नमस्कार,
जुलै महिन्यातले दिवस, लोणावळा परिसर कसा हिरवागार झाला होता, मी आणि प्रसाद ह्या वेळी नवीनं ट्रेक करायचा असा विचार करून लोणावळ्यात पोहोचलो, तसा हा परिसर चांगलाच परिचयाचा असल्यामुळे कोणताहि पर्याय चालणारा होता , राजमाची ,ढाक-बहिरी , तुंग-तिकोना, लोहगड-विसापुर, कोरिगड,तैलबैला इत्यादी.......
चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायांनू!
नाही, मी काय म्हणतो, की आमचे आदर्श कोण असावे, हे दुसऱ्या कुणी का ठरवावे हो? आता आमच्या भांगिर्दे खुर्दच्या (जि. सिंधुदुर्ग) शाळेत नाही आम्हाला पु. ल. आणि भा. रा. वाचायला मिळाले, म्हणून काय आम्हाला आदर्शच नसावेत? एकतर शाळेत नाईलाज म्हणून जी पाठ्यपुस्तके वाचायला लागायची ती सोडून काही वाचायचे असते, याचा आम्हाला पत्ताच नव्हता. आमचे पळसुले मास्तर म्हणायचे "झेंगट्या, बुके वाचीत रहाणे म्हणजे निव्वळ काळाचा अपव्यय हो! अरे, बुके वाचून माणसांस शहाणपण येत असते तर या देशाचा गव्हर्नर एखादा बुकबायंडर नसता झाला? आता तुझ्या गजाकाकाचे उदाहरण घे. चांगला विलायतेला जाऊन बालिष्टर होऊन आला, बुके काय कमी वाचली असतील त्याने? पण कुल्यार पांणी कसे घ्यांवे हे कळतें कां त्यांस?" तात्पर्य काय, तुमच्या धोंडोपंत जोशांचा मामा म्हणायचा ना की 'राजहंसाचे चालणे. जगीया जाहले शहाणे.....' वगैरे. मग आम्ही बुके नाही वाचली म्हणून आम्हांस काय आदर्शच असू नयेत? आमचे आदर्श असे आमच्या आसपास वावरणारेच लोक असायचे हो! अगदी लहानपणी आमच्या मोलकरणीचा नवरा बापू हा आमचा आदर्श पुरुष होता. संध्याकाळी सातच्या नंतर आमच्या अंगणाच्या गडग्याच्या भिंतीपलीकडे तो किंचित झुलत उभा असे. आसपास आंबटसर वास दरवळत असताना तो आपल्या पत्नीविषयी काही मौलिक उद्गार काढत असे. असे मर्दानी भाष्य आपल्याला कधी करता येईल का अशी आकांक्षा मनाला चाटून जात असे. आमच्या शाळेत आम्हाला कधी कुणी लैंगिक शिक्षण दिले नाही, पण बापूने आमच्या काही मूलभूत कल्पना अगदी स्वच्छ करुन ठेवल्या होत्या. आमचे परचुरे मास्तर म्हणायचे "झेंगट्या, कुणी काही म्हणो, हे खरे मर्द हो! नाहीतर बाकी सगळे आमच्यासारखे! बायकोन जरा डोळे वटारले की धोतर ओले करणारे!" बापू तराळाचा एक वेगळाच किस्सा आहे, पण तो पुन्हा कधीतरी--
तसे नाही म्हणायला आम्हाला साहित्याची आवड होती हो! पण काय वाचावे आणि काय वाचू नये याविषयी आमच्या मनात बराच गोंधळ होता. आमच्या गुरुजनांचे पुस्तकाविषयी मत हे असले तर आमचे तीर्थरुप एकतर 'केसरी' नाहीतर ब्यांकेचे पासबुक येवढेच वाचणारे! मग आम्ही आमच्या मनानेच वाचायला शिकलो. लहानपणी समर्थांसारखे बलवान झाले पाहिजे या हेतूने आम्ही प्रेरित झालो होतो. एकदा कशाला तरी आम्ही आमच्या गजाकाकाच्या खोलीत गेलो असता तिथे कसलीशी आसने की काय अशा नावाचे एक सचित्र पुस्तक दिसले. योगासनांवर आमची बालपणापासून श्रद्धा हो! मग काय विचारता! आम्ही ते पुस्तक घेऊन दिवाणखान्यात आलो आणि पोथी वाचत बसलेल्या आजोबांच्या समोर बसून ते पुस्तक उघडले....
पुढचे काही नीटसे आठवत नाही. काही दिवस सुन्न झालेला गाल, कानात गूंsss असा होणारा आवाज, गजाकाकासाठी तात्काळ मुली बघायला झालेली सुरुवात असे काही झाल्याचे अंधुक आठवते. आमच्या गजाकाकाचीही एक वेगळीच कथा आहे, पण तोही किस्सा पुन्हा कधीतरी--
तात्पर्य काय, तर आम्हीही असे पडतझडत वाचायला शिकलो.शाळेत जायला लागण्याच्या वयात आमच्या गावात नवी लायब्री उघडली. आम्ही काहीसे बिचकतच त्या लायब्रीत जायला लागलो आणि पहिल्याच दिवशी बाबुराव अर्नाळकर यांचे फ्यान झालो. झुंझार, काळा पहाड, सुप.रंगराव हे आमचे त्या काळातले आदर्श! विशेषत: 'झुंझाररावांनी आपली गुप्त बॅटरी पेटवली. या बॅटरीचा प्रकाश फक्त त्यांनाच दिसू शके-' असली चिरंतन साहित्यीक मूल्ये असलेली वाक्ये आमच्या अजून लक्षात आहेत. हळूहळू मग सोबतीला एस.एम. काशीकर, गुरुनाथ नाईक असे शिलेदारही आले. अशा मंडळींत आम्ही गुंगूनही राहिलो असतो, पण एका आडबाजूला असलेल्या कपाटातली चंद्रकांत काकोडकर नावाच्या लेखकाची काही पुस्तकं आमच्या वाचनात आली. त्यांची पुस्तके आधी चोरुन आणि नंतर अभ्यासाच्या पुस्तकात घालून वाचली. आमचा छगन्या हा काकोडकरांचा जबरदस्त फ्यान!त्यांच्या त्या कमनिय नायिका, ते पदर ढळणे, ते गाल आरक्त होणे, कानशिले तप्त होणे - छगन्या आपली मनगटे चावत गुरुचरित्राची पोथी वाचावी तशा भक्तीभावाने काकोडकरांच्या कादंबऱ्या वाचत असे. छे! आठवले की अजून अंगावर बसलेले तीर्थरुपांचे फटके जागे होतात. दहावीला नापास होणाऱ्या किती विद्यार्थ्यांचे शिव्याशाप काकोडकरांनी घेतले असतील कुणास ठाऊक! 'काकोडकरांनी आमच्या भावविश्वावर केलेला परिणाम' हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे, पण तो किस्सा पुन्हा कधीतरी-
काकोडकरांनंतर आमच्या मनावर मोहिनी पसरली ती सुहास शिरवळकर नावाच्या जादूगाराची. वाहवा! काय त्यांची कल्पनाशक्ती! काय ती मोहमयी भाषा! त्याच काळात आम्ही रजनीकांत नावाच्या अभिनयसम्राटाचेही फ्यान झालो होतो, त्यामुळे शिरवळकर आम्हाला अधिकच भावत होते. आमच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकात केटी मिर्जा, कोमिला विर्क आणि आशा सचदेवच्या जोडीला आम्ही शिरवळकरांचाही एक ष्टाईलबाज फोटू लपवून ठेवला होता. अडचण फक्त एवढीच होती की लोकांच्या शिरवळकरांबद्दाल्च्या कल्पना इतक्या भन्नाट असत की त्यांना हेच ते शिरवळकर हे काही पटत नसे. शेवटी मीच ज्याला त्याला फोटो दाखवून 'ओळख बरं , ओळख बरं---?' असं विचारून बघीतलं, पण कुणाला काही टोटल लागली नाही. नाही म्हणायला छगन्याच एकदा 'गुलशन बावरा का रे?' असं म्हणाला!
