केतकरी पोटशूळ

दुहेरी नागरिकत्वाच्या घोषणेने लोकसत्तेचे संपादक कुमार केतकर यांना जबरदस्त पोटशूळ उठला आहे.


http://www.loksatta.com/daily/20050108/editor.htm


एकंदरीतच हा माणूस परदेशी भारतीयांबद्दल प्रचंड तिरस्कार बाळगून आहे. भारतातील सरकारी कारभारात किती अंदाधुंद आहे हे नव्याने सांगायला नको. पण परदेशी भारतीयांनी त्याविरुद्ध बोलले की त्यांना देशाबद्दल आदरच कसा नाही, भारतीयांनी निवडलेले सरकार, त्याचा अपमान म्हणजे नागरिकांचाच कसा अपमान आहे, भांडवलशाही कशी वाईट वगैरे वगैरे ट्याण् ट्याण् ट्याण् (पुलंच्या भाषेतले शब्द आहेत हे) सुरु होते.
ह्या द्वेषाचे मुख्य कारण हे बरेच परदेशी भारतीय हिंदू धर्माला घृणास्पद मानत नाहीत हे असावे. रा‌. स्व. संघाशी संबंधित संस्थाबद्दल अनेक पभांना आदर आहे हे ह्या माणसाला खुपत असावे.
  वरील लेखात अनेक मुक्ताफळे आहेत. भारतातील लोकशाही ही अमेरिकेतील लोकशाहीपेक्षा प्रगल्भ आहे हे एक टपोरे मौक्तिक.
तसेही ह्या नागरिकत्वामुळे भारतात मताधिकार मिळत नाही आणि सरकारदरबारी नोकरीही करता येत नाही. तेव्हा भारतातील अती प्रगल्भ लोकशाहीला परदेशी नागरिक गढूळ करु शकणार नाहीत ही केतकरांनी खात्री बाळगावी.
    बिहार उप्र वगैरे जागी ज्या प्रकारे निवडणुका होतात आणि ज्या प्रकारचे गणंग निवडून येतात ते बघता भारतीय लोकशाहीला बरीच प्रगती करायची आहे हे नक्की. याचा अर्थ अमेरिकेची लोकशाही आदर्श आहे असे आजिबात नाही. पण आपल्यापेक्षा त्यांची स्थिती नक्कीच बरी आहे. असो.