ह्या कुंतलांच्या रेशमी तिमिरास ना भ्यावेस तू

ह्या कुंतलांच्या रेशमी तिमिरास ना भ्यावेस तू
कचगंध येतो जेथवर मम, तेथवर यावेस तू ।ध्रु।

ऐकून घे. जे सत्य आहे, तेच तर मी बोलते
मिटत्या उघडत्या अधिर अधरांची शपथ तुज घालते
उजळतिल ज्योती काजव्यासम, हसुन सांगावेस तू ।१।
ह्या कुंतलांच्या ...

दृष्टी तृषित माझी, असे का गोष्ट ही सांगायची?
वस्तीस तू, तर का न रजनी सांग ही थांबायची?
राहो न राहो ती, मनी मम ध्यासवत् ऱ्हावेस तू ।२।
ह्या कुंतलांच्या ...

चाल :  गागालगा गागालगा गागालगा गागालगा

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्यावर आधारित भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. कडव्यांच्या शेवटचे शब्द पाहून 'आवेस तू' ला यमक जुळवून ध्रुवपदाच्या भाषांतराचे शब्द काय असतील तेही ओळखून काढा.