घोळ घातला गेला

धर्म, समाज, जातपात ह्या लेखाचा हा पुढील भाग. विचार पूर्वक नियोजन करून सनातन धर्माने घडवलेल्या समाजात घोळ घातला गेला त्याचेच दुष्परिणाम जन संख्या वाढी बरोबरीने वाढताना अनुभवतो आहोत. ते सांगण्याचा हा प्रयत्न आहे. सत्तेचे विकेंद्रीकरण हे समाज बांधणी करण्या करता वेदकाळा पासून झाले होते. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे हा सल्ला आज सुचवण्याचा प्रयत्न होतो आहे पण प्रत्यक्षात घडत नाही, जर झाले तर अमाप संपत्ती लुटणे शक्य होणार नाही ही भिती आहे. ती भिती जनतेला समजू नये म्हणून अनाकलनीय मुद्दे पुढे आणून मुख्य मुद्दा बाजूला ठेवण्याचे सगळे प्रयत्न सुरु आहेत.

ह्या मानव समाजाचे दैनंदिन जीवन निरोगी व सुरळीत राहावे म्हणून कूळ व कुळाचाराची बांधणी झाली हे ओघाने आलेच. दैनंदिन कामाची यादी तयार झाली, ती प्रत्येक कामे करणारा समूह म्हणजे कूळ असे मी समजलो आहे ज्याला आडनाव दिले गेले असावे. जसे कुळांच्या कामाचे संचालन करणारे कुळकर्णी झाले, राजे हे आडनाव समूहाचे नियंत्रण कारणार्‍याचे असावे, जमिनीचे मोजमाप करण्यात येणार्‍या माप दंडाला पांड म्हटले जात असे त्याचा उपयोग करणारे पांडे, गावाचे मोजमाप करणारे देशपांडे तर त्यांचे मुख्य सरदेशपांडे झाले. यज्ञ = प्रोजेक्ट त्याला लागणारी जागा, योग्य जागेचे संशोधन, त्या जागेला यज्ञस्थान बनवण्याकरता आवश्यक प्रक्रिया वगैरे काम करणारे रानडे असावेत. चौधरी, पाटील, चव्हाण (चव्हाटा या अर्थाने), कदम (मुकादमाशी संबंध असावा) वगैरे आडनाव तयार झाले असावे. प्रत्येक व्यक्तीची ओळख दर्शक त्या गावात राहणार्‍या व्यक्तीला त्या गावातील वास्तव्य कर = हात ह्या अर्थाने भडकमकर, भांडारकर, चिपळूणकर, करंदीकर, गोवेकर, लळिंगकर, नागपूरकर, नगरकर, बडोदेकर अशा बर्‍याच हातांना आडनावे मिळाली असावीत. हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे, मी माझ्या क्षमतेनुसार हे समजलो आहे. अशा कुळांचे कुळाचार निश्चित झाले. अशा कुळात वावरणार्‍या व्यक्तीची कर्तव्ये व नियम निश्चित झाले. चार वर्ण हे वैचारिक, शारीरिक पातळी व क्षमते ने ठरले, तसेच ठरवले जाणे आवश्यक आहे. एका कुळात जन्माला येणे महत्त्वाचे नसून तो कुळाचार पाळणार्‍या व्यक्तीचा समावेश योग्य वर्णात करणे आवश्यक आहे. जातीचा ह्यात कोठेही संबंध नसावा, म्हणून जातीचे आरक्षण नसावे. हे पुन्हा स्पष्ट करणे आवश्यक आहे. आज झालेला घोळ हा वर्ण व्यवस्थेत मुद्दाम गोंधळ घातल्याने झाला आहे, लायकी नसताना फक्त प्रमाणपत्राच्या, आरक्षणाच्या आधारावर राज्य कारभारात, संरक्षण, अर्थ, आरोग्य, शिक्षण व्यवस्थेत व नोकरीत प्रवेश सुरु झाले. व्यवस्थेत असणार्‍या अनुभवी योग्य व्यक्तींना त्रास देणे, काढून टाकणे व त्या जागा भ्रष्ट व्यवस्थेतून आलेल्यांना देणे सुरु झाले व सुरु आहे.