असे हे आमचे लहानपणीचे आदर्श मंडळी! यांच्याशिवाय केश्तो मुखर्जी, जगजीवनराम, जोगिंदर, अनिल धवन असेही आमचे काही आदर्श होते, पण तो किस्सा पुन्हा कधीतरी---
मनोगतावर जुन्या मराठी वाङ्मयाचे पुनरवतरण पाहत असतानाच महाराष्ट्रदिनी ही चांगली बातमी वाचायला मिळाली. सर्वांना ती समजावी आणि तिच्यावरच्या विचारांची देवाणघेवाण करणे सोयीचे पडावे ह्या उद्देशाने ती येथे उतरवून ठेवीत आहे.
मूळ बातमी : मराठी पुस्तकांना सोनियाचे दिस!
(महाराष्ट्र टाईम्स दि. १ मे २००७)
साधारण चौघीजणींना भेटायच्या आधी मला अजून एक हिरो सापडला. झालं असं, की आमच्या शाळेत एक नवीन बाई शिकवायला यायला लागल्या. त्यांच्या आणि आमच्या वयात फार फार तर ८-१० वर्षांचं अंतर असेल. त्यामुळे त्यांची आणि आमची वेव्हलेंथ मस्त जमायची. त्यांचं स्वतःचं वाचन अक्षरशः अफाट आहे. त्यामुळे त्यांचा तास ही माझ्यासारख्या वाचनवेड्या मुलींसाठी पर्वणीच असायची. या बाईंनी अनेक नवनवीन पुस्तकांशी, लेखकांशी आमची ओळख करून दिली. अनेक उत्तम पुस्तकं त्यांच्या संग्रही आहेत. त्यांच्या मालकीचं मृत्युंजय हे पुस्तक मला द्याल का असं मी त्यांना जरा भीतभीतच विचारलं. त्यांनीही लगेच दुसऱ्या दिवशी ते मला आणून दिलं. वर म्हणाल्या, " माझ्या वहिनीला हवं होतं पण मी तिला सांगितलं, आधी लेकीला देते ."त्यांनी मला लेक म्हणणं हा अनुभव फारच सुखद होता. तो प्रसंग आजही जसाच्या तसा आठवतो.
त्यामुळे मृत्युंजय बद्दल एक वेगळीच भावना मनात आहे. शिवाय बाईंची एक छान सवय म्हणजे पुस्तकातली उत्तमोत्तम वाक्यं त्या अधोरेखित करून ठेवतात. जणू काही त्या स्वतःच मला त्या पुस्तकातलं भाषावैभव दाखवून देताहेत असंच वाटायचं ते पुस्तक वाचताना. कर्णाची व्यक्तिरेखा मला जाम आवडली. माझ्या हिरोंमध्ये त्याला लगेच स्थान मिळालं. सोनेरी केसांचा, निळ्या डोळ्यांचा, विलक्षण देखणा असा हा शापित राजपुत्र. त्याच्याकडे कोणाचंही लक्ष ओढलं न गेलं तरच नवल. मला तर त्याच्या एकाग्रतेच्या, सूर्याकडे टक लावून पाहण्याच्या, त्याच्या बाहुबलाच्या कथा वाचताना प्रचंड भारल्यासारखं होत असे. विशेषतः भीमाने जोर लावून वाकवलेली सळई रो रोज सकाळी सरळ उभी करून ठेवत असे हे वाचताना मला खूप कौतुक आणि मजा वाटायची. त्याची ती जांभळी-लालसर प्रभा फाकणारी कुंडलं, अभेद्य असं कातडं आणि स्वबळावर मिळवलेली धनुर्विद्या वगैरे गोष्टी वाचताना नुसतं स्फुरण चढायचं.
सिंहशिशुरपि निपतति गजेषु सततं कथं महौजःसु ।
प्रकृतिरियं सत्त्ववतां न खलु वयस्तेजसो हेतुः ॥
ही उक्ती सार्थ करणारी त्याच्या मनातली क्षात्रतेजाची ती घगधगती ज्वाळा, प्रत्येक अपमानानंतर संतापाने पेटून उठणारं त्याचं अमोघ क्षत्रिय मन, त्याचा पराक्रम, त्याचे दिग्विजय, प्रवाहाच्या उलट दिशेने पोहावं तसे काळाशी सतत केलेले दोन हात, प्रत्येक वेळी अन्याय सहन करण्याची त्याची असीम सहनशीलता पाहून तो माझ्या हिरोंच्या क्रमवारीत कितीतरी वर चढला. इंद्राला कवचकुंडलांचं दान देण्यासाठी त्याने स्वतःचीच कातडी सोलून काढली होती तो प्रसंग तर मी एकदाच कसातरी वाचला. नंतरच्या पारायणांमध्ये तो वाचवलाच नाही. अर्थात कर्णाला सर्वांगावर अभेद्य कवच आणि जन्मजात मांसल कुंडलं होती ही कविकल्पना आहे. जन्मानंतर त्याला नदीच्या पाण्यात सोडताना कुंतीमातेने स्वतःची अभिमंत्रित सुवर्णकुंडलं त्याच्या शेजारी ठेवलेली होते. ती कुंडलं अभिमंत्रित असल्यामुळे त्याचं रक्षण करत होती आणि तेच कर्णाचं कवच होतं असं मूळ महाभारतात लिहिलेलं आहे हे अलिकडेच कळलं. त्यामुळे कुंडलांची मोहिनी वजा करून माणूस म्हणून हे सारं सहन करणारा कर्ण अधिकच खरा वाटायला लागला. एकूणच काही दिवस माझा महाभारताकडे बघायचा दृष्टिकोनच बदलला होता.
