हलकेच घ्या... विनोद

एकदा एक मनुष्य एका टॅक्सीमध्ये (टॅक्सीला मराठीत काय म्हणतात?) मागच्या सिटावर बसतो. याला ज्या भागात जायचे असते त्या भागाची टॅक्सी चालकाला माहिती नसल्याने वाट दाखवण्याचे काम याच्यावरच येते. एका वळणावर वळण्यासाठीची खूण करताना हा मनुष्य चालकाच्या खांद्यावर नकळत हलकेच हात ठेवतो. त्यासरशी चालक एवढा दचकतो की त्याला काहीच सुचत नाही, त्याला घाम सुटतो... त्याचा गाडीवरचा ताबा जातो... गाडी शेजारच्या एका दुकानात घुसणारच असते एवढ्यात तो कसा बसा ब्रेक लावतो व हश्श-हुश्श करू लागतो...


त्याचे घाम पुसणे चालू असते. त्यावर गोंधळलेला-घाबरलेला बिचारा प्रवासी त्याला म्हणतो, "मित्रा मला क्षमा कर. मला वाटले नाही तू माझ्या हाताला असा धरशील आणि आपली अशी फजिती होईल."


त्यावर तो टॅक्सी चालक उत्तरतो, "साहेब, त्यात तुमची काही चूक नाही हो. माझा आज टॅक्सी चालवण्याचा पहिला दिवस आहे. या अगोदर मी मागील ३० वर्षे प्रेतवाहिनीचा चालक म्हणून काम केले आहे"....