धर्म समाज जातपात

नियम संस्काराचा हा पुढील भाग. जातपात हा प्रकार का व कसा झाला असावा ह्या शोधात हे कसे घडले असावे हा विचार मी सुरु केला, ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

भारतीय परंपरेत चार वेद, त्याचे आठ अंग म्हणजे शाखा, ह्या वेदांचे प्राकृत भाषेतून केलेले विश्लेषण म्हणजे उपनिषद ह्या सगळ्या प्रकारातून धर्म, समाज, जात, कूळ व व्यक्ती ही मांडणी का व कशी घडली ते मी समजण्याचा प्रयत्न केला. वेद काळात सृष्टीतील प्रत्येक ऊर्जेचा स्वतंत्र अभ्यास केला गेला. त्या प्रत्येक ऊर्जेला देव किंवा देवी म्हणून संबोधले गेले. ह्या प्रत्येक देवाची / देवीची उपासना म्हणजेच ऊर्जेचे सखोल ज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्तीला ऋषी म्हणून मान्यता मिळाली होती. ह्या सगळ्या ऋषी मुनिजनांनी सृष्टीच्या स्पंदन शक्तीला मान्य केले. स्पंदन शक्तीचा एक भाग मानव हे मान्य झाले. स्पंदन शक्तीला समजण्याची क्षमता व गुणधर्म फक्त मानव समूहातच आहे हे सर्वमान्य झाले. ह्या क्षमता व गुणधर्मांचा उपयोग ह्या समूहातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे हे सर्वमान्य ठरले. ह्या कर्तव्याचे पालन करण्याचे नियम ठरवले गेले. ह्या संकल्पनेला मानवाचा सनातन म्हणजे सतत कार्यरत असणारा, अंत नसलेला धर्म म्हणून ऋषी मुनिजनांनी मान्यता दिली. धर्माचे पालन कारणार्‍या समूहाला एक समाज म्हणून मान्यता दिली.

ज्या ऋषींनी समाजाच्या सखोल अभ्यासातून नियम व कर्तव्ये सुनिश्चित केली त्या प्रत्येक गुरुचे नाव देऊन त्या नियम-कर्तव्यांना गोत्र असे नाव दिले गेले. (पंचांगात ही सगळी माहिती वाचायला मिळते. पण ते समजून घेण्याऐवजी नटनट्यांची, आधुनिक साधनांची, मित्र - मैत्रीण जोडीची, कोणती फॅशन वगैरे माहिती मिळवणे जास्त महत्त्वाचे झाले आहे.) गोत्र ह्या संकल्पनेचा अर्थ मला समजला. आधुनिक समाज रचनेत विद्यापीठ हे अपवाद वगळता गोत्र असण्याची शक्यता आहे.

ऋषी मुनिजनांच्या समूहाने मानव शरीराला जिवंत ठेवण्या करता शरीरातील प्रत्येक अवयवांच्या कार्याचा अभ्यास केला होता म्हणूनच त्या अभ्यासातून समाज एका मानव शरीरा सारखा असून चार वर्णात आहे असे सर्वमान्य झाले. वेदकाळा पासून सृष्टीतील प्रत्येक क्षेत्रात उच्च पातळी गाठणारे गुरु, ऋषी मुनिजन मान्यता मिळवलेले होते त्यांच्या शिष्यगणांना ठरावीक पातळी गाठल्यावर ब्राम्हण ही पदवी दिलेली आहे. ह्या समाजरूपी शरीरातील मेंदूची जबाबदारी अंतर्बाह्य घटनांचे सुनियोजित आकलन करून, प्रक्रिया झाल्यावर इतर अवयवांना पुरवणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कर्तव्य पदवीधारक ब्राम्हण वर्णाला दिले गेले. प्रत्यक्षात ब्राम्हण ही जात नसून विचार पद्धती आहे, वैचारिक कामाची पातळी आहे. (मुसलमान धर्मात सय्यद ह्या नावाने गणना होते. पाश्चात्य पद्धतीत वैज्ञानिक, प्राध्यापक ह्या अर्थाने गणना होते.) आधुनिक काळात ह्या वर्णात भेसळ पदवी धारक, सतत बदलणारे नियम व बाह्य शक्तींचे नियंत्रण असल्याने कर्तव्य पालनात गोंधळ झाला आहे. संगणक भाषेत ह्याला रोगट (करपटेड) बॉयॉस म्हणता येईल.   

