दुर्दृष्टि दूऽर

तव लोभस लोभस वदनावर - न दृष्ट कुणाची पडो ... ... दुर्दृष्टि दूऽर
पदरात लपव तू मुद्रेला - न दृष्ट ग माझी पडो ... ...  दुर्दृष्टि दूऽर ।ध्रु।

फिरत नको जाउ एकटी
जन-नजरांची धर भीती
कोमल कुसुमांहूनहि तू तर! चाल जपून सदा जगती
कुंतल गालांवर ओढुन घे - न दृष्ट ऋतूची पडो ... ...  दुर्दृष्टि दूऽर ।१।

एक झलक जो पाहतसे
पथिक तिथे तो थबकतसे
पाहुन सुंदर रूप तुझे तो चंद्र अधोमुख होत असे
दर्पण पाहत तू जाउ नको - न दृष्ट स्वतःची पडो ... ...  दुर्दृष्टि दूऽर ।२।

तू शर जो हृदयास भिडे
तू प्रेमाचे भाग्य गडे
तू प्रतिमा प्रीतीची जणु मग कोणा ना तव वेड जडे?
वाटेवर चालत तू जाउ नको, न दृष्ट रजांची पडो ... ... दुर्दृष्टि दूऽर ।३।

टीपा :

१. रज = धूलिकण
चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचल्यास तेही कळवा