शब्दांची लिंगनिश्चिती

मराठीत निर्जीव वस्तूंनाही लिंग असते.


इंग्रजी, दाक्षिणात्य भाषांत ते दिसून येत नाही.


पण ह्या लिंगनिश्चिती मध्ये काही ठोस व्याकरणाचे नियम दिसून येत नाहीत. त्यामुळे नवीन वस्तूंचे लिंग ठरवताना गोंधळ होतो. पण असेही दिसून आले की सर्वसाधारणपणे आपण नवीन वस्तू पाहताच किंवा तिचे नाव ऐकताच आपसूक तिचे लिंग ठरवून टाकतो. आता हे कुठल्याही नियमांशिवाय आपला मेंदू कसे बरे ठरवतो? उदा. "ती बस", "ती वायर", "तो मॉनिटर" इ.


पण काही काही ठिकाणी मतभेदही होतात. जसे इ-मेल ला माझे काही मराठी मित्र "तो मेल" तर काही "ती मेल" तर काही चक्क "त मेल" म्हणतात.


तर चर्चा अशासाठी की, शब्दांच्या लिंगनिश्चिती साठी मराठीत काही नियम आहेत का?


असल्यास कोणते?