हृद्गत माझे ऐका जनहो

हृद्गत माझे ऐका जनहो
वा मूकच मजला राहू द्या
दुःखात कसे पाहू सुख मी?
जे पाहति त्यांना पाहू द्या ।ध्रु।

बागेत फुले हे फूल कसे
माया ना माळ्याच्या डोळ्यां
मी हसत बघितले खूप, अता
हे वाहति अश्रू वाहू द्या ।१।

सुखस्वप्न न एकहि मज दिसले
जे दिसले ते विसरुन गेलो
शकलात हवे ते ना देऊ
जे दिलेत ते मज साहू द्या ।२।

परदुःख कुणी कुठले घ्याया
इतकीही कणव कुणास कुठे?
वाहति अश्रू, वाहोत भले;
पण सांत्वन असले राहू द्या ।३।

तळटीप :

१. ही ओळ 'ना देऊ शकलात हवे ते ... ' अशी वृत्तात बसते आणि समजायला सोपी आहे पण चालीत त आणि ह मध्ये आलाप घेता येत नाही म्हणून नाईलाज  

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचल्यास तेही कळवा