साईबाबा/स्वामी समर्थ/गजानन महाराज आदींचा काय दोष?

जेव्हा जेव्हा श्रद्धा - अंधश्रद्धा हा विषय चर्चेला येतो तेव्हा तेव्हा, जमेल तेवढे कटू शब्द वापरून साईबाबा/गजानन महाराज/स्वामी समर्थ  आदी लोकांचा उद्धार करणे म्हणजे आपण फ़ार मोठे विज्ञान वादी असा काहीसा गैरसमज सगळीकडेच दिसतो...मनोगतावर ते आहेच.

बटाट्याच्या वड्या (काप)

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • बटाटे ५
  • ओला नारळ (१ वाटी किसुन)
  • साखर (२ वाटी)
  • वेलची पुड
  • तुप
  • थोडा सुक्या नारळाचा कीस

मार्गदर्शन

सर्व प्रथम बटाटे उकडुन घ्यावेत. थंड झाल्यावर ते किसुन घ्यावे किंवा हाताने स्मॅश करुन घ्यावे.

गॅसवर कढईत तुप गरम करुन त्यात साखरेचा पाक करुन (घट्ट नको)  वरिल साहित्य टाकुन ढवळावे.(वेलची पुड नंतर टाका)  ते एकजीव होई पर्यंत चागले ढवळावे. लालसर रंग यायला लागला कि लगेच गॅस बंद करा.

सध्याचा भारत स्वातंत्र्यापूर्वीच्या भारतापेक्षा

जाती धर्मामध्ये जास्त विभागला गेला आहे असे तुम्हाला वाटते का?


१. जातीवार संस्था
२. धर्मावार पक्ष
३. प्रांतवार पक्ष
४. आरक्षण
५. धर्म आणि जातीनुसार मिळणाऱ्या सुविधा.


ह्यामुळे भारतीय समाजमन हे भारताशी एकनिष्ठ न रहाता त्या त्या जाती किंवा धर्माशी एकनिष्ठ होत आहे.

मितान्नी -सिरीया मार्गे संस्कृत

दुवा:मितान्नी  १५०० बीसी मध्ये सिरीयातील राजवटीतील राजांच्या नावावर संस्कृत शब्दांचा प्रभाव अस्ल्याचे आढळून येते.


१५०० बीसी मध्ये सिरीयातील राजवटीतील राजांच्या नावावर संस्कृत शब्दांचा प्रभाव अस्ल्याचे आढळून येते.

अंडा राईस

वाढणी
माहीत नाही

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • १ कटोऱी शिळा/ ताजा भात
  • २ अंडी
  • १ टमाटर
  • १ छोटा कांदा
  • २ मिरच्या
  • तेल, मीठ, थोडीश्शी धने पावडर, थोडीश्शे जीरे , कोथिंबीर

मार्गदर्शन

फ़्राईंग पॅन मध्ये तेल गरम करा (जेव्हढे पसरट पॅन असेल तेवढे चांगले)

मोहरी टाका, मोहरी तडतडल्यावर

त्यात बारीक चिरलेला कांदा टाका, कांदा चांगला परतल्यावर टमाटर अणी मिरच्या टाका, हे झाल्यावर जीरे , धनेपावडर टाका,

काय करावे आपल्या चमुला ?

९१ धावांत संपूर्ण संघ बाद !
त्यातल्या ३५ धावा सचिनच्या !
बाकी सगळे कागदी शेर...... ढेर !
काय करावे आता ह्या चमूला ? कोणाची चूक आहे ?
संघव्यवस्थापनाची की ग्रेग चॅपेलची ?
सचिनची की राहुलची ?
सेहवागची की हरभजनची ?
कोण जबाबदारी घेईल आपल्या संघाच्या पतनाची ?
ग्रेग चॅपेल ?
मी सौरभ गांगुलीला भरभरून नांवे ठेवली !
चूक माझीच होती........
कसे कळले नाही तो एकटाच शर्ट काढू शकतो ह्या सगळ्यांच्यात?
कसे कळले नाही तो एकटाच नाणेफेकीसाठी आपल्या मर्जीने येऊ शकतो ?
कसे नाही कळले तो एकटाच जिंकू किंवा मरू ह्या जिद्दीने खेळतो ?
माझ्या एकट्या सचिनच्या भरवशावर किती दिवस मी बसावे ?
हा सामना पाहावा की आपल्या कामाला लागावे?
काय करू ?
सुचेना......
तुम्हीच सुचवा.........

