आपली भारतीय संस्कृती - पुरूषप्रधान की स्त्रीप्रधान ?

नमस्कार,


मी ययाती, रामायणाचा किंवा महाभारताचा विचार करतो तेंव्हा मला असे वाटते की या युद्धांना बऱ्याच बाबतीत स्त्रियांच्या अभिलाषा कारणीभूत होत्या. त्यावरून मला असे कळते की त्याकाळात स्त्रियांना किती अधिक महत्त्व होते किंवा तो समाज किती 'स्त्रीप्रधान' होता. (जगप्रसिद्ध 'ट्रॉय' युद्धाला देखील एक स्त्री कारणीभूत होती.)


पण त्याचवेळेस 'मनुस्मृती'सारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये असे लिहिले गेले की स्त्रियांना नेहमी पुरुषाच्या वचकाखाली ठेवावे. 'मुक्त स्त्री' ही समाजाला घातक आहे. ही विधाने (अर्थात ऐकलेली) त्याकाळील 'पुरूषप्रधान' संस्कृतीचा पुरावा देतात.


मग आपली संस्कृती नक्की काय आहे - पुरूषप्रधान की स्त्रीप्रधान ?


- मोरू