आणि शिवाजी सावंतांनी उलगडलेल्या भरजरी भाषेच्या पोतांबद्दल, वैभवाबद्दल तर काय सांगावं? अनेक दिवस ती भाषा मनात अशी आंदोलित होत राहायची. एकूणच सावंतांनी महाभारत हे एखाद्या प्रिझमामधून दाखवावं तसं दाखवलं. रिफ्रॅक्टेड फॉर्ममधे. त्यामुळे भीमार्जुन, कृष्ण वगैरे मंडळी पळपुटी वाटायची. खरं तर अजूनही वाटतात. कर्णाबद्दल सहानुभूतीने माझं बालमन पेटून उठत असे.
मृत्युंजय च्या प्रभावाखालून मी बाहेर येतानाच कर्णावरचं अजून एक अतिशय सुंदर पुस्तक वाचनात आलं. त्याचं नाव राधेय. लेखक रणजित देसाई. सावंतांचा मार्ग होता की प्रत्येक प्रसंगात कर्णावर कसा अन्याय झाला, त्याचा ज्यावर हक्क आहे असं श्रेय त्याला कसं मिळालं नाही आणि तो कसा निर्दोष आणि नियतीच्या हातचं बाहुलं होता वगैरे वगैरे. या गोष्टी डोक्यात पक्क्या बसलेल्या असल्यामुळे रणजित देसाई यांनी चितारलेला कर्ण मला खूप जास्त माणसासारखा वाटायला. चरित्रनायक जरी झाले तरी शेवटी माणसेच असतात आणि त्या माणूस असण्यातच त्यांचं मोठेपण असतं ही अक्क्ल मला आज आली आहे आणि या प्रवासात कर्णाने मला खूपच मदत केली आहे.
ज्यो - लॉरी- पेनी-ज्योडी यांनी माझा हात धरून मला महाविद्यालयीन वातावरणात आणून सोडलं. मग माझी नजर वळली ती इंग्रजी साहित्याकडे. मी मराठी आणि आठवीनंतर अर्धमराठी(अर्धमागधी नव्हे!) माध्यमातून शिकले. त्यामुळे किशोरवयात नॅन्सी ड्र्यू किंवा हार्डी बॉईज यांची पारायणं मी केली नाहीत. मी आठवीत असताना काकूने मला तिच्याकडचं एक परिकथांचं सचित्र इंग्रजी पुस्तक दिलं होतं आणि म्हणाली होती, आता तुला हे वाचता येईल नाही का!. मला वाटतं दुसरी तिसरीतल्या इंग्रजी माध्यमातल्या मुलांसाठी लिहिलेलं असावं ते. पणा त्यातली चित्र इतकी सुरेख आहेत की बास. त्या प्रसंगानंतर मी निश्चय केला होता की माझ्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या बहिणी जे वाचतात ते आणि त्याहूनही काही अधिक वाचन करायचं इंग्रजी साहित्याचा व्यासंग करायचा. याची सुरुवात मी अकरावीत केली. नॅन्सी ड्र्यू पासून. खरं म्हणजे हे सगळं वाचण्याइतकी मी लहान राहिले नव्हते. पणा त्याने बैठक मारून वाचायची सवय मात्र लागली. एनिड ब्लॉयटन मात्र मी प्रचंड एन्जॉय केलं आजही करते. द फेमस फाईव्ह ही मालिका हिंदीमध्ये डब करून सुट्टीत लावायचे. ती मी कधीही सोडली नाही. हे सगळे लोक माझ्या फुटकळ हिरोंच्या यादीत मधूनमधून डोकावतात.
अशा प्रकारे जरा सवय झाल्यावर मात्र एक मोठ्ठा हिरो माझ्या वाचनात सापडला. त्याचं नाव हॉवर्ड रोआर्क. फाऊंटनहेड या कादंबरीचा हा मनस्वी, स्वयंपूर्ण, कामावर प्रेम करणारा आणि कामासाठीच जगणारा स्वयंभू नायक मला कळायला बराच काळ जावा लागला. अत्यंत जीर्ण अवस्थेतली आणि बाऽऽऽरिक टायपात छापलेली त्याची अत्यंत कुरूप प्रत हातात पडली तेंव्हा हे सगळं आपलं कधी वाचून होणार ही चिंता मला भेडसावू लागली होती. पण अंगभूत चिकाटीने मी तो डोंगर पार केला. वाचलेलं सगळंच समजलं असा माझा मुळीच दावा नाही. पण जे काय वाचलं ते खूप मोठं, भव्य आणि अर्थपूर्ण आहे हे नक्की जाणवलं होतं. डॉमिनिकवर तर माझी भक्तीच जडली होती. आणि रोआर्क बद्दल तर काय सांगावं? काही न सांगणंच उत्तम कारण ते सगळं सांगण्यासाठी पुरेसे बोलके शब्द माझ्यापाशी नाहीत. गेल वीनंड या इसमाचा मात्र सुरुवातीला मला अतिशय राग आला होता. रोआर्क त्याच्यावर इतकं प्रेम का करतो हे मला कळतच नव्हतं. पीटर कीटिंगची तर दया आली होती मला. मला पीटर कीटिंगसारखं करू नकोस अशी मी सारसबागेतल्या गणपतीला प्रार्थना करत असे.
