धक्का!

निदान! 
भर रस्त्यात चार चाकी चालवताना, 
सोबत सगळे कुटुंब असताना..
काळे डाग क्षणभर दिसून नाहीस होऊ लागले! 
wiper केला सुरू पण क्षणार्धात जाणवले की दोष दृष्टीचा आहे! 
आजवर 
दुखावलेले स्नायू, 
अपघाताने मोडलेली हाडे, 
तडकलेल्या टाचा,
आंधळ्या झालेल्या जखमा, 
मधून अधून येणारी डोकेदुखी,
अचानक कमी झालेले प्लेटलेट्स..

माझी गाडी आणि मूर्तिपुजा!

मूर्तिपूजा आणि माझी गाडी!
मला मारुती ८०० मिळाली होती जुन्या कंपनीकडून भेट म्हणून! पहिली गाडी, ती सुद्धा अशी कामाच्या पावती स्वरूपात मिळालेली!
काही कारणांमुळे ती माझ्या नावावर नाही होऊ शकली म्हणून मग परत केली काल! मलाही  नकळत ओले झालेले डोळे पुसत अजागळपणे ती सुपूर्त करून सटकलो तिथून!

स्थळ, काळ आणि अंतर

सकाळची न्याहारी संपवल्यावर मी श्री रमणाश्रमातल्या पुस्तकांच्या दुकानातून रमण महर्षींचे एक छायाचित्र विकत घेतले. महर्षींच्या स्वत:च्या हातून ते आपल्याला मिळावे अशी माझी ईच्छा होती. ते छायाचित्र हातात घेऊन मी दिवाणखान्यात गेलो तेव्हा महर्षी जागे असलेले बघून मी त्यांना मनोभावे दंडवत घातले. त्या वेळी दिवाणखान्यात जवळजवळ शुकशुकाटच होता. माझ्यासाठी हे थोडे विस्मयकारकच होते. मी महर्षींना सांगितले की त्यांचे एक छायाचित्र मी विकत घेतले आहे आणि त्यांच्याच हातून ते मिळावे अशी माझी ईच्छा आहे. एवढे बोलून मी छायाचित्र त्यांच्याकडे सुपूर्त केले.

श्रद्धा आणि गंतव्य

एके दिवशी रमण महर्षिंच्या भेटीला आलेल्या एका आगंतुकाने आपली व्यथा बोलून दाखवली: "स्वामी, मी आपल्या भेटीला वारंवार येत असतो, कारण मला अशी आशा वाटते की आपली भेट घेत राहिल्याने असे काहीतरी घडेल की माझ्यात बदल होईल. आजमितीला तरी माझ्यात कुठलाही बदल झालेला आहे असे मला दिसत नाही. मी जसा होतो तसाच आहे: एक दुर्बळ आणि स्खलनशील माणूस, ज्याची जित्याची खोड काही केल्या जात नाही असा एक महापातकी" असे बोलून तो दीनवाणे होउन घळघळा रडायला लागला.

अहोभाव

महान संत भगवान रमण महर्षी यांच्या जीवनातली ही एक घटना आहे. एकदा रमणाश्रमाच्या परिसरात फिरता फिरता महर्षी स्वयंपाकघराजवळ पोचले. स्वयंपाकघराजवळच्या मैदानावर त्यांना मूठभर तांदुळ सांडलेले दिसले. त्यांनी लगेच काळजीपूर्वक तांदळाचे एक एक शित गोळा करायला सुरूवात केली. महर्षींना असे एक एक कण तांदुळ वेचताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या शिष्यांना नवल वाटले आणि बघता बघता एक एक करून बरेच शिष्य त्या ठिकाणी गोळा झाले.

निष्काम कर्म

श्री. रंगाचारी हे वेल्लोरच्या एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. तेलगू भाषेचे गाढे पंडितही होते. त्यांनी एकदा रमण महर्षींना 'निष्काम कर्म' या संकल्पनेचा अर्थ विचारला. महर्षींनी लगेच कुठलेही उत्तर दिले नाही. थोड्या वेळानी महर्षी अरूणाचल पर्वतावर रोजच्या परिक्रमेसाठी निघाले. त्यांच्या मागोमाग शिष्यवर्गही निघाला, ज्यात पंडितजीही सामील झाले.