आपणा सर्वांना माहीत असेल की काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये युवा स्पर्धांचे आयोजन केले गेले. त्यामुळे पुण्यात बऱ्याच नवीन पाट्या महानगरपालिकेने लावल्या आहेत. त्यांतील एक हि निलायम उड्डाणपुलाजवळची पाटी.
"नका करू वृक्ष तोड
होईल पृथ्वीचा बीमोड"
ह्या पाटी बद्दल आपले काय मत आहे? हे मराठी बरोबर आहे का? असेल तर का? आणि नसेल तर का?
आपले विचार कळवा. बरेच मराठी समजणारे लोक आहेत म्हणे मनोगतचे सभासद.
मग काय लवकर आपले विचार कळवा..