'स्वरम्' प्रस्तुत पहिला कार्यक्रम "लॉली-पॉप"

'स्वरम्' या नवीन सुरु होणाऱ्या संस्थेविषयी -

'स्वरम्'

संगीत ही मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असणारी कला आहे. समाजातील प्रत्येक घटक कोणत्या ना कोणत्या प्रकारे संगीताशी निगडीत असतोच. अशा संगीतावर मनापासून प्रेम करणाऱ्या समाजातील सर्व घटकांना त्यांच्या अभिव्यक्तीसाठी, सांगितीक वृद्धीसाठी एक व्यासपीठ असावे या हेतूने 'स्वरम्' या संस्थेची निर्मिती केली आहे.

अहिल्यादेवी, रेणुका स्वरूप आणि हुजूरपागा

माझे आणि माझ्या काही मित्रमैत्रिणींचे निरीक्षण असे आहे की अहिल्यादेवी आणि रेणुका स्वरूप प्रशालेतल्या मुली सरळ आणि गरीब असतात. हुजूरपागेतल्या पण चांगल्या असतात पण थोड्याशा शिष्ट वाटतात.

तुम्हाला काय वाटते?

आणि त्यामागची कारणे काय असावीत?

निरुत्तर

(या कथेला काय नाव द्यावं कळत नव्हतं. जे ठीक वाटलं ते दिलं.)
संध्याकाळची वेळ, गर्दी, ट्रॅफिक, वाहनांचा आवाज आणि प्रदूषण यांनी कंटाळलेला तो एक सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबला होता. आख्खा एक मिनिट थांबावं लागणार म्हणून तो चांगलाच वैतागला होता. इकडे-तिकडे पाहत वेळ घालवत असतानाच त्याला डाव्या बाजूला एका रिक्षात बसलेली व्यक्ती दिसली. ती त्याच्याकडेच पाहत होती. ती हसली आणि तो आश्चर्याने उडालाच. सायलीच होती तर ती. :-) जरा गाल वर आलेले पण तेच तोंडभरून हसू आणि ओसंडून वाहणारा उत्साह. आणि हो तिच्याबरोबर एक बाळ पण होतं छोटासा. @-@ तिने रिक्षावाल्याला 'भैय्या यही रोक देना' म्हटल्यावर त्यानेही गाडी बाजूला लावली. आणि जवळच्याच हॊटेलात ते शिरले.

आखाती मुशाफिरी (२०)

 पुढे होत इदीने माझा हात हातात घेतला मला एक हलकेसे आलिंगन दिले आणि कॉफी मशीन कडे वळाला.
-----------------------------------------------------------------------
          इदीने कॉफी अंमळ कडकच केली होती. पण मला ती आवडली. इकडे आखातात येण्यापूर्वी भारतांत ज्या प्रकारची कॉफी, म्हणजे दूध-साखर घातलेली, प्यायलो होतो तशी ते इथे कधी मिळाली नाही. इकडची कॉफी म्हटली की दूध-साखर नसलेली गडद तपकिरी रंगाची आणि कडक कॉफी असायची. दूध तर इथे मिळतच नसे. त्याऐवजी दुधाच्या भुकटी सारखी पांढरी भुकटी कॉफीसाठी वपरायची. तिला कॉफी-क्रीम म्हणायचे.साखर मात्र ऐच्छिक. सुरुवातीला मला अशी काळी कॉफी अजिबात आवडत नसें पण कालांतराच्ने तिची चांगलीच संवय झाली.

बोधकथा.

उंटाची दोरी !

                            एकदा एक अरब व्यापारी शंभर उंटांचा तांडा घेऊन चालला होता.दिवस मावळताना तो एका गावात आला. गावातल्या मशिदीत एक फकीर राहत होता. व्यापारी त्याच्याकडे गेला. नमस्कार करून म्हणाला,"मशिदीबाहेर मी माझे उंट बांधले आहेत.पण एका उंटाची दोरी व खुंटी वाटेत गहाळ झाली आहे.कृपया मला एक दोरी व खुंटी द्या !" त्यावर फकीर म्हणाला,"बांध रे तसाच बांध उंट!" व्यापारी पुन्हा म्हणाला ,"अहो,दोरी आणि खुंटी नाही.मग कसा बांधू?" यावर फकिर म्हणाला, "चल मी बांधून दाखवतो उंट!" फकिर उंटाजवळ गेला.त्याच्याशेजारी खुंटी ठोकण्याचे नाटक केले.खुंतीला एक काल्पनिक दोरी बांधल्यासारखे केले आअणी दोरीची गाठ उंताच्या गळ्याला घट्ट बांधल्याचे नाटक केले. उंतावर एक थाप टाकली. आंइ आश्चर्य म्हणजे उंट खाली बसला. रात्रभर हलला नाही्. होता मोकळाच पण हलला नाही. सकाळी अरब जायला निघाला सगळे उंट उभे राहिले.पण हा उंट उठेचना. अरबाने फकिराला बोलावले.फकिर म्हणाला,"तसा  कसा उठेल तो? त्याची दोरी सोडायला हवी!"असे म्हणून त्याने उंटाची दोरी सोडल्याचे,खूंटी उपटल्याचे नाटक केले. उंटह्गी लगेच उठला आणि अंग झटकून चालू लागला.

१० लाख हस्तलिखितांचा खजिना

इ-सकाळने http://www.namami.org/ १० लाख हस्तलिखितांचा खजिना ऑनलाइन स्वरूपात खुला झाल्याची बातमी दिली आहे.दैनिक सकाळ म्हणते-- "भारताने आज १० लाख हस्तलिखितांचा "कीर्तिसंपदा' हा इलेक्‍ट्रॉनिक डाटाबेस तयार करून विश्‍वविक्रम नोंदविला आहे.

