स्वप्न तू की सत्य तू गं, सांग कोण खरी तू
दूर५ कधीची तू उभी गं, ये समीप तरी तू ।ध्रु।
जणु पहाटे प्रभा होत तिमिरातुनी
लपली अन् दिसली ती मुद्रा केसांतुनी ।०।१
स्वप्न तू की सत्य तू ...
स्पंदनांनी ग चाहूल तव ऐकली
हृदयावर झुळझुळली पदराची सावली ।१।
स्वप्न तू की सत्य तू ...
भेटसी तू मला नित्य वळणावरी२
अन् जासी घडवुन३ तू प्रेमकथा कितितरी ।२।
स्वप्न तू की सत्य तू ...
मज पुन्हा हाक मारून बोलाव तू
पडलो की४ दे मजला करपाशीं ठाव तू ।३।
स्वप्न तू की सत्य तू ...
टीपा :
१. हे शून्यवे कडवे गाण्याच्या सुरवातीला ध्रुवपदासोबत गावे. त्यावेळी ताल नाही.
ह्या कडव्याचा अर्थ मला उमजला तसा घेतलेला आहे. पर्यायी ओळींचे स्वागत आहे.
२. पाठभेद : दिससि मज रोज तू ... किंवा मजपुढे येसि तू ...
३. पाठभेद : ठेवुन / सोडुन इ.
४. मूळ गाण्याप्रमाणे 'पडतो मी' असे हवे. मी येथे स्वातंत्र्य घेतलेले आहे.
५. याचा उच्चार दूर् असा करावा.
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
ध्रुवपदाची चाल -
गाऽलगागा गाऽलगागा गाऽलगागा गागा
कडव्याची चाल -
पहिली ओळ : गालगाऽऽ गालगाऽऽ गालगाऽऽ गालगा
दुसरी ओळ : गाऽगागा गाऽगागा गाऽगागा गालगा
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचल्यास तेही कळवा