एखादे राष्ट्र जन्माला येते, तेव्हा सुरुवातीचे दिवस नवलाईचे आणि खडतरही असतात. त्यावेळेस घेतलेल्या निर्णयांचे दुरगामी परिणाम (सामाजिक, आर्थिक, वगैरे) होत असतात.
आपल्या देशाचेच, भारत, उदाहरण घेऊया. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'भाषावार' प्रांतरचनेचा एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आणि विविध राज्यांची 'भाषावार' निर्मिती झाली.
या निर्णयाचा भारतवासीयांना, नागरीकांना फायदा का तोटा झाला (सर्व स्तरांवर, व्यापकदृष्ट्या)?
याबद्दल मनोगतींची मते काय आहेत?