ग्लोबल वार्मिंग!! अर्थ अवर २००९!!

२८ मार्च २००९ या दिवशी रात्री ८.३० ते ९.३० या दरम्यान जगभरात अर्थ अवर पाळला गेला!!! मी ही त्या एका तासासाठी घरातील दिवे बंद ठेवून यात सहभाग घेतला.
हा उपक्रम मला कौतुकास्पद आणि अत्यावश्यक वाटला...
पण असे असताना मागील वर्षापासून महाराष्ट्रातील काही भागात सुरू असलेल्या लोड शेडिंगचा विचार मना ला शिवून गेल्याशिवाय राहिला नाही.
"जिथे चार चार तास लोड शेडिंग होते तिथे अर्थ अवर काय पाळायचा" असेही काहींच्या तोंडून ऐकावयास मिळाले.
एकीकडे "ग्लोबल वार्मिंग" ची समस्या.... आणि एकीकडे वीज, पाणी अश्या मूलभूत गरजांचा अभाव!!
आपल्याला याबद्दल काय वाटते?