खिडक्या आणि लायनक्स / लिनक्स

बरेच दिवस (खरं तर वर्षे) झाली लायनक्स वापरायचं होतं. ८-१० दिवसांपुर्वी "जालावरच्या कुसुमी"मध्ये उबुंटू १०.०४ टाका रे बघितलं. लगेच दुवा क्र. १ ला भेट दिली. आणि उबुंटू उतरवून लॅपटॉपवर इंस्टॉलही केलं.

खिडक्यांना खरतर मी कंटाळलो आहे, पण लायनक्स वापरता येईल की नाही हि भीती (शंका) होती. तसे ओपनसुसचे किडे केले होते पण इंटरनेट लावता न आल्याने पुन्हा खिडक्यांकडे वळलो होतो.

पण आता पुन्हा खिडक्या नको. कारण मोफत सॉफ्टवेअर असताना पायरेटेड सॉफ्टवेअर (खिडक्यांवर) कशाला वापरायचे? मग उगाच ते विषाणू मग त्यांना हुसकावून लावायला अँटी-विषाणू, माहिती उडेल की काय याची भीती.... त्यापेक्षा नकोच ति कटकट.

पण अजुनही थोडीशी भीती वाटतेच की नाही जमलं तर ? कारण संगणक चालवणे यापलिकडे ज्ञान नाही. आणि मराठीत लायनक्सबद्दल कुठे माहिती नाही. असल्यास कल्पना नाही.

अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लायनक्स करू शकणार नाही. अर्थातच मला कोणतीही सॉफ्टवेअर खरेदी करण्याची इच्छा नाही, त्यामुळे लायनक्स चांगले वाटत आहेत. मला कोणतेही ऍप्लिकेशन तयार करायचे नाही (आणि मी करू शकत नाही, कारण मला प्रोग्रामिंग अजिबात जमत नाही), त्यामुळे साधी रोजची कामे करण्यासाठी मी लायनक्स वापरू इच्छितो.

तुम्हाला काय वाटतं? पाण्यात पडल्यावर पोहणं येतं तसच होईल का? जमेल का मला लायनक्स? 

तुमचा काय अनुभव आहे. खिडक्यांपेक्षा लायनक्स चांगले राहिल का ?