नमस्कार मंडळी, शीर्षक वाचुन संभ्रमात पडलात ना !! मागे चहा या विषयावरचे वाचकांचे प्रेम (आणि) प्रतीसाद पाहुन पुन्हा एकदा स्फ़ुट लेखनाचे इच्छा झाली.
तर पोटपुजा हा बहुतेकांचा जिव्हाळ्याचा विषय. यात आपल्या पुर्वजांनी एवढी भरभरुन कामगिरी करुन ठेवली आहे की आपण फ़क्त स्वादिष्ट पदार्थांवर ताव मारुन आस्वाद घ्यायचा. या पदार्थांमधे बऱ्याच जोड्या मात्र प्रसीद्ध आहेत. अश्याच जोड्यांची माहिती जमवणे हाच ह्या लेखाचा हेतु.
कांदेपोहे आणि चहा जसे एकत्र नांदतात तसेच मठ्ठा-जिलेबी, दुध - पुरणपोळी , (बटाटे) वडा-पाव , इडली-सांबार हेही एकत्रच जास्त आस्वाद देतात.
चिवडा-लाडू हे समीकरण तर अगदी पुर्वापार चालत आले आहे. तर मंडळी आपण ज्या गावचे तिथली खासियत (स्पेशॅलिटी) कळवुन (खवय्या)वाचकांच्या ज्ञानात भर पाडावी अशी नम्र विनंती...
विनम्र- शशांक
अवांतर: या प्रयत्नात नविन पदार्थ कळल्यास पाककलेतील निपुण लेखकांना पाकक्रिया लिहीण्यास प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा !!!