महाजालावर वावरण्यासाठी थोडे फार महाजालावरच्या भाषेची गरज भासते, हा विचार करूनच मी येथे थोड्या थोड्या विभागामध्ये महाजालाची माहिती शब्द बद्ध करीत आहे.
प्रथम भाग :
I.P. No. तुम्ही तुमच्या संगणकावर अथवा महाजालावर वावरताना खूप वेळा हा शब्द वाचला असेल. I.P. No. म्हणजे एखाद्या संगणकासाठी महाजालावरची एक ओळख-पत्राचे काम करणारा नंबर हा थोड्या फार फरकाने असा असतो उदा. १२८.०.०.१. जेव्हा संगणक महाजालाशी जोडणी करतो तेंव्हा तुमच्या संगणकासाठी एक I.P. No. तयार होतो व त्या संबंधी माहिती ही सेवादात्याच्या मुख्य संगणकावर सुरक्षित होते.