तेजस्विनी-३

"देसाई, आपल्या मतदार संघात जिल्हा परिषदेसाठी ३ जागा आहेत. त्यातली एक सिट महिलांसाठी राखीव करण्यात आलेली आहे. इतर दोन जागा मोकळ्या आहेत, राखीव जागेचे काय करायचं ?" संतोषभाऊंनी देसाईंना खुर्चीत टेकत नाहीत तोच सरळ प्रश्न केला.
"भराडे बाईंखेरीज आपण आणखी कोणाला उभे करू शकणार भाऊ ?" देसाईंनी प्रतिप्रश्न केला.
"का ? भराडे बाईच का ?" संतोषभाऊंनी सुरेखाताईंबरोबर झालेले संभाषण अजून पर्यंत कोणालाच सांगितलेले नव्हते. त्यांना फक्त आपल्या जवळच्या सल्लागार मंडळींचा अंदाज घ्यायचा होता.
"आजच्या परिस्थितीत विरोधकांसाठी त्याच योग्य उमेदवार आहेत, राजकारणाचा अनुभवपण आहे व पाटलांच्या गोटातून आलेल्या असल्याने त्यांची सगळी अंडी पिल्ली जाणतात." देसाईंनी एका दमात भराडे बाईंची राजकीय वाटचाल सांगितली.
"पण बाई तोंडाच्या फाटक्या आहेत."...... 
"भाऊ, थोडे फार दुर्गुण प्रत्येकात असतातच. त्यांच्या दुर्गुणांचा झाला तर फायदाच होणार आहे आपल्याला."
"त्यांच्या ऐवजी दुसऱ्या नांवाचा विचार करायचा झाल्यास ?" भाऊंनी खडा टाकला.
"एकतर सद्य परिस्थितीत आपल्याकडे म्हणावा तसा ताकदवान उमेदवार नाही; दुसरे म्हणजे बाईंऐवजी दुसरा उमेदवार दिल्यास बाईंचा उपद्रव ऐन निवडणूकीत होईल" देसाई पटकन बोलले.
"बघूया काय करायचे ते, इतर दोन उमेदवारांवर पण विचार करावाच लागणार आहे तेव्हाचं ह्या जागेबद्दलही विचार करू" संतोषभाऊ बोलले.
*************************************
सुनील पाटलाने हेडमास्तरांवर सोपवलेले काम करण्याची तशी इच्छा मास्तरांची नव्हती,  पण नानासाहेब पाटलांच्या कृपेने मास्तरांना लायकी नसताना हे पद मिळाल्याचे ते स्वत: जाणून होते. मोहिनी इंगळे त्यांची कोणी लागत नव्हती; तीच्या भवितव्याचा विचार करण्याऐवजी स्वत:च्या भविष्याची मास्तरांना जास्त काळजी होती. म्हाताऱ्या आईला तालुक्यातल्या दवाखान्यातली चांगली उपचार पद्धती ते तालुक्याच्या शाळेचे हेडमास्तर होते म्हणूनच मिळतेय हेही त्यांना व्यवस्थित कळत होते. असेही दोन शिक्षक शाळा सोडून गेल्याने जागा रिकाम्या होत्या त्या भरून काढायच्याच होत्या. ह्या निमित्ताने शाळेवर, पोरांवर व सुनील पाटलावर उपकार करण्याची संधी त्यांना आयती मिळाली होती ती हातची घालवण्याइतके ते मूर्ख नव्हते.
 पाडळस्याची प्राथमिक शाळा तालुक्याच्याच शाळेशी जोडलेली होती. उत्तरपत्रिका तपासण्यापासून ते पगार भत्त्यांपर्यंतची सगळीच कामे तालुक्यावरून संमती आल्याखेरीज पुढे सरकत नसत. मोहिनी इंगळेने डिएड ची पदविका घेतलेली होती. फक्त प्रार्थमीक वर्गांवर शिकवण्याचा तिला अनुभव होता. पुढील शिक्षण व प्रशिक्षण घेण्यास तिने लेखी नकार दिला होता व फक्त प्रार्थमीक शाळेची शिक्षिका म्हणून काम करण्याची इच्छा तिने स्पष्ट केलेली होती. ज्या दोन जागा रिकाम्या होत्या त्या माध्यमिक शिक्षकांच्या होत्या.
 हेडमास्तर हा ताप कसा दूर करायचा ह्या विवंचनेत आता पडले ! आपल्या स्टाफचे व्यवस्थित सहकार्य मिळाल्या खेरीज ह्या झंझटीतून सुटका नसल्याचे त्यांना कळून चुकले.

मी !

 माझे वय जास्त नव्हते २१-२२ च्या आसपासचा मी, गाव भर फिरायचे काही काम न धंदा, वेळ मिळालाच तर शिक्षा मंदिरामध्ये पाय ठेवायचे नाहीतर सदा सर्वदा तात्याच्या अल्पोहारगृहावर अड्डा. रोजचे कधी प्रेमाने नाहीतर वाकड्या बोटाने तुप काढावे तसे तात्या आमची उधारी काढायचा पण चालायचेच त्याचा देखील धंदा आहे. दुपार नंतर दुधाळीवर क्रिकेट (चेंडूफळी) खेळायला हजर. संध्याकाळी मित्रांबरोबर महाद्वार रोडला. रोजची डोसणे (सोमरस) आता हा प्रश्न विचारु नका की कमवत तर काही नव्हता तर पित कुठून होता.. अहो ! मधमाशीला सांगावे लागते का मध कोठे मिळेल. आमचे ही तसेच बरोबर रोज संध्याकाळी एक बकरा हुडकायचा व कापायचा, दोन चारदा तो कापला गेला की आपल्याआपच तो आमच्या वाटेलाच काय पेठेत देखील यायचा नाही.

चिमुकली शाळा!

या आधी पत्रमैत्रिण १ व २..
शेकोटीच्या साक्षीने वाफाळत्या कॉफीबरोबर रंगणाऱ्या गप्पांमध्ये स्टेफीच्या शाळेचा विषय निघाला.ती तेव्हा एका चर्चच्या प्राथमिक शाळेत शिक्षिकेचे काम करीत होती.तिच्या वर्णनांवरून आमची उत्सुकता वाढायला लागली‌‌. सकाळी आधी शाळा पहायची आणि मग इतर असं ठरवूनच आम्ही झोपलो.
चर्चच्याच आवारात ही शाळा आहे.(पण आवारच केवढे मोठ्ठे आहे!शाळा आणि चर्च यांच्या मध्ये मोठ्ठे पटांगण आहे त्यात ठाण्यामुंबईतली एक शाळा+मैदान(!) सहज मावेल.)चिमणी पाखरे वगैरे पूर्वप्राथमिक शाळा म्हणजे केवळ मोठी पाळणाघरेच आहेत असा विचार या शाळेच्या दाराशीच तरळून गेला.
मेपल्स,पाइन आणि मयुरपंखींच्या कुशीत एक छोटीशी इमारत दडली होती,तीच ही शाळा! आत जाताच दिसतात ती मोठ्या काचेच्या दारावर काढलेली हत्ती, टेडी बेअर,बदक अशा प्राण्यांची रंगीत चित्रे,थोडं पुढे गेलं की दिसते एक मोठे साधारण १.५ ते २ फीट खोलीचे रिंगण,पूर्णपणे रंगीत चेंडूंनी भरलेले!रिंगणभर  रबरी(सॉफ्ट) रंगीबेरंगी चेंडू. मुलांना तिथे उड्या मारायला,खेळायला,लोळायला मुक्त परवानगी.पडलं तरी लागू नये,खरचटू नये यासाठीची ही सोय!त्याच्यापलीकडे झोपाळे,घसरगुंड्या सी-सॉ सारखे खेळ.प्रत्येक ठिकाणी खाली चांगली फूट-दीडफूट वाळू,कारण परत तेच..खरचटू नये,लागू नये!मेप्पनला थंडी फार,हिवाळा कडक!त्यामुळे मुलांना खेळताना लागू नये साठी जास्त काळजी घेतलेली जाणवली.
उजवीकडच्या पॅसेजमध्ये छोट्या,छोट्या बुटक्या मांडण्या,प्रत्येक खणात एकेक खुंटी, त्यावर आपापली पिशवी अडकवायची आणि खणात बागेत खेळायचे बूट ठेवायचे आणि साधे बूट घालून आपापल्या वर्गात जायचे.आपलीच जागा बरोबर कळावी म्हणून प्रत्येक खणावर ससा,माऊ,हत्ती,गुलाब,ट्यूलिप अशी वेगवेगळी चित्रे, हवे ते चित्र निवडायचे आणि मग नेहमी आपल्या वस्तू त्याच ठिकाणी ठेवायच्या. अजून लिहावाचायलाही न शिकलेल्या चिमुरड्यांचा चित्रांच्या माध्यमातून शिकायचा श्रीगणेशा होतो.
दुसऱ्या बाजूच्या पॅसेजमध्ये प्रसाधनगृह. अगदी खालच्या पातळीवर,दोन फूट उंचीवर बांधलेली सुंदर रंगसंगती साधलेली १०,१२ वॉशबेसिन्स आणि त्याशेजारी  तोंड पुसण्यासाठी अडकवलेले रंगीत,आकर्षक नॅपकिन.(लग्नाच्या कार्यालयात असते तशी एकच लांबलचक ओळ नाही!)आतल्या बाजूला अगदी छोट्या मापाची आणि खालच्या पातळीवर बांधलेली कमोड्स.पूर्वप्राथमिक शाळेत 'टॉयलेट ट्रेनिंग' देणे महत्त्वाचे समजले जाते असे स्टेफी सांगत होती आणि डोळे विस्फारून  आम्ही पाहत आणि ऐकत होतो.
वर्गात शिरलो तर बाकडी,फळा,खडू.. काहीच दिसेना!तीन चार चिमुकली गोल,चौकोनी टेबले,त्यांच्याभोवती तशाच  ४,६ खुर्च्या.एका कोपऱ्यात चक्क मिनीकुकिंगरेंज होती.थोड्या मोठ्या म्हणजे २री,३री तल्या मुलांना सँडविच सारखे सोपे पदार्थ करायला शिकवतात,अंडी,बटाटे उकडणे याच्या पुढची पायरी!मुख्य हेतू 'ही शेगडी हाताळायची कशी'? हे शिकणे!एका भिंतीच्या खालच्या भागाला काळा रंग देऊन फळा केला होता आणि त्यावर रंगीत खडूंनी मुलांनी मनसोक्त चित्रे काढली होती. पण काळ्या रंगाच्या बाहेरची भिंत मात्र स्वच्छ होती!'फक्त काळा रंग आहे तेवढ्याच भागात चित्रे काढायची' ही सूचना मुलांना बरोबर समजली होती.आणि एका कोपऱ्यात होतं छोटंसं लाकडी घर, त्यात चिमुकल्या गाद्या घालून ठेवलेल्या,हत्ती,बदक,कोंबडीच्या आकारांच्या मऊ,मऊ उशा; आत सुळसुळीत पडदे सोडलेले,छताला चमचमणाऱ्या चांदण्या आणि चांदोमामा(इथली मुलं पण 'चांदोमामा' म्हणतात का? असा चुकार विचार आलाच मनात!)गोष्टींची,चित्रांची पुस्तकं पण तिथे एका छोट्या मांडणीत रचलेली.. इकडे वर्ग चालू असताना कंटाळा,झोप आली तर त्या घरात जाऊन झोपायचे म्हणे! हेवा वाटला हो क्षणभर त्या बछड्यांचा!
हा वर्ग कसला? हा तर पऱ्यांच्या गोष्टीतला महालच दिसत होता.
एका कोपऱ्यात ७ पायऱ्यांचा दुहेरी जिना‌. सगळ्या पायऱ्यांना एकेक वाराचे नाव दिलेले,कठड्याला वेगवेगळ्या रंगांच्या १ पासून १२ पर्यंत मणी असलेल्या माळा बांधलेल्या!प्रत्येकाने आपापला फोटो ज्या महिन्यात आपला वाढदिवस आहे त्या माळेच्या खाली लावायचा.वार आणि महिने शिकण्याची ही घोकंपट्टीपेक्षा किती छान पद्धत आहे.
"हं ,म्हणा आठवड्याचे वार .. साऽऽत.. सोऽऽमवार,मंगळऽवार.."असं लहानपणीचं दृष्यच आलं एकदम डोळ्यापुढे!अर्थात इथे वर्गात मुलांची संख्या १५ च्या वर झाली की अजून एक सहाय्यक जोडीला देतात आणि २५ च्या वर वर्गाची पटसंख्या करायचीच नाही असा नियम!कमीत कमी ६० आणि जास्तीत जास्त.. असे आपले वर्ग डोळ्यासमोर आले आणि तफावत फारच जाणवली.ते विचार तिथे वर्गातच सोडून आम्ही पुढच्या दालनात गेलो.

