बोधकथा

म्हसोबाचे डोळे

क्रांतिसिंह नाना  पाटील आपल्या भाषणातून समाजातील अंधश्रद्धेवर मार्मिक प्रहार करीत असत. विसाव्या शतकातील ग्रामिण महाराष्ट्राचे ते सर्वाधिक लोकप्रिय वक्ते होते. त्यांच्या जीवनातील त्यांनीच भाषणात सांगितलेली ही एक कथा.

मियाऽऽउं! (भाग-२)

मियाऽऽउं! (भाग-२)

पहिलं मांजर गेल्यानंतर बराच काळ घरात मांजराचा विषय निघाला नाही. त्याला विसरणं सगळ्यांनाच कठीण जात होतं. पण एक दिवस आई नेहेमीप्रमाणे ऑफिसमधून घरी आली. उजव्या खांद्याला नेहेमीची पर्स आणि डाव्या हातात प्लॅस्टिकची पण जाळीदार आणि घटमूठ अशी एक पिशवी. "काय आहे?" माझा लगेच प्रश्न. "अगं बघ तर. तुला आवडेलच" आई म्हणाली. आईने जमिनीवर पिशवी ठेवली. त्याचं तोंड उघडलं. मी अधीरपणे पिशवीच्या जवळ गेले, जाळीतून कोणीसं बघतंय असं वाटलं. नीट पाहिल्यावर दोन छोटे गोल डोळे दिसले. मग मामला ध्यानात आला. आत माऊ असणार नक्कीच.

"मांजर आहे?" अतीव आनंदाने मी विचारलं. त्यावर आईने सांगितलं की तिच्या मैत्रिणीच्या मांजरीला बरीच पिल्लं झाली. त्यापैकीच हे एक. आईने ऑफिसनंतर तिच्या घरी जाऊन त्यातल्या एकाला जाळीच्या पिशवीत घालून लोकल ट्रेनमधून घरी आणलं. यावर "पिशवीत घातल्यावर शांत कसं काय बसलं, काहीच चुळबूळ केली नाही का, लोकलमधून गर्दीतून कसं आणलंस" असले प्रश्न नंतर आईला विचारुन भंडावून सोडलं.

बरं आता गृहप्रवेश करुन बराच वेळ झाला होता. पिशवीचं तोंड उघडून ठेवलंच होतं. उत्सुकतेने आम्ही भवती जमून मांजराविषयी गप्पा मारत बसलो होतो. त्याला बाहेर येण्यासाठी चुचकारुन झालं. पुढे दुधाची वाटी ठेवून बघितली. म्हटलं, आपण आसपास आहोत, आपल्या चाहुलीने, आवाजाने गांगरलं असेल बिचारं त्यामुळे बाहेर पडण्याचं नाव घेत नाहीये. एकदा वाटलं सरळ हात आत घालून बाहेर काढावं पण म्हटलं नको अजून एकमेकांना आपण अनोळखी आहोत त्यामुळे जबरदस्ती नको. नाहितर पहिल्याच दिवशी प्रसाद मिळायचा! शेवटी आम्हाला पण कंटाळा आला म्हटलं यायचं तेव्हा येईल बाहेर तर तोपर्यंत पिल्लालाही आतमध्ये कंटाळा आल्यामुळे त्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असावा कारण स्वारीने बाहेर डोकावून मुखकमल दाखवलं. आणि मग हळूच सर्व अंग बाहेर काढलं. काढलं तर समोर उशी दिसली. स्वारी उशी आणि भिंतीच्या मध्ये गॅप असते तिथे धावत जाऊन लपली. आता काही वेळ तिथेच मुक्काम होता. मी थोडंफार फिसफिस करुन त्याला बोलावू पाहिलं पण हे आपलं ढिम्म. बरं म्यावम्याव वगैरेचाही पत्ता नाही. "श्या: हे असं कुठवर चालणार...असं काय हे...यडंच दिसतंय" मी मनात म्हटलं. अर्थात काही तासांनी ते जरा धीट झालं कारण इकडे तिकडे हिंडत त्याचा आवाज त्याने सर्वांना ऐकवला. पण निश्चितच तेव्हा ते त्याच्या आईला आणि इतर भावंडांना शोधत होतं बहुतेक.

"काय गं हे काळंपांढरंच तर आहे. सोनेरी नव्हतं का एखादं?" तेव्ह्ढ्यात माझी तक्रारही करुन झाली. पण लगेच ते मी विसरुनही गेले. कुठल्याही मांजरावर तसं नाराज होणं कठीणच ना.. :) तळहातापेक्षा थोडं मोठं असं ते एक काळं पांढरं गोड पिल्लू होतं. त्याच्या शेपटीचं टोक गडद काळं होतं. पिल्लाचं नामकरण 'चिमा' असं करण्यात आलं. पुढे कायम आम्ही तिला (ती मांजरी होती) चिमा याच नावाने हाक मारत असू. नाव ऐकून लोक लगेच म्हणायचे "चिमा काय कामाची!". मग लहान वयातील अकलेला अनुसरून यातल्या शाब्दिक खुबीपेक्षा अर्थाकडे जास्त लक्ष वेधून मी फणकार्‍याने "काही नाही. कामाचीच आहे माझी चिमा" वगैरे म्हणायचे.

मांजरं अधिक आकर्षक दिसतात ती त्यांच्या डोळ्यांमुळे असं माझं ठाम मत आहे. राखाडी पासून हिरव्या (त्यातही पिस्ता, गडद हिरवा), निळ्याशार आणि अगदी पिवळया ते तपकिरी भुर्‍या रंगाचे ते गोल मणी बहुतेकांना लबाड आणि धूर्त वगैरे वाटतात पण मला मात्र त्यांच्या डोळ्यात खट्याळपणा, थोडा वात्रटपणा आणि कमालीचं औत्सुक्य दिसतं. त्या पारदर्शक डोळ्यांतली बाहुलीची उभी रेघ काळोखात पाहिल्ये कशी रुंदावते? कुठे काही खुसपूस झाली की त्या गोल किंवा बदामाच्या आकाराच्या डोळ्यांमध्ये प्रचंड कुतुहल दाटतं आणि मग या औत्सुक्यापोटी पुढे घडणारी मजेदार पळापळ तुम्ही चुकवलीत तर एका मोठ्या आनंदाच्या ठेव्याला तुम्ही मुकलायत! आमच्या पहिल्या मांजराच्या डोळ्यांमध्ये हिरवट झाक होती तर चिमाच्या डोळ्यांचा रंग वाळक्या पानांसारखा होता. अर्थात दोघांचाही डोळ्यांत खट्याळपणा पुरेपूर दिसायचा. (चिमाच्या डोळ्यात थोडा लबाडपणाही!) तसेच त्यांचे उभे कान! बहुसंख्य वेळा एक कान समोर असतो आणि दुसरा कान मात्र वारंवार कडेला टवकारायचा उद्योग प्रत्येक मांजराचा सदैव चालू असतो. अगदी निद्रावस्थेतही कान पुढेमागे करणं आपलं चालूच असतं. कदाचित "आपल्या पाठीमागे शेजारच्या कॉलनीतल्या त्या चहाटळ मांजर्‍या काय बोलत असतात" हे जाणून घेण्याच्या औत्सुक्यापोटी मांजरं असं करतही असतील. मांजराच्या कानाला त्याच्या नकळत हलकेच बोटाने पटकन स्पर्श करुन बघा, संवेदनशील मांजर लगेच तो कान असा झटकेल आणि आरस्पानी डोळ्यांनी एक क्षण तुमच्याशी नजर मिळवून दटावेलही. चिमाला असा त्रास आम्ही भरपूर दिला. तिच्या शेपटीचं टोक तिच्या कानात घालणे किंवा तिला आरशासमोर नेणे असले सतावण्याचे उद्योगही चिक्कार केले.

निखळ करमणूक हवी असेल तर मांजर आणि आरशाची गाठ घालून द्या. पुढचा तासभर हसला नाहीत तर मला सांगा! मला आठवतंय, चिमाने पहिल्यांदा स्वत:ला आरशात पाहिलं तेव्हा बाईसाहेब चक्क घाबरल्या होत्या. तिथनं आधी तिने धूम ठोकली पण ही नवीन मांजरी कोण घरात शिरलीय हा विचारांचा भुंगा तिच्यामागे लागला असणार कारण हळूच, दबकत आणि कानोसा घेत घेत, शेपटी फुलारुन थोड्या वेळाने ती परत आरश्याजवळ आली. म्याव करुन पाहिल्यावर कळलं की आरश्यातलीसुद्धा म्याव करते. मग जरावेळ म्यावम्यावचं सेशन झाल्यावर आरश्यावर एक डावली मारुन झाली. तर तस्साच प्रतिसाद आरसावालीनेही दिला की! हे असं जवळजवळ अर्धाएक तास चालू होतं. चिमाचा एकंदर अविर्भाव, आरसावालीला देत असलेल्या हुलकावण्या आणि विविध पट्ट्यांमधलं म्यावम्याव पाहून हसून हसून पोटात दुखायची वेळ आली. या आणि इतर नानाविविध प्रकारे मांजरांशी खेळणं (आणि तितकंच सतावणं) इतकं केलंय ना की ’मांजरांशी खेळण्याचे एकशे एक मार्ग’ वगैरे आता मी लिहू शकेन.

म्हणता म्हणता चिमाबाई मोठ्या झाल्या. "काय म्हणतायत तुमच्या चिमाताई" लोक येताजाता विचारु लागले. आता आमच्या या उपवर कन्येची आम्हाला चिंता वाटू लागली कारण घरापेक्षा पंचक्रोशीत फिरणे तिला जास्त आवडू लागलं. पण मार्जारजगतातील जगरहाटीनुसार तिने लवकरच बाहेर कोणीतरी 'खास' शोधून काढले आणि आम्ही चिंतामुक्त झालो. त्याचा परिणाम तिचं पोट वाढल्यावर लक्षात आलाच आणि मग वाटलं किती पटकन मोठी झाली! कालपर्यंत छोटी चिमा होती की ही!

आझाद हिंद सेना ४ - कात्रज, पन्हाळा, आग्रा...

नेताजींच्या संपूर्ण जीवनावर सातत्याने शिवचरित्राचा विलक्षण प्रभाव दिसून येतो. हुतात्मा भगतसिंहाप्रमाणे हा क्रांतिकारकही शिवभक्त असावा हा योगायोग म्हणायचा की गनिमी काव्याने मूठभर सैन्यानिशी भल्यामोठ्या सुसज्ज शत्रूसेनेला खडे चारणारा आणि स्वराज्यासाठी तमाम शत्रूंना आव्हान देणारा राजा शिवछत्रपती हा त्यांचा स्फुर्तिदाता आदर्श असावा? नेताजींच्या आयुष्यातले अनेक प्रसंग व त्यांचे गुण पाहता मला त्यांच्यात व शिवरायांमध्ये विलक्षण साम्य दिसते. ज्या वयात शिवाजीराजांनी स्वराज्याचा ध्यास घेतला त्याच वेळी नेताजींनाही तोच ध्यास होता. शौर्याच्या जोडीला असामान्य मुत्सद्दीपणा, सावधपणा, शत्रूचा बारीक अभ्यास, दूरदृष्टी, दूरगामी व्यवस्थापन, उत्तम प्रशासन, माणसांना जमविण्याची, जोडण्याची आपल्या जिवाला जीव देणारे साथी बनवण्याची कला, देशाच्या व रयतेच्या हिताखातर वाघाच्या गुहेत जाण्याची हिंमत, महासत्तेच्या दरबारात देखिल स्वाभिमानाचे प्रदर्शन, एक की अनेक, अशी असंख्य साम्यस्थळे दोघांच्या चरित्रात दिसून येतात. नेताजींनी प्रख्यात इतिहासकार श्री. जदुनाथ सरकार यांचे शिवचरित्र बारकाईने अभ्यासले होते. त्यांच्या अखेरच्या म्हणजे एकूण अकराव्या तुरुंगवासात - अलिपूर येथील तुरुंगात त्यांनी हा ग्रंथ मुद्दाम मागवून घेतला व त्याचे अनेकानेक पारायणे केली. श्री. जदुनाथ सरकार हे सुप्रसिद्ध इतिहासकार. ते खरे इंग्रजीचे प्राध्यापक, पण त्यांना इतिहासाची विलक्षण गोडी. त्यांनी हिंदुस्थानातील मुघल राजवट व खास करून औरंगजेबावर प्रचंड संशोधन करून पाच खंडात आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. तसेच त्यांनी शिवाजीराजांवर संशोधन करून ग्रंथ लिहिला, त्यात विशेषतः: राजांची राज्यपद्धती, प्रशासन, युद्धशास्त्र व काटेकोर नियोजन याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले होते. हेच सरकार महाशय नेताजी विद्यार्थी असलेल्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्राध्यापक, म्हणजे अप्रत्यक्षरीत्या त्यांचे गुरूच होते.

कुठली आधी कुठली नंतर?

सुमेधाबाई सहस्रबुद्धे होत्याच तशा नावाप्रमाणे बुद्धिमान. कधी त्या काय शक्कल लढवतील ते सांगता येत नसे. हेच पाहा ना, आपल्या मंडळात त्यांनी मुलींसाठी एका गुणांकनस्पर्धेचे आयोजन केले. नुसतेच सौंदर्य नाही तर कर्तबगारी, कपड्यांची निवड, आरोग्य, गृहकृत्यदक्षता, बुद्धिमत्ता, व्यवहारचातुर्य, कलाकौशल्य, सामान्यज्ञान इत्यादी सर्व गोष्टींचा कस लागणार होता त्या स्पर्धेत. निरनिराळ्या गुणांना वेगवेगळे 'गुण' द्यायचे होते. वगैरे वगैरे. (ज्या क्रमाने मुलींना गुण मिळतील त्या क्रमाने आपल्या चिरंजीवासाठी स्थळे पाहता येतील असा त्यांचा मनोदय होता!)

