लेखन वाचण्यापूर्वी एक (अति)आगाऊ सूचना - प्रस्तुत लेखन हे लेखकाच्या परदेशी वास्तव्यातील बहुरंगी बहुढंगी (हे म्हणजे लिहिताना आपलं जरा छान छान वाटायला!) अनुभवांचे चित्रण असल्याने, तसेच त्यातील सुखदु:ख केवळ लेखकालाच ठाऊक असल्याने, मनोगतावरील संस्कृतीरक्षक, संस्कृतीभक्षक, व्याकरणतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ आणि इतर अनेक विषयांतील तज्ज्ञांनी या लेखनाच्या विश्लेषणाआधी याकडे केवळ एक लेख म्हणून न पाहता, सलग बत्तीस तासांचं अपरिहार्य जागरण आणि त्यानंतरची तितकीच अपरिहार्य झालेली सलग सतरा तासांची झोप यांचा उद्वेगजन्य परिपाक म्हणून पाहिल्यास लेखनाचा निखळ आनंद (निदान लेखकाला तरी!) लुटता येईल.