आवडती नावडती

एक होता गाव, त्या गावात एक मनुष्य होता, त्याला दोन बायका होत्या. एक होती आवडती व एक होती नावडती. जी नावडती होती ती दिसायला चांगली नव्हती. तिला फार कष्ट पडत. कोंबडा आरवल्यापासून ती कामाला लागे. ती दिवसभर सारखे काम करी. विहिरीचे पाणी तीच भरी. नदीवर धुण्याची मोट घेऊन तीच जाई. गुराढोरांचे तीच करी. दळण कांडण तीच करी. खटाळभर खरकटी भांडी तीच घाशी. झाडलोट, सडा-सारवण, दिवाबत्ती, सारे तीच करी. क्षणाचिही तिला विश्रांती नसे. इतके काम करूनही तिच्याजवळ कोणी गोड बोलत नसे. तिला गोड घास मिळत नसे. तिच्या वाट्याला रोज उठून शिळवड असायची. नेसू फाटके जुनेर असायचे. निजायला फटकुर मिळायचे. तिच्या अंगाखांद्यावर मणीमंगळसूत्राशिवाय काही नव्हते. हातात नीटसा बिल्वरही नव्हता. दागदागिन्यांचे एक असो मेले. त्याच्यावाचून माणसाचे अडत नाही; परंतु फुकाचा गोड शब्द, तोही महाग असावा ? परंतु या जगात गोड बोलण्याचाही पुष्कळदा दुष्काळच असतो.

आवाज

जन्माला येणाऱ्या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात! खळखळणाऱ्या पाण्याचा, वाऱ्याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते.
                पण हाच आवाज शहरांत फारच भीतिदायक रुप धारण करतो. शांतताप्रिय लोकांचे म्हणणे या गदारोळांत ऐकतो कोण? त्यांत ते संख्येने फारच कमी! तरी त्यातल्या कांहींनी दुर्दम्य चिकाटीने गोंगाट हा आरोग्याला कसा हानिकारक आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि सरकारला व न्यायालयांना तसे कायदे करावयास भाग पाडले. पण तिथेही तथाकथित धर्म आडवा आला. मतांसाठी राजकीय पक्ष तर लांगुलचालन करतातच, पण यावेळेस आश्चर्य म्हणजे कोर्ट पण झुकले! लोकमान्यांनी मागे एकदा " सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" असा अग्रलेख लिहिला होता. पण कोर्टाच्या बाबतीत तर तसेही म्हणायची सोय नाही.
               भारतीय समाजात तशा अंधश्रद्धा बऱ्याच आहेत. पण परमेश्वराला मोठ्ठा आवाज आवडतो, किंबहुना तो बहिरा असल्यामुळेच त्याच्यासमोर घंटा, थाळ्या, ढोलताशे वगैरे जे कांही हाती लागेल ते वाजवून त्याचे लक्ष आपल्याकडे वळवावे लागते असा भक्तांचा समज असावा. तसेच उत्सव हे आवाजानेच साजरे करायचे असतात, देव बहिरा असल्यामुळे सर्वांनीच लवकरांत लवकर बहिरे होऊन त्याच्याशी एकरुप व्हावे असा उदात्त हेतू मनाशी बाळगून सर्वजण कटिबद्ध असतात.
              कांही लोकांचे तर आवाज हेच टॉनिक असते. दोन मिनिटे शांतता पसरली तर यांचा जीव कासावीस होतो. मंद सुरांत गाण्याचा आनंद लुटणे यांना मान्यच नसते. दूरदर्शन, रेडिओ, म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो. लहान मुलांना एकवेळ आवाज करावा असे वाटले तर ते समजण्यासारखे आहे. पण लहानपणातला निरागसपणा, प्रामाणिकपणा मोठेपणी मागे पडतो पण ठणठणपाळपणा काही सुटत नाही!
              लहानपणी घरांत सगळे झोपलेले असताना जरा मोठ्याने बोलले तरी आई रागे भरत असे. रेडिओचा आवाज थोडा वाढला तर वडिलांच्या भुवया उंचावत. संस्कार संस्कार बहुधा हेच असावेत. आपल्यामुळे दुसऱ्याला जराही त्रास होऊ नये ही शिकवण घरोघरी होती. माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोऱ्या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते.
               हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???

श्रीमद्भगवद्गीता एक अनोखे पठण

सर्व गीताप्रेमीना.

दिनांक ३० मार्च आणि ३ एप्रिल रोजी कळवल्या प्रमाणे, १४ एप्रिल, शनिवार, सायंकाळी, बरोबर ५.३० वाजता, वनिता समाज दादर ( पश्चिम ) मुंबै, येथे श्री. चंद्रकांत (श्रीकृष्ण ) जोशी यानी, " रितायर्ड पर्संन्स असोसिएशन, तर्फे, "श्रीमद्गभगवद्गीता एक अनोखे पठण " हा एक आगळा वेगळा कार्यक्रम, सुमारे २०० गीताप्रेमींच्या उपस्थितीत सादर केला.

प्रेम करणे खरोखर गुन्हा आहे का ?

अमिताभ बच्चनचा डबल रोल असलेल्या एका चित्रपटात बाप बनलेला अमिताभ हातावर इंग्रजी ६ चा आकडा काढतो व पोरगा झालेल्या अमिताभ समोर धरून म्हणतो की 'तुला तुझ्या जागेवरून हा ९ दिसत असेल; पण मला तो ६ दिसतोय. आपण दोघेही बरोबर आहोत फक्त आपल्या जागा व दृष्टिकोन वेग-वेगळा आहे' असा काहीसा तो संवाद आहे.