समाज ज्या भूपटलावर जिवंत आहे त्या भूमीचा योग्य उपयोग करताना भूमीची नीती = भूमिती. ह्या शस्त्राचे / अवजाराचे शास्त्र विकसित झाले. त्यातून शेत त्या शेताची निती = शेती, शिवार = शेती करणार्‍या व्यक्तीच्या वहिवाटीला आवश्यक जागा. बर्‍याच शेत जमिनीचे एक खेडे, त्या खेड्यातील अनुभवी व्यक्तीला पंच = मॉनिटर, पंच समूहाचा सरपंच = अंपायर,  विविध कामे करणार्‍या कुळांना राहण्याची जागा = एक गाव. अनेक गावांचा एक तालुका, अनेक तालुके एक जिल्हा, अनेक जिल्हे एक प्रदेश अशी व्यवस्था निश्चित झाली. ह्या प्रदेशाची सर्व प्रकारची जबाबदारी सांभाळणार्‍याला राजा ठरवले गेले. राजा हे पद सांभाळणारा सक्षम, नियम पाळणारा व मानव गुणधर्माचे पालन करणारा असावा असे निश्चित झाले. त्या राजाचे वैयक्तिक संस्कार, मानसिक संतुलन व मानव धर्म पालन करण्याच्या क्षमतेनुसार त्या प्रदेशाचे जन जीवन समृद्ध होत असे. आज प्रत्येक प्रदेशाचे मुख्यमंत्री हा तोच प्रकार आहे. त्यांचे कर्तृत्व हे त्यांच्या संस्कारांशी व मानसिकतेशी संबंधीत आहे. म्हणूनच काही प्रदेशांचे इतर प्रदेशांच्या तुलनेत कार्यक्रम जनतेच्या हिताचे झालेले / होत आहेत. राज्याच्या अहंकारी, आक्रमक मनोवृत्तीने दुसर्‍या प्रदेशावर आक्रमण घडत होते. दोन राज्यातील चढाओढ, अकार्यक्षम राज्य कारभार अशी पण कारणे होती. पण तरीही मानव धर्म पालनाचे संस्कार फार खोल रुजल्याने दोन राज्यात घडणारे युद्ध मानव धर्माचे नियम सांभाळून युद्ध होते. दोन धर्मातील युद्ध नव्हते.

सनातन धर्म पालन करणार्‍या भरत राजाच्या कार्यपद्धतीला सनातन धर्म पालन करणार्‍या इतर राज्यांनी मान्य केले व त्या प्रदेशांना भारतभूमी म्हणजेच भारत अशी मान्यता मिळाली असावी. सनातन धर्म संस्कारांमुळे भारत ही मातृभूमी ही संकल्पना मान्य झाली. पृथ्वी वरील इतर प्रदेशांच्या राज्यांनी मानव धर्माचे नियम स्वार्थ साधण्या करता बदलले. त्यातून सनातन धर्मापासून वेगळे धर्म निर्माण झाले. ते प्रत्येक धर्म निर्माण करणार्‍या व्यक्तीला एक निर्माता, देवाचा दूत म्हणून मान्यता मिळाली. अशा नवनिर्माण धर्माचा सत्ता टिकवण्या करता उपयोग झाला व आज केला जात आहे. भोळ्या भाबड्या मानसिकतेचा फार चांगला उपयोग करून धर्माचा व्यवसाय करण्यात बरेच यशस्वी झाले, होत आहेत. आहार व संस्कारांचा मानसिकतेवर परिणाम झाल्याने मोगल व अरब राज्यकर्ते आक्रमक झाले. वाळवंटातून तंबूत राहणारे त्या प्रदेशातील अमीर, सुलतान मंडळींनी भोवतालच्या प्रदेशात आक्रमण करणे सुरु केले. इराणी जनतेवर झालेले अत्याचार, त्या संस्कृतीची चिरफाड, आदरणीय स्थानांना उध्वस्त करणे व कतलेआम ही एक सुरुवात होती. तोच प्रकार अफगाणिस्थानातून भारतात शिरताना ह्या अरबी / इराणी - मुसलमानांनी हिंदू कुश, हिंदूंची कतलेआम झालेल्या पर्वताला नाव दिले. दुवा क्र १.  भारतात असलेली अमाप निसर्ग व भौतिक संपत्ती लुटण्या करता अगणित प्रयत्न झाले. भारतातील सत्ता विकेंद्रित असल्याने संघटित ताकदीने विरोध झाला नाही. त्यातूनच ते आमचे राज्यकर्ते व आम्ही भारतीय त्यांचे गुलाम झालो. पण ह्या आक्रमकांना फक्त ऐशो-आराम व संपत्ती एवढेच महत्त्वाचे असल्याने त्यांनी सनातन धर्मव्यवस्था व समाज रचनेत फारसा गोंधळ घातला नाही. त्यांच्यातलाच अकबर सनातन धर्माचे महत्त्व समजू शकला. ह्या इराणी - मुसलमान आक्रमकांनी भारताचा हिंदुस्थान केला. गुलाम विरोध करण्यात असमर्थ ठरले. सनातन धर्म मान्यतेचे महत्त्व कमी होण्याची सुरुवात झाली.