रात्र रात्र जागून मी ते पुस्तक वाचत होते. मला आठवतंय, मध्यरात्रीचा दीड वाजला होता. दारासमोर ट्रकमधून कसलातरी माल उतरवण्याचं काम सुरू होतं. ट्रक्सची ये जा चालली होती. आईची निकराची बोलणी खाऊनही, धडधडत्या हृदयाने आणि विस्फारित डोळ्यांनी स्वयंपाकघरात, ओट्याजवळ खाली बसून मी फाऊन्टनहेड वाचत होते. प्रसंग होता गेल वीनंड बॅनर मधून रोआर्कच्या मागे सर्वक्तीनिशी उभा राहतो तो. लोक गेल ला नाकारतात. झिडकारतात. आजवर त्याने वाट्टेल ते छापलं तरी ते सहज वाचणारे वाचक त्याचं वर्तमानपत्र विकत घेणं नाकारतात. रात्रीच्या वेळी वृत्तपत्रांच्या गाळ्यांवरून न खपलेले बॅनरचे अंक परत येतात. त्याच्या पहिल्या पानावर रोआर्कचा फोटो छापलेला असतो. तो पाहून गेल ला हसायला येतं कारण न्यू यॉर्क शहरातल्या खुरटलेल्या लोकांना , अशा लोकांना ज्यांच्यात एवढी ताकदच नाही की ते रोआर्कला समजून घेऊ शकतील, गेल हॉवर्ड रोआर्क विकत असतो. तोही तीन डॉलरला एक. ....
हा प्रसंग वाचताना माझ्या अंगावर सरसरून काटा आला होता. ते बाहेरचे ट्रकचे आवाज आणि गेलच्या न खपलेल्या प्रती आणणाऱ्या ट्रक्सचे आवाज माझ्या दृष्टीने एकरूप झाले होते. तो प्रसंग जणू काही मी नजरेसमोर घडताना बघत होते. तो क्षण, ती वेळ, तो प्रसंग विसरणं मला प्रयत्न करूनही जमणार नाही. फाऊंटनहेड वाचण्यासाठी घेतलेल्या कष्टांचं दैदिप्यमान फळ हातात मिळाल्यासारखं मला वाटलं होतं.....
अजूनही नैराश्याच्या क्षणी मी रोआर्कचं कोर्टातलं तीन पानी भाषण वाचते. खूप बरं वाटतं. रोआर्क अजूनही मला पुरेसा समजलेला नाही. ती वाटचाल चालूच आहे. चालूच राहणार आहे.
रोआर्कनंतर खरं म्हणजे कोणाबद्दल लिहावं असा हिरो सापडणं एरवी मुश्किल ठरलं असतं. पण मला असा एक हिरो सापडला. साधारण पदव्युत्तर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असताना, जपानी भाषेच्या वर्गातल्या सेन्सेई आणि एक काका या दोघांनी माझं हॅरी पॉटर या विषयावर बौद्धिक घेतलं. तोवर मी "काय खूळ आहे ! " अशाच नजरेने हॅरीकडे बघत होते. पण हॅरीची सगळी गंमतच आहे. मी पहिलं पुस्तक वाचायच्या त्यावरचा चित्रपट पाहिला. हॅरीने मला वेड लावलं. माझ्या मनातलं जादूचं आकर्षण आणि या जगावेगळ्या पोरक्या मुलाबद्दल वाटणारी सहानुभूती यांचा एकत्रित परिणाम म्हणजे मी या कथेत अक्षरशः ओढली गेले. मी हॅरी वाचायला सुरुवात केली तेंव्हा त्याची पहिली चार पुस्तकं प्रकाशित झालेली होती आणि पाचव्या पुस्तकाची जोरदार प्रतीक्षा सुरू होती. सटासट एकामागोमाग मी चारही पुस्तकं वाचून काढली. तोवर पाचवं पुस्तकही माझ्या हातात पडलं. जपानीचा अभ्यास करता करता मी आणि काका हॅरी, लॉर्ड व्ही(व्होल्डी!), फॉक्स, यांच्यावर चर्चा करायचो. विशेषतः तिसरं पुस्तक मला विशेष आवडलं. पोरक्या हॅरीला वडीलधारं माणूस म्हणण्याजोगी एकच व्यक्ती म्हणजे सीरिअस भेटतो तो या पुस्तकात. शिवाय जेम्स आणि कंपनीच्या साहसी सफरींबद्दलही याच पुस्तकात वाचकाला कळतं. पॅट्रोनस, मरोडर्स मॅप आणि हॅरीचं विशिष्ट पॅट्रोनस यांच्याबद्दल वाचताना एक थरार जाणवतो. खूप छान वाटतं. हॅरी मोठा होतो तसतशी त्याच्या साहसांची पातळी वाढत जाते. ती वाचताना येणारी मजा वाढतच जाते. तरीही भूतकाळातली सफर, शंभर डिमेंटर्सच्या हल्ल्याला हॅरीने दोनदा दिलेलं समर्थ उत्तर या गोष्टी अद्वितीय आणि विलक्षण गुंगवून सोडणाऱ्या चमत्कृतींबद्दल बोलायचं झाल्यास चौथं पुस्तक जास्त रंजक आहे यात वादच नाही. आणि जादूगारांच्या विश्वाबद्दल अधिक माहिती मिळण्याच्या दृष्टीने पाचव्या पुस्तकाला तोड नाही. पण माझं सगळ्यात आवडतं पुस्तक हे तिसरंच आहे.
मनोगतावरही अनेक सदस्यांशी हॅरीबाबत चर्चा झाली. माझा एक मनोगती मित्र फ्रेड आणि जॉर्ज या खोडकर जोडगोळीचं काम एकटा निभावू शकेल असं माझं स्पष्ट मत आहे. ते त्यालाही चांगलं ठाऊक आहे. माझी अजून एक मनोगती मैत्रीण आणि मी तर दिवसरात्र हॅरी याच विषयावर चर्चा करत असतो. त्यापायी मोबाईल कंपन्यांना आम्ही कितीतरी नफा मिळवून दिला आहे. आता सातव्या पुस्तकात नक्की काय काय होणार, हॅरी सातवा हॉरक्ऱक्स आहे का? फॉक्स परत येणार का, आर ए बी म्हणजे रेग्यूलस ब्लॅक हे कितपत बरोबर आहे? स्नेप चांगला की वाईट, क्रीचरचा लॉकेट चोरण्यात हात असणं शक्य आहे का? असल्या अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा करत असतो. सव्वीस जुलै दोन हजार सात दिवसाची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. पण स्वतः जेकेआर ने म्हटल्याप्रमाणे आता हा मित्र पुन्हा भेटीला येणार नाही म्हणून मनाला चुटपूट लागलेली आहे. हुरहूर लागलेली आहे. एकीकडे सातवं पुस्तक वाचायची अनावर उत्सुकता आणि दुसरीकडे ही मालिका संपल्याबद्दलचं दुःख अशी मनाची रस्सीखेच सुरू आहे.
