विचार आणि चमत्कार.

 चमत्कार

                                             लोक नेहमीच चमत्कारावर विश्वास ठेवतात .का ते कळत नाही. थोर समाजसुधारकांचे विचार एकवेळ लोकांना पटणार नाहीत पण एखाध्या बुवाबापुने काही चमत्कार केला किंवा त्याच्या चमत्काराविषयी कळले की लागलीच काहीही विचार न करता त्या बुवाबापुचे भक्त बनायचे. बिचारे समाजसुधारक त्यांना आपले विचार लोकांना सांगताना नाकीनऊ येतात. काही जण त्यांना वेड्यात काढतात काहींना त्यांचे विचार पटतात पण उशिरा. तो पर्यंत हे समाजसुधारक काळाच्या पडधाआड गेलेले असतात. हल्ली समाजसुधारक दिसतच नाही.चमत्कारीक  बुवाबापू मात्र दिसतात. म्हणूनच वाटते बुवा,बापू होणे सोपे पण समाजसुधारक होणे सर्वात कठीण काम. तिथे अ. नि‌. स. वाले  अधूनमधून लढताना दिसतात त्यांच म्हणा ऐकतय तरी कोण. लोकांना अंधश्रद्धेबाबत काही समजावयाला गेल्यास लोक त्याला श्रद्धेचे गोंडस रुप देऊन मोकळे होतात. नेहमी विचार करतो की चमत्कारात काय एवढी मोठी शक्ती आहे की जी समाजसुधारकांच्या विचारात नाही . आपण म्हणतो हे शतक विज्ञानाचे आहे उच्च तंत्रज्ञानाचे आहे कशावरून हे सारे आपण म्हणतो निरनिराळे शोध लागले म्हणून का. हल्ली पालख्यांचे पेव फुटले आहेत लोक दुरवर चालत जातात . का जातात ते कळत नाही पण जातात हे नक्की. हल्ली देवदर्शनालाही पायी चालत जाण्याचे स्तोम वाढले आहे. काही महीन्यांपुर्वी अमिताभ बच्चन कुटूंबियांसोबत जाऊन आला. तेव्हा वाटते याला प्रचिती आली वाटते. म्हणजे हे सर्व खोट नाही खर आहे . नंतर कळते भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. इथे ज्याला त्याला काहीही करण्याचा अधिकार आहे. टिका करण्याचा सुद्धा अधिकार आहे.

ह्या शब्दाचा अर्थ कळू शकेल काय?

माझे वय अंदाजे १०-११ वर्षांचे असेल. त्यावेळी मी रहात असलेल्या सहनिवासामधे, एका सदस्याने दुसऱ्या सदस्याबद्दल एक तक्रारपत्र सहनिवासाच्या सूचना फलकावर लावलेले आठवते. हे गृहस्थ भयंकर भांडकुदळ म्हणून प्रसिध्ध होते.

त्यातले एक वाक्य अजून आठवते. " श्रीयुत XXXX ह्यानी सहनिवासाच्या अनुमतीशिवाय धष्चोटपणे अतीरिक्त नळाची जोडणी केली व आमचे पाणी तोडले" !!

डॉक्टर डॉक्टर!

नमस्कार,

आपण डॉक्टर कडे का जातो?, किंवा आपला एक ठरलेला Family  डॉक्टर (मराठी षब्द सुचवावा) का असतो?. तसे बघायला गेले तर पहिल्या प्रष्नाचे ऊत्तर जरा सोपे आहे, आपलि तब्येत खराब झाल्यावर, पण दुसऱ्या प्रष्नाचे ऊत्तर जरावेगळे असु शकते. ते म्हणजे, घराजवळ आहे म्हणून, गोळ्यांना ग़ुण आहे म्हणून, जुनी ओळख आहे म्हणून...

बूलियन तर्कशास्त्र: आणि,किंवा,नाही इ.इ.

