ज्या न वाटेवरी घर तुझे साजणी

ज्या न वाटेवरी घर तुझे साजणी
त्या न वाटेवरूनी मला
जायचे
पथ घरावरून जो जात नाही तुझ्या
त्या पथी मज न पाऊल
ठेवायचे |ध्रु।

जग करी साजऱ्या किति दिवाळ्या, खरे
चहुकडे हासत्या सौख्य-आळ्या, खरे
वा वसंतातल्या सुंदर कळ्या, खरे
तव पदी ज्या उपवनात काटा सले
उपवनी त्या न मज फूल वेचायचे ।१।
ज्या न वाटेवरी घर तुझे साजणी ...

ये शपथ तोडुनी, ये प्रथा मोडुनी
ये पदर प्रीतिचा घेउनी ओढुनी
अन्यथा चाललो मी जगा सोडुनी
ज्या स्थळी मज तुझी आठवण छळतसे
मज तिथे एक क्षणही न थांबायचे ।२।
ज्या न वाटेवरी घर तुझे साजणी ...

पर्यायः

१. ह्या कडव्यातल्या पहिल्या तीन ओळीत शेवटी भले, खरे, जरी असे शब्द घातले तरी चालतील. यमक डोळ्यापुढे ठेवून भाषांतर केलेले आहे.सुधारणेला भरपूर वाव आहे. (सुचवा बरे सुधारणा .... चाल आणि यमक विसरू नका बरे का  

आणखी एक पर्यायः
जीवनी कितितरी ढंगरंगावळ्या
जागजागी कितीतर खुदकत्या खळ्या
वा वसंतातल्या त्या उमलत्या कळ्या

चाल : मूळ गाण्याचीच!   (गालगा - गालगा - गालगा - गालगा (स्रग्विणी? )) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.  कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे  शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक .. आयचे शी जमवा बरका! यमकाची जागा ठळक केलेली आहेच.