समाजरूपी शरीरातील अंतर्बाह्य धोक्यापासून संरक्षणाची जबाबदारी सांभाळणार्‍या भागाला क्षत्रिय वर्ण गणले गेले ही जबाबदारी हात - पाय, डोळे, नाक, कान ह्यां अवयवयांची होती. समाजरूपी शरीरातील अंतर्बाह्य शरीराच्या गरजा पुरवण्याची जबाबदारी छातीपासून कंबरेपर्यंत असणारे अवयव फुप्फुसे, हृदय, पोट वैश्य वर्ण गणले गेले. ह्या तिन भागांनी तयार केलेली व त्यांना आवश्यक असणारी माहिती वाहक अवयवांचा वर्ण शूद्र (क्षुद्र नव्हे) गणला गेला हे मी समजू शकलो. ह्या चारही वर्णांचे महत्त्व मानव शरीरातील प्रत्येक अवयवाचे असते तितकेच संतुलित होते. मात्र समाजरूपी शरीरातील अनावश्यक द्रव्ये, वस्तूंचा कचरा स्वच्छ करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीची होती कोणत्याही वर्णाची नव्हती हे मी निश्चित समजू शकलो. मात्र आज प्रत्येक वर्णातील अंतर्बाह्य संबंध बिघडवण्याचे नियोजित प्रयत्न होत आहेत.

समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धी व कार्यक्षमते नुसार प्रत्येक व्यक्तीचे वर्गीकरण ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा चार वर्णात झाले. प्रत्येक व्यक्तीचे कार्य, दैनंदिनी, आहार ह्याचे नियम ठरलेले आहेत. ब्राम्हणाने ह्या सृष्टीचा, ब्रह्मांडाच्या प्रत्येक ऊर्जेचा अभ्यास करावा हे त्याचे कर्तव्य ठरले. अभ्यास करण्याची क्षमता सतत टिकावी म्हणून पूजा, पाठांतर, आहार ह्याचे नियम पाळण्याची सवय आवश्यक झाली. अनुभवी गुरु समूहाने अशा ब्राम्हणाला मान्यता देऊन प्राकृत भाषेत सामान्य व्यक्तीला त्याने मिळवलेल्या ज्ञानाचा सत्कारणी उपयोग व मदत करण्याचे काम दिले. ह्या समाजरूपी शरीरातील मेंदूचे काम ब्राम्हण वर्गाने करावे मालक बनू नये. तर इतर तीन वर्णांनी त्या कामात मदत (गुलामी नव्हे) करावी. क्षत्रिय समूहाची मानसिकता, आहार, संरक्षण क्षमता व त्यांचे नियम ठरवले गेले. क्षत्रियांच्या संरक्षणाच्या कामात इतर तीन वर्णांनी मदत करावी अडथळे निर्माण करू नयेत. शरीराला आवश्यक असणार्‍या गरजेच्या वस्तूंचे भांडार, व्यवहार वैश्य समूहाने करावे, परंतु समाजाला वेठीस (रॅनसम) धरू नये. तसेच ह्या तीन वर्णांना शारीरिक मदत व माहिती पुरवण्याचे काम शूद्र समूहाने करावे, जेणे करून हा शरीर समाज सुदृढ व निरोगी असावा हाच मूळ उद्देश होता. मानव शरीराचे प्रत्येक अवयव एकमेकाशी जुळलेले असतात, कोणत्याही एका अवयवाला वेगळे महत्त्व नसते तसेच ह्या समाजरूपी शरीरातील चारही वर्णांच्या समूहांचे एक संध असणे आवश्यक असणे सर्वमान्य झाले होते. आज राज्य करते, नेता, पुढारी, जमीनदार, मालक,कार्यवाह, अभियंता, कोशाध्यक्ष, मुकादम, कामगार वगैरे आधुनिक गोत्र प्रकार आहेत असेच माझे ठाम मत झाले आहे.

कोणत्याही महत्त्वाच्या कार्याला सत्य नारायणाच्या पूजेने सुरुवात करण्याचा नियम तयार झाला. ह्या पूजेला हजर असणार्‍या प्रत्येकाला पूजेला बसणार्‍या व्यक्तीचे गोत्र, जात, पोटजात, नियम, कर्तव्ये ह्यांची आठवण करून देण्याचा हा एक साधा मार्ग होता व आहे हे मला समजले. पुजा सांगणार्‍या पुजार्‍याचे (ती व्यक्ती ब्राम्हण असावी हा नियम नव्हता) हे कर्तव्य होते की त्याने पूजेला बसणार्‍या व्यक्तीच्या परंपरेची, तपशीलवार माहितीची उजळणी करूनच पूजेला सुरुवात करणे आवश्यक ठरले होते. आज ह्या सगळ्या तर्कशुद्ध संस्कारांचे समाजातले महत्त्व संपवण्याचा प्रयत्न काही समाज सुधारक व राज्यकर्ते करीत आहेत. ह्या प्रयत्नांना मान्य करणार्‍या संधीसाधूंना प्रमाण पत्र, नोकरी, मोठ्या हुद्द्याचे गाजर खायला देण्याच्या पद्धतीला महत्त्व मिळालेले आहे.   