हॅरीने माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात खडतर काळात मला धीर दिलाय. साथ दिली आहे. निखळ आनंद दिला आहे. अनेक कोडी घातली आहेत आणि सोडवूनही दाखवली आहेत. अद्भुतरम्य जगाची सफर घडवून रंजन केलं आहे. सोसायला अवघड अशा दुःखाचा काही काळापुरता का विसर पाडला आहे. आणि दूर गेलेल्या रम्य शालेय जीवनाची गोडी पुन्हा एकदा अनुभवायला दिली आहे. हॅरी नसता तर हा काळ खूपच कठीण गेला असता. यासाठी मी हॅरीची आणि जेकेआरची ऋणी आहे.
या यादीत छत्रपती शिवाजी महाराज, राऊ, थोरले माधवराव पेशवे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, आणि मदनलाल धिंग्रांपासून ते अनंत कान्हेऱ्यांपर्यंत सगळे वीरवृत्तीचे क्रांतिकारक यांचा समावेश नसेल तर ही यादी निरर्थक ठरेल. पणा ही सगळी खरी माणसं आहेत. त्यांच्याबद्दल लिहायचं म्हणजे बराच अभ्यास करायला हवा. त्याशिवाय काहीही लिहिण्याची माझी लायकी नाही. पण वैराग्याचा भगवा रंग माझ्या भावविश्वात मिसळून ते अधिक तेजस्वी करण्यात या व्यक्तींचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्यापुढे मी अक्षरशः नतमस्तक आहे.
सध्या तरी माझं हे हिरोपुराण इथेच थांबवते आहे. पुन्हा नवीन हिरो सापडले की लिहीनच इथे.
राजते लेखनावधिः!
--अदिती
(१ मे २००७,
वैशाख शुद्ध चतुर्दशी, शके १९२९)
हिरो या शब्दाचा मूळ अर्थ बहुधा शूरवीर किंवा सेनापती असा असावा.(संदर्भ: अ हिरो हॅज फॉलन हे एज ऑफ मायथॉलॉजीमधले वाक्य!). पण मराठीत हिरो कसं म्हणावं याबद्दल मोठाच प्रश्न होता. कारण वीर म्हणायला जावं तर सगळ्यात आधी ते उपहासात्मक वाटतं. अंतू बर्वा ऐकत ऐकत लहानाची मोठी झाल्यामुळे आणि रत्नागिरीच्या मधल्या लोकोत्तर आळीशी बराचसा थेट संबंध असल्यामुळे जिभेला तिरकं वळणा आपसूकच आलंय. दुसरं म्हणजे आपल्या थोर हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रभावामुळे पंजाबी मुली आपल्या मोठ्या भावाला 'वीर' म्हणतात हे ऐकलेलं आहे. माझ्या या हिरोज ना मोठा भाऊ म्हणणं मला फारसं आवडणारं नाही. बरं नायक म्हणावं तर आम्ही सगळे इट्स माय लाईफ असं म्हणत आपल्या आयुष्याच नायकपद स्वतःकडेच असल्याचं बजावून सांगणाऱ्या पिढीचे शिलेदार! त्यामुळे माझ्या आयुष्यात हे एवढे सगळे नायक कसे येणार असा प्रश्न पडेल असं वाटायला लागलं. त्यामुळे माझे हिरोज असंच म्हणायचं हे ठरलं.
हॉर्न.ओके.प्लीज अर्थात ट्रकमागचं फाकडू तत्त्वज्ञान आणि मौलिक विचार.
काळजाला अक्षरशः भिडणारे हे मौलिक विचार प्रवासात ट्रकपाठीमागे वाचण्यात आले अन मन पिळवटून निघालं.
ट्रकचालक खरं आयुष्य जगले असं म्हणावसं वाटतंय! हे नमुनेच बघा ना!
लोकप्रियता आणि दर्जा या दोन्हीचा समतोल साधणे हे काही सोपे काम नाही. जनसामान्यांची अभिरुची ही सामान्यच असते आणि लोकप्रिय व्हायचे तर या जनतेला रुचेल अशीच अभिव्यक्ती असावी लागते. संख्याशास्त्रात प्रसिद्ध असलेला 'बेल शेप्ड कर्व्ह' हेच सांगून जातो. काही काही कलाकार बाकी जनप्रियता आणि कलात्मकता यांचा सुरेख मेळ घालून यशस्वी होऊन जातात. संगीतकार शंकर जयकिशन ही अशीच एक यशस्वी जोडी. शंकर जयकिशन यांच्या गाण्यांचा दोन भागातला 'बसंत बहार' नावाचा कार्यक्रम नुकताच पाहिला. शंकर जयकिशन यांचे संगीतक्षेत्रातले यश इतके घवघवीत आहे की त्यासाठी त्यांनी वाटेल त्या व्यावसायिक तडजोडी केल्या, इतर संगीतकारांना यश मिळू नये यासाठी राजकारण केले असे बरेच काही ऐकायला मिळते. ते सगळे सोडून या जोडीच्या उत्तम रचनांचा आस्वाद घ्यावा म्हणून या कार्यक्रमाला गेलो. 'हमलोग' ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे वादक आणि गायक अत्यंत तयारीचे होते. वाद्यवृंद - ऑर्केस्ट्रेशन - हे शंकर जयकिशन यांच्या संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य. ऍकॉर्डियन, मेंडोलिन, बासरी आणि व्हायलिन यांचे अत्यंत आकर्षक तुकडे वापरुन रचलेल्या या जोडीच्या रचना या कार्यक्रमातील वादकांनी हुबेहूब पेश केल्या. 'आवारा हूं' या गाण्याच्या वाद्यसंगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या गाण्यातले मेंडोलिनचे तुकडे आपापल्या मनाशी आठवून पहावेत! नूर सज्जाद या सज्जादसाहेबांच्या चिरंजीवांनी ते तंतोतंत वाजवले यात नवल काय? जिया बेकरार है ( बरसात) हे विभावरीनं गायलेलं गाणं आणि या जोडीला पहिलं फिल्मफेअर पारितोषिक मिळवून देणारं ये मेरा दीवानापन है (यहुदी ) हे प्रमोद रानडेनी रंगवलेलं गाणं यांनी माहौल तयार केला. प्रशांत नासेरीचं छेडा मेरे दिल ने तराना तेरे प्यार का (असली नकली) हे तर सदाबहारच गाणं. अनघा पेंडसेनं म्हटलेलं जूही की कली मेरी लाडली (दिल एक मंदीर) आणि सलील भादेकरनं म्हटलेलं सुर ना सजे ( बसंत बहार) हे गाणं हीही गाणी जमून गेली. हेमंतदांचा शंकर जयकिशन यांनी वापर अगदी माफक केला आहे पण पतिता मधलं याद किया दिल ने कहां हो तुम हे प्रशांत रानडे आणि विभावरी जोशी यांनी गायलेलं गाणं इझी चेअरमध्ये पहुडलेल्या देवानंदच्या हातातल्या सिग्रेटीच्या धूम्रवलयांसकट सगळ्या गोष्टींची याद देऊन गेलं.
