मी व्यथांना अंतरीचे ( गझल )

मी व्यथांना अंतरीचे गाव देतो


आसवांना पावसाचे नाव देतो


सागराने ऐनवेळी घात केला


वादळाहातीच आता नाव देतो


मागतो जो तो फुले ताजीतवानी


कोण निर्माल्यास येथे भाव देतो?


खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे


ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो


हासलो आजन्म खोट्या चेहऱ्यांनी


आज  दुःखाला जरासा वाव देतो.


प्रसन्न शेंबेकर


( महत्वाची सूचना ... कुवेत येथे  कार्यरत असलेले, मुंबईचे  उदयोन्मुख संगीतकार  श्री विवेक काजरेकर  यांचा "स्पर्श  चांदण्यांचे "  ही ध्वनीफीत  दि. २१ मे  रोजी मुंबई  येथे  प्रकशित झाली. ह्या  ध्वनीफितीत सुरेश भट व वसंत  बापट ह्यांच्या रचनांसह सदानंद डबीर , सौ जयश्री अंबास्कर ,  तुषार जोशी  व प्रसन्न शेंबेकर ह्यांच्या  रचना आहेत. गयक आहेत  सुरेश वाडकर व पद्मजा फेणाणी. व्हीनस  कंपनीची ही  ध्वनीफीत कॅसेट व सीडी  ह्या दोन्ही माध्यमात बाजारत उपलब्ध आहे . रसिकांनी जरूर लाभ घ्यावा व आपल्या  इतर  मित्रांनही सांगवे ही विनंती. वर  लिहलेली  माझी गझल ह्या  ध्वनीफितीत  आहे व सुंदर चाल आहे. )