"गॅस संपला आहे? मग खाणं घरी मागवू किंवा मग बाहेर जेवायला जाऊ"
(खाणं घरी मागवलं काय किंवा बाहेर जेवलो काय, निकाल एकच. जेवणाची व्यवस्था झाली.)
"ज्याचे शिक्षण या पदाला साजेसे आहे आणि ज्याच्या पगाराच्या अपेक्षा आम्हाला परवडतील त्या माणसाला आम्ही नोकरी देऊ."
(साजेसे शिक्षण, आणि पगाराच्या अपेक्षा या दोन्ही गोष्टी जुळल्या तरच अपेक्षित निकाल. त्या उमेदवाराची निवड.)
आपण बोलता बोलता 'आणि' व 'किंवा' या शब्दांचा वापर कितीदा तरी करतो. व्यवहारात स्वत:लाच काही अटी घालून घेतो. त्यातली एक आणि/किंवा अनेक अटी एकाचवेळी पूर्ण झाल्या तरच त्या अटींवरुन अवलंबून असलेला अपेक्षित निकाल(आउटपुट) आपल्याला मिळतो. आता या अटी आपल्याला हव्या तशा एक किंवा अनेक एकाचवेळी पूर्ण होतायत का, तपासणार कोण? आपलं मन. बूलियन तर्कशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्या मनात अनेक 'लॉजिक गेटस' आहेत, जी अशा अनेक अटी सतत तपासून त्याप्रमाणे काय करायचं याचा निर्णय घेत असतात.

भित्री भागुबाई

काल आमच्या सोसायटीमध्ये चोरी झाली. तेही गेल्या चार दिवसांतील दुसरी चोरी. दोन्हीमध्ये एक गोष्ट सारखी होती. दोन्हीही घरे भारतीय माणसाची होती आणि त्यांचे सर्व सोने चोरीला गेले. काल तर जिथे चोरी झाली तिथली बाई लॉन्ड्रीरुमध्ये गेली होती, ती परत आली तेव्हा टॊयलेटमधील फ्लशचा आवाज आला.

नाट्यछटा आणि कृत्रिमपणा - 'हरलातच ना शेवटी...'

दिवाकरांच्या नाट्यछटांच्या निमित्ताने इथे झालेल्या चर्चेत नाट्यछटा हा स्वसंवादासारखा प्रकार आता कालबाह्य  झाला आहे की काय असे मत व्यक्त करण्यात आले होते. मला वाटते की हा प्रकार दिवाकरांनंतर इतर कुणाला म्हणावा इतका समजलाच नाही. दिवाकरांच्यी काळातील लेखनभाषा ही एकंदरीतच अलंकारिक, बटबटीत, अनैसर्गिक आणि भडक असे. त्यामुळे या नाट्यछटा आज कृत्रिम वाटणे अगदी स्वाभाविक आहे. पण ज्याप्रमाणे मराठी कविता कालानुरुप बदलली, तशी जर नाट्यछटा बदलत गेली असती तर कदाचित नाट्यछटेचे एक वेगळे, कालसंगत रुप आपल्या समोर आले असते.
आजच्या काळात नाट्यछटांचे पुनरुज्जीवन करायचे म्हटले तर तिचे स्वरुप कसे असेल, तिचे विषय, वापरलेली भाषा कशी असेल यावर विचार करताना मला सुचलेल्या काही ओळी खाली देत आहे. ही आदर्श नाट्यछटा आहे असा माझा दावा नाही. एखाद्या लेखनप्रकाराची उत्क्रांती होत होत गेली तर तो कालबाह्य होत नाही, हे सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे. 

ऐसी अक्षरे सीडॅके मेळवीन !

आजच्या ईसकाळात ही बातमी वाचली आणि लवकरच सर्व भारतीय भाषांतली संकेतस्थळे कधी ना कधी देखणी, सुंदर आणि नीटनेटकी दिसायला लागतील, हे स्वप्न सत्यात रूपांतरित होण्याची शक्यता दिसू लागली. सर्वांना विचारांची देवाणघेवाण करता यावी ह्या उद्देशाने ती बातमी येथे उतरवीत आहे.

नशा...

ह्या रिक्षावाल्याचा काय problem आहे कळंत नाही. मझ्या आणि मंजूच्या का असा मागे लागलाय? सूखाने जगू देत नाही साला. ह्याला बरोबर वठणीवर आणला पाहिजे. पण सहजशक्य आहे का ते? युद्धच पुकारावं लागेल.

टेह्ळणी करा, टेहळणी करा, शत्रू केव्हा नेम साधेल सांगता येत नाही. चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त हवा..... पण कसा बंदोबस्त ठेवणार? सामान तरी कितीसं आहे इथे? सहज माझी नजर खुर्चीकडे जाते. मी झटकन जावून खुर्ची उचलतो आणि खिडकीसमोर ठेवतो. इथूनच दिसतो साल्यचा रिक्षास्टॅंड. पण नुसत्या खुर्चीनं भागणार नाही. मी परत टेबलाजवळ जातो आणि त्यच्यावरची पुस्तकं खुर्चीवर रचतो......... हं, आता झाली भिंत चिरेबंद. आता ये म्हणावं साल्याला. आणि बरं का रे साल्या, मी काही रंगांधळा नाही. तुमचे खाकी कपडे बरोबर ओळखतो मी.

अजून काय बरं हवं होतं.......... हं, दुर्बिण. दुर्बिण कुठे ठेवलीत बहिर्जी?....... मिळत कशी नाही? मी टेबलावरचं वर्तमानपत्र घेतो, त्याची गुंडाळी करतो. झाली दुर्बिण. खुर्चीवर पाय ठेवून आता मी दुर्बिणीतून खिडकीबाहेर बघतो....... हं. हा रस्ता, हा रस्त्यावरचा विजेचा खांब, ह त्याला टेकून पथारी पसरून बसलेला चांभार आणि हा बसस्टॉप. हा रिक्षास्टॅंड, आणि ही मंजू. ही कशाला मरायला चाललेय तिथे? हजार वेळा सांगितलं रिक्षाने जावू नको म्हणून. ए, तो फसवेल तुला, गटवेल तुला. Thank God वाचलो. ती बस स्टॉपवर जावून उभी राहिली.

हा कुणी मला धक्का मारला? अरे, हा रिक्षावाला इथे काय करतोय? आणि साला मला बाजूला ढकलून माझ्याच दुर्बिणीतून बघतोय. बाहेरचं वर्णन मला ऎकायचं नाहिये रे. कोण बाई? आपल्या बाई? हरामखोरा ती बायको आहे माझी. आपल्या बाई म्हणू नकोस साल्या........... हिला पण आत्ताच गॅस संपल्याची वर्दी द्यायचेय. घरात स्टोव्ह आहे, रॉकेल आहे. .........माझं त्याच्याकडे लक्ष जातं. तो अजूनही माझी दुर्बिण वापरतोय. मी त्याला पुन्हा बजावतो. ऎकत नाही म्हणजे काय? मझा राग अनावर होतो. मी त्याला जीवाच्या आकांताने ढकलतो.

साला तो चिडला बहुतेक. उठून अंगावर येतोय. ढकलतोय. अरे साल्या जबरदस्ती करतोस काय? अजून मला तो पाठी ढकलतोय. सुशिक्षित म्हणून माज आला का असं विचारतोय. अरे बाबा माझा तसा हेतू नव्हता. शी. काय ही भाषा..... म्हणे बायको राखायची जमत नाही तुम्हाला आणि सुशिक्षित म्हणून चांगले नग उचलता? तुमच्यासारख्या छक्क्यांनी खरंतर लग्नच नाही केली पाहिजेत. म्हणे गरज असेल तर अशा बायकांशी लग्न करा ज्यांना पाहून पुरुषांच्या माना खाली गेल्या पाहिजेत. गांडीत दम नाही तर आणली कशाला बायको? का पाहू नये आम्ही वाईट नजरेने तुमच्या बायकांकडे? आम्हाला माहितेय तुम्ही झाट वाकडं करू शकत नाही आमचं....... अरे जा ना साल्या आता बोललास तेवढं पुरे नाही का? परत का येतोय हा? शी, पुन्हा गलिच्छ भाषा.......... म्हणे बाईंना स्कर्ट का काय ते घालायचा आग्रह करा. ते क्रीम बीम पायाला लावून केस झाडायचं.

गेला साला. पण काय ही घाणेरडी भाषा. त्याचे शब्द माझ्या कानांत वावटळीसारखे घुमतायत. असह्य. असह्य होतंय सगळं. अगतिकता का नपूंसकत्व? त्याचा आवाज चारही बाजूंनी माझ्यावर हल्ला करतोय. सहनशक्तीपलिकडे आहे माझ्या हे सगळं. असहाय होवून मी जोरात किंचाळतो. गेले, त्याचे घुमणारे आवाज गेले. आता फक्त नीरव शांतता.

मी थरथरतोय. थरथरतच मी खिशातली सिगरेट काढतो. पेटवतो. .........आम्ही तुमचं झाट वाकडं करू शकत नाही काय? आम्हीही तुमचं वाकडं करू शकतो.......... हातातली सिगरेट जमीनीवर आपटून मी ती चिरडतो........... असा चिरडेन मी तुला साल्या. शिपाईगिरी रक्तात आहे आमच्या. थोरल्या आबांचे वारस उगीच नाही आम्ही. ही सगळी पृथ्वी रिक्षारहित करेन आणि मगच प्राण सोडेन. अरे, ह्या छोट्या मोठ्या लढाया? ह्या हरल्या म्हणून काय झालं. The ultimate Victory is ours. माझ्यासारखी अठ्ठावीस वर्षाची कोवळी पोरं गंडवता?

हे मला एकट्याला झेपेलसं वाटत नाही. आबा आणि थोरल्या आजोबांची मदत घ्यायला हवी. पण ते तर मृत आहेत. मग? प्लॅंचेट. प्लॅंचेट करून त्यांना बोलावता येईल. मी टेबलावरचा खडू उचलतो आणि एका बाटलीचं झाकण घेतो. जमीनीवर एक गोल काढून त्याच्या मध्यभागी ते झाकण ठेवतो. आता पूर्वजांना मदतीचं आव्हान करायला हवं.

.......हे स्वर्गस्थ पूर्वजांनो, तुमच्या ह्या भाग्यशाली कुळातला नव्या दमाचा शिलेदार तुम्हाला आवाहन करीत आहे. या, आणि तुमच्या ह्या कुलदीपकाला तुमच्या दिव्य शक्तिस्रोताने भारून टाका. शक्ती द्या मला लढण्यासाठी कारण हे युद्ध साधंसुधं नाही. हे महायुद्ध आहे. नाही हे दोन व्यक्तींतलं, नाही वर्गातलं, हे महायुद्ध आहे दोन प्रवृत्तींतलं. एकीकडे आपला म्हणून मी तर दुसरीकडे त्यांचा म्हणून तो. रिक्षावाला. उन्मत्त, उद्दाम, उथळ, उलट्या काळजाचा रिक्षावाला. ज्याच्या नसानसांत भरलेय गुंडगिरी, दादागिरी. मिटरप्रमाणे पॆसे घेत नाही साला.

हा रुद्राचा आवज कुठून येतोय? प्रकाशही कमी झालाय. प्लॅंचेटचा परिणाम? .............या आबा, या थोरले आजोबा तुम्हीही या. शक्ती द्या मला लढण्यासाठी शक्ती द्या मला Please शक्ती द्या मला. Oh Its moving टोपण हललं प्लॅंचेट्ने येणार असा कॊल दिला. ते येणार शक्तीचे घट भरून आणणार, ते येणार, ते आले, ते आले, ते आले........... हा कसला आवाज? कोण टाळ्या वाजवतंय? छे.

रुद्राच्या मंत्रोच्चारात काही क्षण कसे गेले कळंत नाही. प्रकाशही पूर्ववत होतोय असं वाटतंय. सारं कसं शांत शांत वाटतंय........ मंजू, माझी मंजू. किती स्वप्न होती आपल्या दोघांची. कॉलेज संपण्याआधी लग्न केलं ते ही सगळी स्वप्न. प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच. वेळ कमी पडू नये म्हणून. पण प्रत्यक्षात मात्र, प्रत्यक्षात मात्र मी असा विचित्र वागायला लागलो. पण मी तरी काय करणार मंजू. त्याने आपल्याला जगूच द्यायचं नाही असं ठरवलं होतं ना. आपल्या प्रत्येक सुखाच्या आड येत होता तो रिक्षावाला. घरी, ऑफिसात, बाजारात, दुकानात. पण आता तू काळजी करू नकोस. आज त्या रिक्षावाल्यचा पुरता बंदोबस्त झालाय.

हरामखोरा, आम्ही चांगले नग उचलतो म्हणून तुमचं फावतं. आज थोरले आबा उभे आहेत तिच्या परतीच्या वटेवर. मंजूच्या. पाय बघायचेत काय तुला साल्या तिचे? पाय बघायचेत? बघ म्हणावं किती बघतो लुळे पाय ते. तिला कमरेखाली निकामी करण्याचं आश्वासन दिलंय थोरल्या आबांनी. कुबड्या देणारेत तिच्या हातांत. मंजूच्या. हो, काहीही करू शकतात ते. स्वर्गस्थ आहेत ते. आणि यदानकदा नाही जमलं, तर आबांनी गॅस सिलेंडर एवढ्यात मिळणार नाही ह्याची व्यवस्था केलेय. अरे, आबा म्हणजे आजोबा, वडील नाहीत मठ्ठा. ते अजून स्वर्गस्थ नाहीत. आणि मी इथे स्टोव्ह ला रॉकेल ची आंघोळ घालून ठेवलेय. पेटवला की भडका. आता सिलेंडर मिळाला नाही म्हणजे बाई स्टोव्ह पेटवणारच ना? बाई चांगल्या दिसतात म्हणून माना वळतात ना तूमच्या? आता वळवा माना, आता दाखवा हिम्मत मान वर करून बाईंकडे बघायची. मांजरासारखे सरळ व्हाल रे. ढुंगणाला पाय लावून पळूनंच जाशील तू.

विजयाचा कॆफ आता माझ्या नसानसांतून भिनलाय. रिक्षावाल्याचा पुरता बंदोबस्त झालाय. आबा आणि थोरल्या आबांनी मिळून त्याची पुरती वाट लावलेय........... सहा नंबरचा प्रतिकार काय आमचा? आता पहा आमची शिपाईगिरी............. शिपाई सावधान म्हणून मी सावधान पवित्रा घेतो. कोणी दरवाजा वाजवतंय का? असेल. आता कोणीही दरवाजा वाजवूदे. लढाई महत्त्वाची. शिपाईगिरी महत्त्वाची. युद्ध, महायुद्ध महत्त्वाचं.

..........ही मंजू माझ्या शेजारी येवून काय बरळतेय? सिलेंडर वर उचलून आणायला रिक्षावाल्याने मदत केली म्हणून सांगतेय. काय डोकं बिकं फिरलं का हिचं? ती बेअक्कल आहे. आपण आपली कवायत करावी. .......मी जोरात घोषणा देत कवायत करतो आणि मंजूच्या समोर येवून तिला एक salute ठोकतो impression मारायला. ती का रडतेय? आपला विजय झालाय मंजू. आपण जिंकलोय..... ती रडत रडत घराबाहेर निघून जाते...........

आला का हा रिक्षावाला पुन्हा. साल्या तुझं म्हणजे कुत्र्याच्या शेपटासारखं आहे. वाकडं ते वाकडंच. बायको सोडून गेली म्हणून मला डिवचू नकोस हरामखोरा. तुझ्या कुजकट बोलण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. मी एक दहा रुपायाची नोट त्याच्या अंगावर भिरकावतो आणि त्याला get out चा आदेश देतो. तो जवळ्जवळ घाबरूनच निघून जातो.......... हं, आता मी शांतपणे शिपाईगिरी करू शकेन. शिपाई salute कर. असं म्हणून मी एक salute ठोकतो.

समोरून एक लाल प्रकाश माझ्यावर एकवटतो. बिगुल वाजल्याचं पार्श्वसंगीत सुरू होतं. प्रकाश कमीकमी होत जातो, तसे समोरचे प्रेक्षक उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करतात. पडदा हळू हळू बंद होतो. टाळ्यांचा कडकडाट चालूच रहातो. मी माझ्या नशेमेधे धुंद तिथेच उभा असतो. मघाशी मला धमकावणारा रिक्षावाला विंगेतून धावत येतो. मला आलिंगन देतो. नाटक संपलेलं असतं, मी भानावर येत असतो. पण नाटकाची ही नशा मात्र अधिकाधिक चढत जात असते.

"सिटी ऑफ गॉड" बद्दल

"सिटी ऑफ गॉड" हा चित्रपट पुण्यातील गोल्ड ऍडलॅब्ज मध्ये लागणार आहे. तेव्हा वेळ न घालवता तिकिट, देणगी प्रवेशिका, फुकट पास जे मिळेल ते घ्या. काहीही मिळालं नाही तर डोअरकीपरला वशिला लाऊन पायरीवर बसून बघा पण मोठ्या पडद्यावर पाहण्याची सुवर्णसंधी अजिबात घालवू नका.

आरक्षण का असू नये.

नमस्कार,

               जय महाराष्ट्र!

                                               आरक्षण का असू नये.इथे मनोगतावर काहीजण आहेत ज्यांचा आरक्षणाला विरोध आहे.त्यांच्या विविध प्रतिसादामधून ते दिसून आले आहे.म्हणुनच ही चर्चा.  आरक्षण घटनेने दिलेला अधिकार आहे. भारत हा देश जातीपातीत विभागलेला आहे. प्रत्येक मागास वर्गाचा विकास होण्यासाठी आरक्षण काढले गेलेले आहे. सरकारी नोकऱ्यांत आणि शैक्षणिक संस्थात आरक्षण लागू आहे. मागास वर्गातील(एससी. आणि एसटी) ५९ जाती आहेत. विमुक्त जाती १४ आहेत. इ.मा.व.(ओ.बी‌‌.सी.) ३३२ जाती आहेत. विशेष मागास प्रवर्गात ४२ जाती आहेत. यातही अनेक प्रकार आहेत.त्यानुसार जातींची संख्या वाढते. या सर्व जातींना आरक्षण लागू आहे. त्यातले काहीजण आरक्षणाचा लाभ घेत असतील तर काही जण नाही. या सर्व जाती समूहांचा विकास झाला आहे का? आपणास काय वाटते.  एकादोघांचा विकास पाहून समाज सुधारला आहे आता आरक्षणाची गरज नाही असे आपणास वाटते का?