योग, धर्म आणि व्यवसाय

आजकाल योगाचे सगळीकडे पीक आले आहे की काय असं वाटायला लागलंय.

जालावर तर योगाचे खास कपडे, योगा मॅट, डीव्हीडी, अन काय काय .... योगाचे व्यवसाय बनत आहेत, आणि वाईट गोष्ट अशी आहे की बरेच लोक असेही असतील, ज्यांना स्वतःच योगाचा अर्थ समजला नसेल तर ते दुसऱ्यांना काय सांगतील. असे क्लासेस परदेशात आणि भारतातही बरेच असावेत. केवळ योगासने (ते ही कठीण) दाखवून योगासनाने लोकांना उल्लू बनवले जात आहे, असं मला वाटते.

अर्थात काही लोक आहेत, जे योगाला ज्ञानदान म्हणून काम करतात. असो.

आज नवीनच मुद्दा कळला. काय तर म्हणे "योग ख्रिश्चन धर्माविरुद्ध आहे". बरेचसे व्हिडिओ इंग्रजीत असल्याने कळले नाही  . असं काही आहे का, की जे एका धर्मानुसार धार्मिक कार्य करतात त्यांनी दुसऱ्या धर्माच्या धार्मिक कार्यानुसार वागू नये. का या मागे शीतपेयाच्या कंपन्या आहेत ?

योग आणि हिंदू (भारतीय) संस्कृतीचा / धर्माचा संबंध आहे का ? म्हणजे योग हा धार्मिक कार्याचा भाग आहे का ? नसल्यास त्याला उगाच विरोध का होतोय ?

कुठेतरी वाचलं की योगाचे निर्माते हे इस्लामचे जनक होते तर काही आता त्याचा संबंध जिझसशी लावायचा प्रयत्न करत आहे.

काहीही असो, योगाने सर्वच समीकरणं बदलवून टाकले. पण त्याला धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे ? हिंदूंनी, योगाला आपल्या धर्माचा भाग मानावा, की त्याचा काही संबंध नाही म्हणावं,  अन पुढे चालावं. (इतरांना शिकवावं  )