हिंदी गाण्यांच्या चाली पाश्चिमात्य सुरावटी चोरुन त्यावर बांधलेल्या असतात, असा एक आरोप नेहमी केला जातो. सुनते थे नाम हम या विभावरीने गायलेल्या गाण्यात कम सप्टेंबरच्या चालीचा भास झाला खरा, पण ते गाणं आधी बांधलेलं होतं आणि कम सप्टेंबर ही धून नंतर आली ही माहिती मनोरंजक वाटली. संगीताची नेमकी जाण असलेल्या राज कपूरने शंकर जयकिशन यांच्या प्रतिभेचा उत्तम वापर केला हे आपण सर्व जाणतोच. दिल का हाल सुने दिलवाला (श्री ४२०) या ठेक्याच्या गाण्यातून हेच सिद्ध होतं. रात और दिन या चित्रपटाच्या संगीतात शंकर जयकिशन यांनी एक वेगळाच मूड लावला आहे. कदाचित ही त्या स्किझोफ्रेनिक तरुणीच्या कथेची मागणी असेल.आवारा ऐ मेरे दिल हे अनघानं गायलेलं असंच एक थोडंसं अपरिचित पण दर्जेदार गाणं. ये रात भीगी भीगी( चोरी चोरी) हे ऑल टाईम हिट सलील आणि विभावरीनं समरसून म्हटलं. संगम हा चित्रपट ज्यांना पूर्ण आठवतो त्यांना ये मेरा प्रेमपत्र पढकर च्या आधीची लांबलचक पण सुरेल सुरावट आठवत असेल - तसेच रफीच्या ओळी संपल्यावर वैजयंतीमालाचे गुणगुणणे - प्रशांत आणि विभावरीने गायलेल्या या गाण्यात असे बारकावे जबरदस्त पेश केले. मन्नाडे हा तर शंकर जयकिशन यांचा मुकेश इतकाच आवडता गायक. अब कहां जाये हम ( उजाला) या प्रमोद रानडेंनी गायलेल्या गाण्यात मन्नादांच्या सगळ्या जागा मुळाबरहुकूम दिसल्या.
ऍकॉर्डियन या तशा बदनाम वाद्याला प्रतिष्ठा मिळवून देणं हे शंकर जयकिशन यांचं एक मोठं काम मानलं पाहिजे. ऐ मेरे दिल कही (दाग) या सलील भादेकरच्या गीतामधली अनिल गोडेंची सुरावट आणि 'काऊन्टरमेलडी' मधले ऍकॉर्डियनचे तुकडे केवळ ऐकत रहावे असे पेश झाले. घर आया मेरा परदेसी (आवारा) या गाण्याचे ऑर्केस्ट्रेशनही असेच जबरी होते. संगीतकार अनिल विश्वास यांनी नाकारल्यामुळं शंकर जयकिशन यांच्याकडं आलेल्या बसंत बहार या शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटाला त्यांनी काहीशी खुन्नस खाऊनच संगीत दिलं असावं. त्यातलंच दुनिया ना भाये मुझे हे आर्त गाणं प्रशांतनं छानच सादर केलं. तूने हाय मेरे जख्मी जिगर को (नगीना) हे (चित्तरंजन यांच्या भाषेत सांगायचं तर 'डोक्यावर पदर घेऊन येणाऱ्या आवाजाच्या') विभावरीनं म्हटलं तर सुबीर सेनचं कठपुतली मधलं मंजिल वही है प्यार की हे सलीलनं. दिल की नजर से (अनाडी), आना ही होगा तुम्हे आना ही होगा (दीवाना), अय्यया सुकू सुकू (जंगली), ये वादा करो चांद के सामने (राजहठ), आ आ भी जा (तीसरी कसम), भंवरे की गुंजन (कल आज और कल), कहे झूम झूम रात ये सुहानी (लव्ह मॅरेज), रात के हमसफर (ऍन इव्हिनिंग इन पॅरीस), तुम्हे याद करते करते (आम्रपाली), हम है तो चांद और तारे (मैं नशेमें हूं) हीसुद्धा अशीच रंगलेली गाणी.
'शंकर जयकिशन यांच्या गाण्यांचा कार्यक्रम म्हणजे जे गाणं झालंच पाहिजे' निवेदिका म्हणाली 'ते गाणं म्हणजे 'रसिक बलमा (चोरी चोरी)' त्यातल्या पहिल्या आलापानंतर जो एक व्हायोलिनचा कमालीचा करुण तुकडा आहे तो रमकांत परांजपे यांनी असा काही वाजवला की तिथेच टाळी पडली. विभावरीने सु रे ख म्हटलेल्या या गाण्याबरोबरच हा भाग संपला असता तर बरं झालं असतं! रात गयी फिर दिन आता है (बूट पॉलिश) हा थोडासा ऍंटीक्लायमॅक्सच वाटला. आता उत्सुकता होती ती दुसऱ्या भागाची!
