वर्षा सहल

मागील महिन्यात मनोगती शिवाजी पार्क वरील कट्ट्यावर भेटले होते  तेंव्हा वर्षा सहल काढायची असें "मनोगत" बऱ्यांच जणांनी व्यक्त केले होते.


श्री. सर्वसाक्षी, श्री. प्रभाकर पेठकर, डॉ. मिलिंद फणसे व डॉ. दंतकर्मी ह्या जेष्ठ तसेच निलहंस व मयुरेश वैद्य ह्या उत्साही  मनोगतींशी संपर्क साधून वर्षा सहलीचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे.    श्री. अगस्ती व नवीन सदस्य श्री तात्या अभ्यंकरांचेही मत आजमवण्यात आले ! सर्वानुमते एक दिवसाची (रविवार २४/०७/०५) आसपासच कुठेतरी सहल काढणे सोयीस्कर होईल.


मुंबई व पुण्याच्या मध्ये जर सहलीची जागा निश्चीत केली गेल्यास मुंबई -ठाणे व पुणे मधील मनोगतींना अधिक सोयीस्कर पडेल असे सर्वांचेच एकमत झाले.   


सहलीला येतांना सहकुटूंब यावे असा आम्हा सर्वांचा आग्रह व विनंती आहे


तर मग काय अहात ना तय्यार २४ जुलैच्या  सहली साठी ?


आयोजकांना बरीच तयारी करावी लागणार आहे तेव्हा एक नम्र विनंती अशी आहे की मनोगतींनी आपण येणार असल्याचे तसेच सहकुटूंब येणार की एकटे ते नक्की कळवणे


व्य. नि. ने कळवा. - धन्यवाद !


सर्वसाक्षी, अगस्ती, प्रभाकर पेठकर, मिलिंद फणसे, दंतकर्मी, माधव कुळकर्णी, मयुरेश वैद्य, तात्या अभ्यंकर, नीलहंस