अती मराठीकरण

            मराठी माध्यमाच्या विज्ञानाच्या पुस्तकात अनेक शब्दांचे अति मराठीकरण झाले आहे असे वाटते. त्यातल्या काही शब्दांचा आपल्याला अर्थ कळतो का पहा.

            जसे विद्युत चलित्र, रोहित्र, मिश्रणी, प्रशीतनी, वेधन, नालकुंतल, सूक्ष्मश्रवणी, विद्युन्मोच, हे शब्द अनुक्रमे electric motor, transformer, mixer, fridge, drilling, solenoid, microphone, electric discharge यासाठी वापरले आहेत. मी मान्य करतो की काही प्रयत्नांनंतर आपल्याला यांचा अर्थ कळेल. पण एवढ्या मराठीकरणाच्या अट्टाहासाची गरज आहे का? कारण असे मराठीकरण करताना वापरले जाणारे शब्द हे नेहमी वापरले जाणारे नसतात.(अपवाद वगळता). उलट यामुळे गोंधळच होण्याची शक्यता असते. तसेच शाळेत मराठीतून शिकल्यानंतर महाविद्यालयात इंग्रजी शब्द वापरणे कठीण जाते. (याचा अर्थ असा नव्हे की मराठी माध्यमापेक्षा इंग्रजी माध्यम शाळेत चांगले.)

भुरकुंडीचे ऐक्य

खऱ्याखुऱ्या नाना फडणीस आणि सखारामबापू बोकील यांनी पेशवेशाहीची उडवली नसेल इतकी हबेलंडी या एकविसाव्या शतकातल्या नाना आणि बापूंनी भुरकुंडीच्या जनतेची उडवली. पण डोहात टाकलेला दगड कितीही मोठा असेल, तरी काही काळानंतर खडुळलेले पाणी शांत होतेच. त्याप्रमाणे हळूहळू भुरकुंडी पूर्वपदावर आली.

वसंत बापट - ३

वसंत बापट परिचय आणि मला आवडलेल्या कविता

"सावंत" ही वसंत बापट यांची पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात गेलेल्या पण मूल्ये बदलेल्या पिढीवर केलेली एक  जळजळीत आणि उपहासात्मक कविता. अंदाजे अडीच पाने असणाऱ्या कवितेतील काही निवडक ओळी इथे देते आहे.

वसंत बापट- २

बापटांच्या मला आवडणाऱ्या कविता

घराघरात आढळणारा जिना  आणि माणसांचे नाते सांगणारी  वसंत बापटांची "जिना" ही एक अप्रतिम कविता.

लहान असल्यापासून आपण सर्वजण कधी ना कधी किंवा अगदी दरदोज किती तरी वेळा जिना चढून उतरून जातो. पण त्यावर कविता करावी असे मनात येणे आणि बापटांसारखी कविता करणे हा अनुभवच  विरळा. त्यातली सहजता, माधुर्य आणि कल्पकता पाहिली, की वसंत बापट किती सोप्या विषयावर मनाला स्पर्श करणारी कविता लिहू शकतात  ह्याची अनुभूती वाचकाला आली नाही तरच नवल म्हणावे लागेल.

वसंत बापट- १

वसंत बापट- काव्यविश्व व माझी निवड

मराठी बाण्याचा आणि मराठमोळ्या वातावरणाचा जय जयकार करणारी  "केवळ माझा सह्यकडा" ही वसंत बापट ह्यांची "सेतू" ह्या काव्यसंग्रहातील एक लोकप्रिय कविता. मराठमोळ्या मृत्तिकेचा सुगंध आणि वसंत बापट यांचा मराठी बाणा ह्या कवितेतून प्रकट झाला आहे. गेयता, अर्थ आणि ओघवतेपणा ह्या सर्व अंगाने ही कविता सरस आहे आणि म्हणूनच ती मला आवडते.  या कवितेतील सुरुवातीच्या ओळी अशा आहेत....

हसा पण लठ्ठ होऊ नका.

२६ जानेवारी किंवा १५ ऑगष्ट चा एक दिवस. एक सरदारजी तिरंगा ध्वज आणण्यासाठी दुकानात गेला. त्याने सांगितले " जरा ध्वज दाखवा. दुकानदराने लहान, मोठे, कागदाचे, कापडाचे ध्वज दाखवले. ध्वज खाली, वर करून सरदारजीनी विचारले.

याच्यात आणखी कलऱ दाखवाना.

माझीही अपूर्वाई - भाग ६

'इंग्लंड', 'इंग्रज' व 'इंग्रजी' यांना माझ्या विश्वात महत्वाचे स्थान आहे. शाळेत असतांना इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र या विषयांच्या अभ्यासक्रमात तर इंग्लंडविषयी बरेचसे शिकायला मिळालेच, पण संस्कृतचा अपवाद सोडल्यास विज्ञान, भाषा यासारख्या  इतर विषयांतही कुठे ना कुठे त्याचा उल्लेख यायचा. एकंदरीत जितक्या इतर देशांचा अभ्यास केला असेल त्यांत 'ग्रेट ब्रिटन' किंवा 'युनायटेड किंग्डम'चा सर्वात वरचा क्रमांक लागेल. तरीही या दोन्ही संज्ञांमध्ये नेमका काय फरक आहे ते नक्की सांगता येत नाही ही गोष्ट वेगळी! 'इंग्लंड' हा त्यातला एक विभाग आहे हे माहीत असले तरी ते नांव आपल्याकडे जास्त प्रचलित आहे म्हणून तेच नांव सोयीसाठी इथे घेतले आहे.

पुलंच्या साहित्यावरील प्रश्नमंजुषा

पुलंच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त ही छोटीशी प्रश्नमंजुषा. केवळ विरंगुळा हाच यामागचा उद्देश आहे. कृपया उत्तरे लेखाला प्रतिसाद म्हणूनच द्यावीत, परंतु प्रतिसादाच्या विषयात उत्तर/रे लिहिण्याचे टाळावे - जेणेकरून इतरांचा रसभंग होणार नाही. 

महाराष्ट्रातील हायकोर्टात फक्त इंग्लिश चालेल! - २

म. टा.त काल वाचलेल्या लेखाचा हा उत्तरार्ध

म.टा.तला मूळ लेख : हा देशी भाषांच्या अस्मितेचा प्रश्न
सोमवार जून ११ २००७.

मुंबई हायकोर्टात इंग्रजी मुख्य भाषेबरोबरच मराठी दस्तावेज अनुवाद न करता दाखल करून घेण्याच्या परवानगीचा नियम घटनाबाह्य ठरवताना न्यायमूतीर्ंनी कलम ३४८चा आधार घेतला आहे. ते कलम खालीलप्रमाणे आहे :

(अ)शुद्धलेखनापायी कुमारभारती रद्दीत!

आजच्या म. टा. त ही चित्तथरारक बातमी वाचायला मिळाली. मनोगतावर शुद्धलेखनाचा धरलेला आग्रह वाचल्यावर कुणा सदस्याचे ह्या बातमीकडे दुर्लक्ष होईल असे वाटत नाही, तरीही सर्वांना वाचून आस्वाद घेता यावा ह्या हेतूने ती येथे उतरवून ठेवत आहे.