पुण्यातील गुन्हेगारी.

आज पुण्यातील गुन्हेगारी कशी वाढत चालली आहे याचे प्रत्यंतर मला आले.


मी लुल्लानगर या भागात राहतो. आज कचेरीतून लवकर आल्यावर मी बाइकव्ररुन फिरावयास बाहेर पडलो. मंत्र या मॊलवरुन भटकून, अलीकडून एन. आय. बी. एम. कडे जाणारा रस्ता आहे, तिकडे वळलो. रस्त्यावर काम चालू असल्याने बाइक हळू चालवावी लागत होती. तेवढ्यात पाठीमागून बाइकवरून दोन मुले येऊन त्यांनी माझा रस्ता अडवला. एक जण "मला शिव्या का देतोस" म्हणून अंगावर धावून आला. तर दुसयाने बाइकची चावी कडूनं घेतली. लोक जमा झाली आणि तेवढ्यात एक माणूस जवळ येऊन पोलिसात चला म्हणू लागला. मी माझ्या मोबाईल वरून पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करताच तिघे माझ्या हातातला मोबाईल ओढायचा प्रयत्न करू लागले. आणि ते तिघे मिळून मला एका रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करू लागले. मदतीसाठी कोणी पुढे येतच नव्हते. मी एकटाच झुन्ज देत होतो. तेवढ्यात मला बाइकची चावी मिळवण्यात यश आले. आणि मी त्यांना जोरात दूर ढकलत जवळच एका सोसायटीत शिरलो. आणि १०० क्रमांक लावून पोलीसांना बोलवण्याचा प्रयत्न करू लागलो. परत एकदा ते माझ्या पाठीमागे धावून येत, मोबाईल आणि चावी ओढण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु त्यांना मी यश येऊ दिले नाही. आतापर्यंत बरीच लोक गोळा झाली होती. त्याचा फायदा घेऊन मी एका इमारतीत शिरलो.


पोलीसांना फोन केल्यानंतर त्यांना विशेष काही घडते आहे असे वाटले नसावे. "अहो जवळच चौकी आहे तिकडे जा की" असा मोलाचा सल्ला मिळाला.


मी थोड्यावेळाने बाहेर आलो. त्या तिघांनी पोबारा केला होता. मी पोलिसांना फोन करत आहे हे त्यांना कळाले होतेच. (पोलिसांच्या तत्परतेची त्यांना कल्पना नसावी) सुदैवाने माझे काहीच चोरीला गेले नाही. फक्त चष्मा तुटला. एका मुलाजवळ काचेचे तुकडा होता त्याने मला मारायचा प्रयत्न तो करत होता. परंतु त्यातही त्याला मी यश येऊ दिले नाही.


परंतु वाईट अशाचे वाटते की बघ्यांपैकी कोणीच मध्ये पडायचा प्रयत्न केला नाही. तिघांनी मिळून मला रिक्शात बसवायचा प्रयत्न चालवला होता तरी लोक फक्त बघतच राहिले.


पुण्यासारख्या शहरात आज ही वेळ आली आहे. माझे काही नुकसान झाले नाही परंतु दुसरे कोणी वयाने मोठा माणुस किंवा अजुन कोणी, ज्याला रिक्शात बसवले गेले असते तर.. पुढे काहीही होउ शकले असते.


लोकांनी फिरताना सावधगिरी वाळगावी ह्या इच्छेने मनोगतावर लिहिले. आपल्या स्वंरक्षणाची जबाबदारी आता आपण हत्यारे बाळगुन करावी काय असे वाटल्यास नवल नाही.