जातपात म्हणजे एखाद्या जातीची पातळी असा साधा अर्थ मला समजलेला आहे. मुळातच व्यक्तीची जातपात ही दैनंदिन व्यवसायाने ठरते, त्या व्यवसायाशी संबंधित आचरण (वागण्याची पद्धती) म्हणून आहार त्यामुळे तयार होणारे विचार, ह्या सगळ्याच्या मिश्रणाची ती एक जात असते असे आजवरच्या अनुभवांनी मला पटले आहे. कुंभार, जांभार, सुतार, लोहार, कुणबी वगैरे प्रत्येक जातीत ब्राम्हण पातळीचे आचार - विचार असणारी व्यक्ती असतेच. कारण अशी व्यक्ती त्या जातीचा सखोल अभ्यास करणारी असते, त्या जातीला जास्त निरोगी ठेवण्याचा, उत्कर्षाचा प्रयत्न करणारी असते. प्रत्यक्षात प्रत्येक जातीचा एक समूह असा असतो की जो त्याच जातीच्या ब्राम्हण वृत्तीच्या विरोधात असतो. ह्या समूहाला फक्त आरक्षणाचे फायदे हवे असतात. आरक्षण देऊन गोंधळ माजवण्याचा हक्क व त्याकरता संरक्षण देण्याचे आश्वासन ह्या समूहाला मिळते.
 
लहान पणी मला समजलेले जातपात हे प्रकार पुढील काही प्रसंगातून मी अनुभवले आहेत. आमच्या गावात राहणारी दोन वयाने लहान, सिंधी मुले (सिंध प्रांत वासी ह्या अर्थाने), भवनानी आणि लालवानी आपसात भांडत होते, कपडे फाडून शिवीगाळ चालू होती. भवनानीने एका नटीचा फोटो लालवानीला ५० पैशाला विकला होता. लालवानीने तो फोटो त्याच्या दुसर्‍या एका मित्राला दोन रुपयाला विकण्याचा प्रयत्न केल्यावर भवनानीने तोच विकलेला फोटो एक रुपयाला परत मागितला होता त्यातून हे भांडण झाले होते. इतक्या लहानपणी एका वस्तूची गरज लक्षात घेऊन ती पुरवण्याचा व्यवसाय करणारी धंदेवाईक जात मला समजली होती. पण ह्याच सिंधी समाजात साधू वासवानी सारखे सत्पुरुष मानवजातीच्या मदतीला ठामपणे उभे असतात.

असाच एक दुसरा प्रसंग मी लहान असताना अनुभवला होता. बालपणी मी ज्या इमारतीत भाड्याने राहत होतो त्या इमारतीच्या मारवाडी (मारवाड प्रांत वासी, आजचे राजस्थान) मालकाचा मुलगा माझ्या बरोबर खेळायला येत असे. मी त्याला विचारले होते की तो त्याचा गृहपाठ केव्हा करतो? त्याने व्यावसायिक जातीला शोभेल असेच उत्तर मला दिले होते. तो शिकवणीला जात होता तिथल्या एका गरीब (?) मुलाला गोळ्या बिस्किटे देऊन त्याच्या कडून गृहपाठ तयार करून घेत होता. हा असला विचार माझ्या ब्राह्मणी संस्कारित डोक्यात कधीच येणार नाही. मी मात्र मार खात, रडत ओरडत माझा गृहपाठ करायला शिकलो होतो. ह्याच मारवाडी समाजाचे बिर्ला कुटुंबीय व्यवसायातून कमावलेल्या कमाईतून मंदिर निर्माण करण्याचे सत्कार्य करतात.

बालपणीच्या त्याच इमारतीच्या समोर आठवड्याचा बाजार दर रविवारी जमत होता. तिथे मास - मासे विकणारे होते. डुकराचे मास गर्दी करून विकत घेणारे होते. ती डुकरे संडासातील घाण, कचर्‍यातील घाण खाताना मी बघितली होती. त्याच डुकरांना कापताना मी बघितले होते. तेच मास आवडीने खाणारी एक जात मी तिथे बघितली होती. तसेच "चाक फिरवतो गरगरा मडकी करतो भराभरा तो कोण ? कुंभार, कपडे शिवतो तो शिंपी, चपला तयार करतो तो चांभार, लाकडाच्या वस्तू बनवणारा सुतार, लाल झालेल्या लोखंडाच्या वस्तू बनवणारा लोहार," शालेय पुस्तकातील बालगीतातून मला व्यावसायिक जाती ह्या अशा समजल्या होत्या, त्यांची कामे किती आवश्यक होती हे मला समजले होते. पुजा पाठ सांगणार्‍याला भट, पुजारी म्हणतात हे समजले होते. राशींचा अभ्यास करणारे ज्योतीशी होते. पण ह्या भट, पुजारी, ज्योतीशी व्यक्तींना ब्राम्हण पदवी मिळवणे आवश्यक होते ती एक जात नव्हती.

हे सगळे नियोजित चांगले होते असे असताना ही परंपरा का बिघडली ह्याचा शोध मी घेणार आहे.

मी एक मानव ? आणि नियम संस्कार