नायक : | तुझ्यावरी मरणारे५ जगामधे प्रभुच्या असे कुणी मजहुन आणखी - प्रभू न करो ।ध्रु। |
नायक : करील सहन कसे सांग हे हृदय माझे
जरी निघे तव उल्लेख दुज्या तोंडूनी?
स्तुती रुपाची तव आरसाहि करिल जरी१
तुझ्या शपथ मी टाकीन त्यास फोडूनी
गडे तुझ्या मोहिनिचे नि प्रीतिचे वेडे ...
... असे कुणी मजहुन आणखी - प्रभू न करो ।१।
नायक : | न येउदे दिन ऐसा कि सोडुनी मजला पुन्हा दुज्यामागे जात प्रीति शोधत तू२ विसावुनी खांद्यावर कुणा त्रयस्थाच्या३ कधी स्वदुःखास सहानुभूति शोधत तू समीप तव हृदयाच्या, स्थितीत कुठल्याही ... ... असे कुणी मजहुन आणखी - प्रभू न करो ।२। |
नायिका : तुझ्या मनावर आघात होइ मजकडुनी
न व्हायचे हे विश्वास वाटत मज मना
मला असे माझ्या निष्ठतेवर भरवसा
तुझेच प्रेम मला फसवणार नाही ना?
उपासते मी कि, तुझे४ जगामधे प्रभुच्या ...
... असे कुणी मजहुन आणखी - प्रभू न करो ।३।
टीपा
५. पर्याय : तुझ्यावरी लुब्ध असे .. किंवा ... हवीस तू ज्यास असे
मरणारे ऐवजी मरणारा असे करावेसे वाटले तर पुढे कडव्यांमध्ये नायकासाठी आणि
नायिकेसाठी त्याप्रमाणे उलट सुलट बदल करत राहावे लागतील.
१. पर्याय : ग आरसाहि प्रशंसा करी तुझी जर का
२. पर्याय : पुन्हा कुणामागे जात प्रीति शोधत तू
३. पर्याय : विसावुनी खांद्यावर अनोळख्याच्या तू
४. पर्याय : उपासना ही कि, तुझे ... किंवा - असे घडूदे कि तुझे ... किंवा - मिळो मला वर कि, तुझे ...
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (लगाल - गागागागा - लगाल - गागागा) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... हाहाहा यावेळच्या गाण्यात ध्रुवपदाच्या दोन्ही ओळीत आपसात आणि कडव्याच्या शेवटच्या ओळी ह्यांच्यात यमकच नाही मुळी ! चला तेवढेच सोपे झाले
हो पण दर कडव्याची शेवटची ओळ आणि ध्रुवपदाची दुसरी ओळ एकापुढे एक ठेवून एक सलग वाक्य झाले पाहिजे.
'... ' त्यासाठीच लिहिले आहे. शिवाय नायिकेच्या कडव्याच्या शेवटच्या ओळीतल्या अर्ध्या ओळी पुढे ध्रुवपदाची पहिली अर्धी ओळ आणि दुसरी सबंध ओळ असे अखंड वाक्य झाले पाहिजे राव!