव्हा कधी कुठे अंधार होईल ते सांगता यायचा नाही. त्यात हा पाऊस. हे सगळे कमी म्हणून की काय, रस्त्यावर पाईपलाईन साठी खोल खणून ठेवलेले.

अर्थात मंदा म्हात्रे, चपला चित्रे, शीघ्रा श्रीध आणि द्रुता दिघे जेव्हा सिनेमा पाहायला वसतिगृहातून बाहेर पडल्या तेव्हा त्यांना ह्याची कल्पना होतीच त्यासाठीच तर त्यांनी न विसरता आपल्या बरोबर एक चांगली प्रखर विजेरी घेतली होती. वेळेत परत वसतिगृहात येण्याला तर पर्याय नव्हता. रेक्टर सौदामिनी सुळे म्हणजे साक्षात सौदामिनी. बारा वाजता वसतिगृहाचा एकदा दरवाजा लावून घेतला की घेतला. त्यानंतर तो उघडायला लावण्याची कल्पना करण्याचेही धाडस ह्या चौघींना झाले नसते.

निर्णय

डोळे पुसत पुसत मानसी घराबाहेर पडली. घरी तिचे बाबा अगदी रागारागाने लाल होऊन तिच्या आईशी बोलत होते. "बघितलंस ना, पुढे शिकवण्याचे परिणाम. म्हणे करू दे ना तिला कॉलेज, करू दे ना नोकरी. बघा आता बाप बोलत असताना समोर थांबायची पण शिस्त राहिली नाही यांच्यात.

अमेरिकायण! (भाग -१: नवीन)

काही दिवसांपूर्वीपर्यंत "नवीन" असं काहीच माझ्या आयुष्यात नव्हतं.. जर काही नवीन गोष्ट मिळालीच तर मी फार खूश होत असे.. तेव्हा काय कल्पना होती की लवकरच माझ्या आयुष्यात 'नवीन' हाच एकमेव दैनंदिन शब्द होणार आहे!!

आझाद हिंद सेना ५ - पूर्वरंग

नेताजी देशाबाहेर निसटले व पश्चिमेला गेले, त्यात त्यांचा जर्मनीकडून मदत मिळविणे हा हेतू तर होताच पण जपान - जर्मनी मैत्रिपूर्ण संबंधाचा अचूक फायदा उठवीत जर्मनीद्वारे जपानकडून अधिकाधिक साहाय्य मिळविणे हा तितकाच महत्त्वाचा दुसरा हेतू होता. जरी अफगाण सीमेवरून आग्नेयेच्या दिशेने हिंदुस्थानची सीमा अक्ष राष्ट्र सैन्याच्या साहाय्याने गाठायची व दोन दिशांनी शत्रूला कोंडीत पकडाचे हे गणित असले आपले खरे युद्ध आपण घरा पलीकडील अंगणात खेळत इशान्ये कडून देशात बाहेरून आंत असे सीमोल्लंघन करणार हे नेताजींना अभिप्रेत होते. नेताजी व पूर्वेकडील भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वाहून घेतलेले क्रांतिकारक  यांच्यात अनेक मर्यादांमुळे तुटक असला तरी संवाद होता, एकमेकाची चाहूल घेतली जात होती. एकदा तर जपानहून राशबिहारी बोस यांनी घाडलेले एक पत्र कलकत्ता पोलिस प्रमुख टेगार्ट याला गुप्तचरांनी आणून दिले होते. ते जप्त केले नाही याचे कारण त्याने असे सांगितले की हे भयंकर लोक अनेक नावांनी अनेक पत्त्यांवर अशी पत्रे एकाच वेळी पाठवतात, एखादे जप्त केले तरी दुसरी मिळतीलच, तेव्हा हे पत्र न पकडता पोचू देणे व लक्ष ठेवणे हेच उत्तम. म्हणजेच नेताजींचा पूर्वेला संपर्क होता हे निश्चित. पुढे नेताजी देशाबाहेर जाऊन जर्मनीत प्रकट झाल्याचे रेडिओ बर्लिनवरून ऐकताच पूर्वेत राशबिहारी, प्रीतमसिंह यांना जो आनंद झाला त्यावरूनही पूर्वेने नेताजींना मनोमन आपला नेता म्हणून स्वीकारले होते हे स्पष्ट आहे. नेताजी जर्मनीत गेले तेव्हा इकडे पूर्वेला काय परिस्थिती होती त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे.