अगा ये सगुणा निर्गुणा (१)

"दी रेझर्स एज" ही कादंबरी १९४४मध्ये लन्डनला  प्रकाशित झाली. तिच्या नायकाची डोकेदुखी एक भारतीय स्वामी हस्तस्पर्शाने दूर करतात असा प्रसंग आहे. हीच प्राणशक्ती मुंबईत १९८९ला जपान अमेरीका मार्गे "रेकी" म्हणून अवतरली.

आद्य रेकीगुरू मिकाओ उसुई (१८६५-१९२६) ह्यानी अथर्ववेदातील दोन सूत्रातून प्रेरणा घेऊन  रेकी जपानमध्ये विकसित केली.  अमेरीकेत तिचा प्रसार इतका वाढला आहे की प्रत्येक इस्पितळात रेकी विभाग असतो. रेकी नर्स अशी विशेष शाखा असते.  रेकी व मानसशास्त्र ह्यांचा अभ्यास  सतत चालू आहे.

ह्या प्रचलित रेकीत रेकी प्रथमा, रेकी द्वितिया व रेकीमास्टर अश्या तीन पातळ्या असतात. प्रत्येकवेळी दीक्षा घ्यावी लागते. एकूण पाच रेकी प्रतिमांचा अभ्यास करावा लागतो. आता ह्या उसुई रेकीतही खूप उपप्रकार निर्माण झाले आहेत.

भारतात  रेकीकडे निव्वळ  कुतुहलाने पाहिले जाते. भविष्यात रेकीला अमेरिकेतूनच पुनरायात करावे लागेल.

आधुनिक रेकी म्हणजे भारतीय (दीक्षेशिवाय) रेकी. अथर्ववेद खंड ४, सूक्त १३ मध्ये दोन सूत्रे (६, ७) आहेत.

आयम मे हस्तोभगवनयम मे भगवत्तर्ह/अयम मे विश्वभेषजोयम  शिवाभिर्शनह (६). माझे दोनही हात वैद्यच आहेत.

हस्ताभ्याम दशशाखाभ्याम जिव्हा वाचह पुरोगवी/ अनामयी त्नुभ्याम हस्ताभ्याम ताभ्याम त्वाभी म्रुशामसी (७). वाणी व दहा बोटे असलेले हात हेच उपचारक आहेत.

कोणीही दीक्षेशिवायही स्वतावर व दूरन्त उपचार करू शकतो. केवळ आपले तळहात आणि सगुण अथवा निर्गुण याला आवाहन करून.

जालावर रेकीविषयी माहिती आहे. पण ती विस्कळित स्वरूपात आहे. मी ही माहिती संकलित करून आपल्याला सादर करत आहे. मी रेकी प्रथमा ते रेकीमास्टर पर्यंत  माहिती देईन. तसेच दीक्षेशिवाय रेकीचीही माहिती देईन. हे प्रशिक्षण नाही. त्यामुळे ह्या लेखमालेतील माहितीचा उपयोग आपाआपल्या जबाबदारीवर करावा ही नम्र विनन्ती.

कठोपनिषदात एक श्लोक आहे,

उत्तिषठत जाग्रत / प्राप्य वरान्निबोधत / उठा, जागे व्हा / मिळालेल्या वरदानाचा बोध घ्या /

क्षुरस्य धारा निशिता दूरत्यया /दुर्गपथस्तत्कवयो वदंति / क्षुरस्य धारा म्हणजे रेझर्स एज / जीवनाचा मार्ग वस्तरापात्याप्रमाणे अरूंद व अणकुचीदार आहे असे त्यावरून गेलेले म्हणतात.

असे हे जीवन आपल्याला  सुसह्य  व सुखद करण्यास रेकीची माहिती उपयोगी पडावी अशी मी रेकीमातेजवळ प्रार्थना करते.

मी सर्व रेकीगुरुंचे आभार मानते. मी आपलेही आभार मानते.