तेजस्विनी-२

                        ~तेजस्विनी भाग २~


"त्यात ठरवायचं काय ? संतोषभाऊंनीच अध्यक्षपदासाठी प्रयत्न करावा. देसाई दरवेळी उगीचच पिल्लू सोडतात" सुरेखाताईंचे मत कपडे बदलता बदलता राजाभाऊ शांतपणे ऐकत होते.
"नाही, ते जर परिषदांच्या निवडणुकांना उभे राहिले तर नक्कीच निवडून येतील पण सरकारच्या अधिनियमामुळे त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले किंवा मिळाले नाही तर तो त्यांचा अपमान होईल." राजाभाऊ उत्तरले.
" तुमचे उगीच काहीही, त्यात काय इतका मोठा अपमान होणार ? असले तर पद स्वीकारावे, नाही तर दुसऱ्या पदाकडे वळावे माणसाने....." सुरेखाताई व राजाभाऊंचा संवाद सुरू होता.
राजाभाऊ कधीही पत्नीला 'तुला काय कळतंय' ह्या अर्थाने हिणवत नसत. स्वतः:ची मते तिने मांडावीत ह्यासाठी ते आग्रही असत.
"मग त्यापेक्षा दुसऱ्या पदाकडेच सुरुवातीपासून का लक्ष देऊ नये ?' राजाभाऊंच्या प्रश्नाचे उत्तर सुरेखाताईंकडे नव्हते.
" जाऊ द्या, मला झोप येतेय...." असं बोलत, त्या वैशालीला कुशीत घेऊन झोपण्याची तयारी करू लागल्या.