प्रतोद पुन्हा परत केव्हा येईल याची निश्चित कल्पना विश्वामित्र करू शकत नव्हते त्यामुळे बैठकीनंतर लगेचच त्यांच्याशी संपर्क साधायचे त्यानी ठरवले त्यानुसार आपल्या प्रयोगशाळेत त्यानी प्रवेश केला आणि समोर पहातात तो काय प्रद्योतच समोर ! क्षणभर हा भासच आहे असे त्याना वाटले पण दुसऱ्याच क्षणी प्रपातने त्यांची मनस्थिती जाणून चटकन पुढे होऊन " होय बाबा, आपला प्रद्योतच परत आला आहे."असे म्हटल्यामुळे ते भानावर आले आणि पुढे होऊन प्रद्योतला कवेत घेण्यासाठी पुढे सरकले , शास्त्रज्ञ असले तरी तेही शेवटी माणूसच होते.भावनावेगाने दोन्ही हात पसरून त्यानी त्याला आपल्या मिठीत घेतले.पण का कोणास ठाऊक हा आपला मुलगा नाही अशी भावना त्या स्पर्शातून उत्पन्न झाल्यासारखे वाटले त्याना.वर्षभर बापापासून दूर राहिलेल्या आणि परत भेट होईल की नाही अशी शंका असणाऱ्या मुलाच्या स्पर्शात जाणवणारी आतुरता त्यात नव्हती उलट तो स्पर्श एकाद्या अगदी अनोळखी व्यक्तीचा असावा अशी भावना त्यातून व्यक्त होत असल्याचा भास त्याना झाला.
" बेटा तू माझा प्रद्योतच आहेस ना?" न राहवून त्यानी विचारले.
" असे का म्हणता बाबा ?" प्रद्योत उत्तरला,"अशी शंका का बरे आली तुम्हाला ?"
"मला अशी शंकाच नाही तर खात्रीच वाटतेय की तू तो नव्हेस,असे वाटण्याचे कारण तुझा स्पर्श तो नाही,तुझी दृष्टी बदलली आहे आणि हा फरक केवळ तुझा बाप असल्यामुळे केवळ मलाच जाणवतो आहे.कदाचित काही काळानंतर तो प्रपातलाही जाणवेल.माझा अंदाज आहे की प्रतोदवासीयानी एक वर्षात तुझ्यावर काही प्रयोग केले असणार आणि त्याचाच हा परिणाम असावा.बर मला सांग तू आलास कसा?तुझ्याबरोबर कोणीतरी आलेच असणार,की तुला सोडून ते निघून गेले?"
"तुमचा अंदाज १००% बरोबर आहे विश्वामित्रजी, आणि त्याबद्दल तुमचे अभिनंदन !"आत प्रवेश करणाऱ्या आकृतीने म्हटले अर्थातच ती व्यक्ती एक वर्षापूर्वी प्रद्योतला घेऊन जाणारी प्रतोदवासीच होती.पुढे होऊन ती पुढे बोलू लागली.
"प्रथम तुम्ही आमच्या मैत्रीचा स्वीकार करण्याचा निर्णय केल्याबद्दल तुमचे अभिनंदन !आम्हास तुमच्या उच्चस्तरीय बैठकीचा अहवाल खरोखरच लगेचच मिळाला किंवा त्या बैठकीचे प्रत्यक्ष प्रक्षेपणच आम्ही पहात होतो म्हणाना.आमचा प्रगतपणाविषयी तुम्ही केलेल्या अंदाजाबद्दल तुमचे कौतुक करूनही त्या बाबतीत तुमची कल्पनाशक्ती जरा कमीच पडली असे खेदाने नमूद करावे लागते.कारण आमच्यापासून गुप्त रहावी म्हणून आमज्याविरुद्ध वापरण्यासाठी तुम्ही काय यंत्रणा निर्माण करीत आहात त्याविषयी खडान खडा माहिती आमच्याकदे आहे आणि आमच्या या दुसऱ्या भेटीच्यावेळी वापरण्यासाठी तुम्ही निर्माण केलेले लेसर आणि होलोग्राफिक मायाजाळ म्हणजे ती यंत्रणा म्हणजे आमच्या दृष्टीने अगदी पोरखेळ आहे आणि त्यामुळे त्यावर चुटकीसरशी मात करणे हा आमच्या हातचा मळच आहे आता जाऊन पहा,त्यातील एक तरी किरण शिल्लक आहे का ."
" आणि तरीही ------"विश्वामित्रानी मध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रतोदने त्यांचे वाक्यही पुरे होऊ दिले नाही.
"होय तरीही मानवजात हुषार आहे,बुद्धिमान आहे हे आम्ही जाणतो.त्याचमुळे एक दिवस तुम्ही प्रतोदवर नक्कीच पाऊल ठेवाल हे आम्ही जाणतो."
" आपण एवढे प्रगत आहात की आमच्याकडून तुम्हास कोणताच धोका संभवत नाही हेच सिद्ध होते यावरून.आणि तसे काही करण्याचा इरादाही नाही आमचा !"
" आज नसेलही तरी उद्याचा काय भरवसा ? निरनिराळ्या ग्रहावरील वातावरण निर्माण करण्याचे आपले प्रयोग काय दर्शवतात? याबाबतीत आम्ही कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही.याशिवाय तुम्ही किती शांतताप्रिय आहात याची पुरेपूर कल्पना आहे आम्हाला.फार पूर्वी तुमच्याच ग्रहावरील एका प्रगत आणि शांतताप्रिय देशावर इतर देशांनी स्वाऱ्या करून तेथील लोकांना हवे तसे लुटले.त्यानंतर एका महत्त्वाकांक्षी मानवाने सर्व जग आपल्या कह्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या वंशाभिमानाच्या अवास्तव जाणिवेने अनेक मानवांचा अमानुष संहार केला.त्यावेळी त्याच्या विरोधात लढणाऱ्या बाकीच्या देशानीही केवळ त्याला वठणीवर आणण्यात समाधान न मानता महासंहारक अणुशक्ती एकादे खेळणे लहान मुलाने वापरावे अशा पद्धतीने वापरून त्या क्रूरकर्म्यालाही लाजवील असा भयंकर नरसंहार घडवून आणला.लोकशाहीचे डांगोरे पिटणाऱ्या एका देशाने हम करेसो कायदा अशा वृत्तीने वागायला सुरवात करून अनेक देशांचा विनाश करायला सुरवात केली. आणि तुम्ही त्याला तोडीस तोड महासत्ताच न उरल्यामुळे हे सर्व निमूटपणे पहात बसलात.तुम्हाला एक संपन्न ग्रह मिळाला आहे पण त्याचे तुमच्या युद्धपिपासू आणि निसर्गाला लुटण्याच्या वृत्तीने वैराण वाळवंटात रूपांतर करून आता तुमची नजर दुसऱ्या कोठल्या ग्रहाचा असाच सत्यानाश करता येईल याकडे वळली आहे.आमची समृद्धी आता तुम्हाला खुपू लागली आहे.आम्ही प्रगत आहोत त्यामानाने आमचे मित्रग्रह मारिच आणि प्रबाहु कमी प्रगत असल्यामुळे कदाचित त्याना तुम्ही प्रथम लक्ष्य कराल पण आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी दक्ष आहोत हे लक्षात असू दे."
