अदभुत सत्य कथा

राम राम मंडळी !

काहि लोकांच्या जीवनात आपल्या नेहमीच्या चाकोरीत न बसणाऱ्या, विलक्षण, अदभुत गोष्टी होत असतात..

ज्यांना असा अनुभव असेल किव्वा, अतिशय जवळच्या व्यक्तीला असा अनुभव असेल तर येथे सादर करावा..

येथे कृपया सत्य घटना अपेक्षीत आहेत..

माझ्या बहिणीच्याच घरचा (सासरकडील) किस्सा..

लग्ना नंतर बहीण सासरी गेली.. ती काही वर्ष पुण्यात स्वारगेट पासुन जवळ , एका टेकडीवर असणाऱ्या (नाव आठवत नाही), गुरुद्वारा जवळ रहायची..

गुरुद्वारामधील सर्व लोक तीला 'बहेनजी' म्हणत.. रक्षाबंधनाला येत..

तेथील मुख्य गुरु महाराज कधी कधी गुरुद्वारात पंजाब किंवा ईतर ठिकाणाहुन येत..

गुरु महाराज कधी कोणाच्या घरी जात नसत.. ते बहिणीच्या अग्रहावरुन तिच्या घरी आले..

ते कोणाला त्यांचा फ़ोटो काढु देत नसत..

बहिणीच्या अग्रहावरुन ते फ़ोटो करता तयार झाले..

(१० - १५ वर्षा पुर्वी डजिट्ल फ़ोटो नव्हते..)

काहि दिवसांनी फ़ोटो फ़िल्म धुतल्यावर पहातो तो काय?

एका बाजुला मेहुणे, दुसऱ्या बाजुला बहिण, व मधल्या भागात, जेथे गुरु महाराजांचा फ़ोटो असावयास हवा, तेथे फ़क्त पांढरा भाग..

त्यांनी निगेटीव तपासली. तेथेहि तोच प्रकार..