पाश्चात्य देशातून येणार्‍या पर्यटक व व्यापार्‍यांनी ह्या नव्या घटनांचा फायदा घेत भारताचे इंडिया हे नाव व्यवहारात घुसवले. महाराष्ट्र, गुजराथ व दाक्षिणात्य बंदरातून ह्या पर्यटक व्यापार्‍यांना महत्त्व मिळण्यात व स्थानिक होण्यात बराच विरोध झाला. पण बंगाल मधून इंडियात ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने इंग्रज स्थायिक झाले. इंडियाच्या गुळाच्या ढेपीला फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज मुंगळ्यांनी पोखरणे सुरु झाले. त्यां तिघांत इंग्रज जास्त यशस्वी झाले. मान्य झालेल्या हिंदू व मुसलमान (महाराजे व सुलतान) यांच्यातील द्वेषाला खतपाणी देत इंग्रजी सत्तेत वाढ झाली. इंडियातील इंग्रजी सत्तेचा व्यवहार सांभाळायला इंग्रजी मनुष्यबळ फार कमी होते, ते कसे वाढवता येईल ह्या करता थॉमस मॅकॉलेने इंडियातील समाज रचनेचे बरेच संशोधन केले व त्यावर उपाय सुचवले, त्यामुळे तो पदवी धारक लॉर्ड थॉमस मॅकॉले झाला. सनातन धर्माच्या समाज रचनेत बदल घडवणारा हा घोळकर होता. हा घोळ घालण्या करता त्याने शिक्षण क्षेत्रालाच बदलून टाकले. इंग्रज सत्तेला मान्य असलेल्याच पद्धतीने शिकवलेल्या व्यक्तीला मान्यता मिळावी, नोकरी मिळावी असे नियम तयार केले ह्याचा हा पुरावा.

दुवा क्र.२

गांधींनी "हरिजन" ह्या पुस्तकात लिहिले आहे, इंडियन विद्यार्थ्यांना इंडियन शिक्षण पद्धतीने परदेशीय बनवले आहे. डॉ. राधाकृष्णन कमेटिने सादर केलेल्या अहवालात (१९५०) सांगितले; " गेल्या शंभर वर्षात ह्या देशात मान्य असलेल्या शिक्षण पद्धती विरोधात सगळ्यात गंभीर तक्रार अशी आहे की, त्या शिक्षणाने भारतीय परंपरेला दुर्लक्षीत केले आहे, ह्या शिक्षण पद्धतीने इंडियन विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीचे ज्ञान उपलब्ध करून दिलेले नाही. ह्या शिक्षण पद्धतीने काही प्रमाणात असे समज निर्माण केले आहेत की, आपण बिन बुडाचे मूळ नसलेले आहोत, आणि सगळ्यात जास्त वाईट काय आहे तर, आपल्या परंपरेने आपल्याला जगाशी जसे जोडले आहे त्यात फार परक आहे जसे भोवतालच्या जगाने आपल्याला जोडले आहे.

१८८५ सालात थॉमस मॅकॉलेने ब्रिटिश राजवटीचे इंडियात राज्य करण्याचे काय ध्येय असावे हे शब्दरूप केले होते, " आम्ही इंडियात एक प्रचारक जात निर्माण करण्याचे आटोकाट प्रयत्न केले पाहिजेत, ही जात आपण राज्य करतो आहोत त्या समाजात आपली प्रचारक ठरेल, ह्या जातीच्या व्यक्ती रंगाने व रक्ताने इंडियन असाव्यात, पण आवड, मतप्रदर्शन, लिखाण व हुशारी ब्रिटिश असावी." इंडियातल्या ब्रिटिश राजवटीच्या शिक्षण पद्धतीचा थॉमस मॅकॉले शिल्पकार होता. शिकवलेले इंडियन म्हणून स्वत: विषयी काय शिकावे, त्यांच्या संस्कृती विषयी त्यांनी काय शिकावे, त्यांचे ब्रिटन व भोवतालच्या जगाविषयी काय विचार असावेत अशा शिक्षणाची सुरुवात थॉमस मॅकॉलेने केली. तो मुळातच कट्टर जातीयवादी होता, तो भारतीय इतिहास व संस्कृतीला अतिशय तुच्छ मानीत होता. मी हे मला समजलेल्या मराठी भाषेतून लिहिले आहे.

हे आजच्या पिढीचे दुर्भाग्य, त्यांना आजही ब्रिटिश गुलामगिरीला मान्य केलेल्या शिक्षण महर्षीच्या माध्यमातून मिळणारे शिक्षण घ्यावे लागते आहे तरच त्यांना नोकरी मिळते. मुसलमानी राजवटीमुळे, आक्रमक, अमानुष अत्याचार ह्या प्रकारांनी नव्याने तयार झालेल्या व मान्य झालेल्या हिंदू धर्माचे जितके घाण प्रदर्शन जगा पुढे मांडता येईल त्याचा प्रयत्न ह्या मॅकॉले शिक्षण पद्धतीतून केला गेला. आज सांगायला फार सोपे आहे की हे काम ब्राम्हणांनी केले. इंग्रजांना कमी वेळात इंडियन हस्तकांचा ताफा उभा करायचा होता त्यात चार ही वर्णातील व्यक्ती होत्या पण मुळातच अभ्यासू वृत्तीमुळे ब्राम्हण कुळातील तरुणांची संख्या जास्त होती. तसेच इंग्रज राजवटीच्या विरोधात ब्राम्हण कुळातील तरुणांची संख्या पण जास्त होती. कारण त्याच ब्राम्हण कुळातील तरुणांना त्या शिक्षण पद्धतीचा खरा डाव लवकर लक्षात आला होता. हे शिक्षण कसे होते ते पुढील भागात बघू या.