धर्माचा अभिमान का बाळगावा?

     पुष्क्ळ माणसे आपापल्या धर्माला खुपच महत्त्व देतात.कांही जण तर प्राणाचेही मोल देतात.उदा:-छत्रपती संभाजी महाराज,त्यानी औरंगजेबाकडून हालहाल होऊन मरणे पत्करले पण हिंदूधर्म सोडला नाही‌. शिवसेना-प्रमुख बालासाहेब ठाकरे ''मी हिंदू आहे,असे गर्वाने सांगायला'' ,सांगतात.धर्माबद्दल कट्टर अभिमान मुस्लिम,ख्रिचन,बौद्ध,शीख,जैन इ‌. सर्वच धर्माचे अनुयायी जगभर बाळगतात.

लठ्ठंभारती

पॅंटची झिप् लावत तो वळला आणि हात धुवायला बेसिनसमोर जाऊन उभा राहिला. हात धुताना आरशात दिसणाऱ्या आपल्या चेहऱ्याकडे त्याचं लक्ष गेलं. फुगलेला, सुजल्यासारखा दिसणारा वैशिष्ट्यविहीन चेहरा. गोबरे गाल. हनुवटीचा पत्ता नाही. मान दिसत नाही. आपल्या खुरट्या, नीट न आलेल्या मिशांकडे पाहत त्यानं निराशेनं मान हलवली. ’थोडा बारीक झालो आणि ह्या मिशांशिवायही थोबाड बरं दिसेल अशी खात्री झाली की उडवून टाकीन.’ त्यानं कितव्यांदातरी स्वतःला सांगितलं. तो वळला, स्वतःला बाजूनं पाहण्यासाठी. भरपूर बाहेर आलेलं गरगरीत पोट खूपच विचित्र दिसत होतं. तो मोठ्यात मोठा टी-शर्ट अंगाला (अगदी दंडांवरपण)  घट्ट बसला होता. ’फक्त पोटच नाही, तर ही बायकांसारखी पुढे आलेली, पाऊल टाकताच हिंदकळणारी छातीसुद्धा किती विचित्र दिसतेय.’ त्याच्या मनात आलं. त्यानं पोट आत ओढून पाहिलं, मग त्याला याचातरी काय उपयोग आहे असं वाटलं. चष्मा काढून ठेऊन त्यानं तोंड धुतलं. टी-शर्ट ठीकठाक करत तो रेस्टरूमच्या बाहेर निघाला.

आजचा इंग्लंडचा अनुभव ...

नोकरीच्या निमित्ताने इंग्लंडला आहे. लंडनपासून १५० कि.मि वर ईप्स्विच नावाचं  सुंदर शहर आहे. तिथे मी राहतो.

सकाळचा अनुभव ...

केसग्रेव नावाच्या भागात ४ आगष्टपासुन संगीत समारोह आहे. बसमधून जाताना रस्त्याच्या बाजूला जमिनीवर ५ फुटाच्या अंतरावर छोट्याश्या पाट्या लावल्या होत्या.  `Kesgrev Music Festivel 4 Aug'

पदोपदी ऊर्जा!

अं? नाही नाही. दर पावलागणिक ऊर्जेबद्दल, ती वाचवण्याबद्दलच्या व्याख्यानांबद्दल मला लिहायचे नाही.

इथे माणसांच्या दर पावलागणिक वीज निर्माण करण्याचा यशस्वी कार्यक्रम कसा केला जात आहे त्याविषयी सांगत आहे.

सोयरा - ३

सोयरा - १, २

मध्यमवयीन मोडकबाईंनी (नाव बदललेलं) दार उघडून आमचं स्वागत केलं आणि हॉलला जोडलेल्या पॅसेजमधून थेट एका छोट्या बेडरूम मध्ये नेलं. तिथे त्यांची कॉलेजवयीन मुलगी आणि सासूबाईही होत्या. त्या तीन पिढ्यांकडे बघून स्मितहास्य वगैरे करतानाच माझ्या पायाखाली काहीतरी चुरचुरलं. खाली बघतो, तर संपूर्ण खोलीच्या फरशीवर जुनी वर्तमानपत्रं पसरली होती.