मोडी लिपीचे पुनरुज्जीवन शक्य आहे का?

     स्वातंत्र्यापूर्वी मोडी लिपी रद्द करण्यात येऊन देवनागरी लिपीचा वापर सुरु करण्यात आला. अजूनही अशा प्रकारच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिध्द होत आहेत : महाराष्ट्रात अनेक शासकीय कागदपत्रे मोडी लिपीत असून त्यांचे सुलभ मराठीत भाषांतर करणारे दुर्मीळ झाले आहेत. त्यामुळे एक अनमोल ठेवा नष्ट होऊ पाहत आहे इत्यादी.

आजच्या काळात मोडी लिपीचे पुनरुज्जीवन शक्य आहे का? 
सध्या कोणकोणत्या क्षेत्रात मोडीचा वापर होऊ शकतो?
मराठीची लिपी मोडी केल्याने मराठीला निराळी उभारी मिळेल का?