विश्वामित्र अस्वस्थ होऊन ऐकत होते.प्ततोदच्या उद्गारातील सत्य आणि तथ्य त्याना जाणवत होते. अनेकवेळा त्यानी आणि त्यांच्याचसारख़्या वैज्ञानिकांनी मानवजातीस इशारे दिले होते.पर्यावरणाचा ऱ्हास टाळा,निसर्गाचा समतोल राखा,निसर्गाने दिलेली दौलत वारेमाप उधळू नका,जंगले वाढवा,पण प्रत्येकास वाटे की हे सर्व इतरानीच करावे.परिणाम उघड होता.
" प्रद्योतला आम्ही घेऊन गेलो त्याला कारण हेच होते." आपले बोलणे पुढे चालू ठेवीत प्रतोद म्हणाला,"त्यामागे आमचे दोन उद्देश होते.पहिला आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला दाखवणे.त्यावर तुम्ही किती हतबल होता याचाही अनुभव तुम्हाला आला आहे.आमचा दुसरा उद्देश प्रद्योततर्फे तुमच्या कारवायांवर नजर ठेवणे.क्षमा करा हा शब्द वापरल्याबद्दल पण तुमचा पुढील टप्पा या तीन ग्रहापैकी शक्य होईल त्यावर ताबा मिळवणे हाच असणार आहे याची पूर्ण जाणीव आहे आम्हाला.आमच्याकडे एक वर्ष राहिलेल्या प्रद्योतवर आम्ही काही प्रयोग करून त्याच्या मेंदूतील काही पेशींमध्ये घडवून आणलेल्या बदलांमुळे तो जरी तुमचा मुलगा असला तरी त्याच्या मेंदूतील विचारप्रणालीची आता आमच्या संगणकांत नोंद होत आहे आणि त्यामुळे तुमच्या प्रत्येक हालचालीची नोंद आमचा संगणक घेत आहे. प्रद्योत हा एका परीने तुमच्या ग्रहावरील आमचा गुप्त हेर आहे.प्रद्योतचा स्पर्श,दृष्टी यात तुम्हाला वेगळेपण भासण्याचे कारण हे आहे."
" प्रद्योत हा केवळ एक नमुना आहे.केवळ आपला मुलगा असल्यामुळे त्याचा एवढा गाजावाजा झाला पण असे अनेक प्रद्योत सध्या पृथ्वीवर कार्यरत आहेत आणि त्याचा पत्ताही तुम्हाला नाही. आमचे विचार समजावून घेऊन तुमच्या राज्यकर्त्याना समजावणे हे काम तुम्ही आणि तुमच्यासारखे वैज्ञानिक विचारवंतच करू शकतील असे वाटत असल्यामुळे पहिल्यापासून आम्ही तुमच्या संपर्कात आहोत.आम्हास खात्री आहे की या कार्यात तुम्ही निश्चित यश मिळवाल. आम्ही शांतताप्रेमी असल्यामुळे विश्वशांतीच्या कोणत्याही प्रयत्नात तुम्हास सहकार्य करावयास आम्ही नेहमीच उत्सुक आहोत.आता आमची परतीची वेळ झाली आहे.प्रद्योत आमच्याशी केव्हाही संपर्क साधू शकतो. नमस्कार !"
प्रतोदचे शब्द पूर्ण होईपर्यंत यान निशब्दपणे केव्हा त्याच्यासमोर आले,त्यात प्रतोद केव्हां चढला आणि यान केव्हां सुरू झाले हेही विश्वामित्रांच्या लक्षात आले नाही.फक्त थोड्याच वेळात ते तिघे त्यांच्या नजरेपुढेच नाहीशा होणाऱ्या अंतराळयानाकडे पहात राहिले.
प्रद्योत परत येत आहे-दोन प्रश्न
१)ॐ ने दिलेल्या प्रतिसादात डोक्यावरून गेल्याचा उल्लेख आहे पण आता कथा पूर्ण वाचल्यावर पहिल्या कथेला "प्रासूर परत येत आहे" असे का नाव दिले आणि या पुनर्लेखनात प्रासूरच्या जागी प्रतोद असा बदल का केला हे मनोगती जाणू शकतील अशी आशा वाटते.
२)मराठी विज्ञान परिषदेच्या १९७५ मधील या विज्ञान कथास्पर्धेतील विजेत्याचे नाव काय असेल ( होते )?
वरील दोन प्रश्नांची उत्तरे देण्याचा मनोगतींनी प्रयत्न करावा अशी इच्छा आहे.
ऊर्जेचे अंतरंग-०८: मोजू कसा, किती मी तुज
एककास (युनिटला) चार रुपये दराने एन्रॉन वीजनिर्मिती करणार म्हटल्यावर सगळ्यांच्या भुवया वर चढल्या होत्या त्यावेळी. कारण तेव्हा वीज मराविमं (महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ) दर एककास दीड रुपया दराने सामान्य ग्राहकांना देत होते. एन्रॉनचा प्रस्ताव त्यावेळी तरी भविष्यातलाच होता. सामान्यांना ह्या तफावतीचे राजकारण उमगले नाही. आज मुंबईला वीज पुरवठा अविरत करता यावा म्हणून दर एककास सात-आठ ते दहा-पंधरा रुपये दराने महागाईची वीज मिळवितांनाही नाकी नऊ येत आहेत. तेव्हाच जर तुलना शास्त्रीय पद्धतीने करून त्वरीत ऊर्जोत्पादन सुरू केले असते तर आजचे दिवस ना दिसते.
मुंज, मौंजीबंधन, व्रतबंध अथवा तत्सम नावांनी ओळखला जाणारा विधी करावा का? आणि का करावा?
'आपण' ('आपल्यात' हे करतात) आणि 'ते' ('त्यांच्यात' हे करत नाहीत; इथे एक विशिष्ट जात सोडून बाकी सर्व जाती आणि धर्म एकत्र 'त्यांच्या'त ढकलले जातात) असा फरक त्या कळत्या-नकळत्या वयातच मनावर बिंबवण्याखेरीज त्या विधीतून काय साध्य होते?