हातांची स्वच्छता आणि सॅनिटायझरचा वापर

सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विज्ञानकेंद्र या माहितीस्थळावरून प्रसिद्ध झालेला हा लेख विज्ञानकेंद्राच्या संमतीने इथे देत आहे.

हँड सॅनिटायझर कधी, कशासाठी ?

आपण मुख्यतः हाताने इकडेतिकडे स्पर्श करतो, म्हणून जो काही जंतूंचा संसर्ग झालेला असतो, तो धुवून टाकावा. त्यातील जंतू मारून टाकता आले तर उत्तमच. नुसत्या पाण्याने हात धुवून तो जंतू हातावरून जाईल, पण खात्रीने नव्हे. शिवाय तो बेसिनच्या भांड्यावर किंवा बाथरूमच्या फरशीवर जर राहीला तर धोका शिल्लक राहीलच.

करोनाः काही प्रश्नोत्तरे

सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विज्ञानकेंद्र या माहितीस्थळावरून प्रसिद्ध झालेला हा लेख विज्ञानकेंद्राच्या आणि लेखक प्रसाद मेहेंदळे यांच्या संमतीने इथे देत आहे.
मा. प्रशासक, इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेले लेखन इथे पुनर्प्रसिद्ध करण्याचे नियम याआड येऊ नये असे वाटते. तरीही योग्य तो निर्णय आपण घ्यालच.
एरवीही मनोगतींनी विज्ञानकेंद्राच्या उपक्रमांची माहिती घ्यावी अशी इच्छा आहेच.

करोना विषाणु संबंधी काही प्रश्नोत्तरे पुढे दिली आहेत. योग्य कृती करण्यास ती बोधप्रद ठरतील अशी आशा आहे.

करोना विषाणू

सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विज्ञानकेंद्र या माहितीस्थळावरून प्रसिद्ध झालेला हा लेख विज्ञानकेंद्राच्या आणि लेखक जयंत गाडगीळ यांच्या संमतीने इथे देत आहे. तिथले या विषयावरचे इतरही लेख इथे लौकरच देण्याचा मनोदय आहे.

मा. प्रशासक, इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेले लेखन इथे पुनर्प्रसिद्ध करण्याचे नियम याआड येऊ नये असे वाटते. तरीही योग्य तो निर्णय आपण घ्यालच.

एरवीही मनोगतींनी विज्ञानकेंद्राच्या उपक्रमांची माहिती घ्यावी अशी इच्छा आहेच.

डुप्लिकेट किल्ली!

"किल्ल्या हरवणे" 
मला यथेच्छ बोलायला 
घरच्यांना जणू कमीच विषय होते 
म्हणून परमेश्वराने मला दिलेला हा अजून एक व्यक्तिमत्त्व गुणधर्म!
हल्ली आणि ती लॅच नावाची नवी भानगड अजूनच अवघड आहे! 
खड्डे खड्डे असलेली चावी,
कुलुपात कोणतीही बाजू 
वर किंवा खाली 
ठेवून घातली 
तरी ते उघडते! 

लवचिक तत्त्वे?

लवचिक तत्त्वे?
"काय तत्त्व तत्त्व लावलं आहेस रे मघापासून! 
तत्त्वांमागे फक्त ती षंढ लोकं लपतात ज्यांना कायम हवे ते केले असता होणाऱ्या परिणामांची भीती असते!"
ऍडव्होकेट जयराज सूर्यवंशी यांनी एक मोठा घोट घेत अबोला सोडला!
पुढचा घोट आत ढकलून, ते पुढे बोलते झाले
"योग्यायोग्य, नीती-अनीती हे सगळे आपापल्या वैयक्तिक दृष्टिकोनावर अवलंबून असतं. 
चांगलं वाईटाच्या रेषा आपण आपले ठरवतो."

अस्मिता आणि असहिष्णुता

               नुकताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठी भाषादिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व शाळातून मरठी विषय आवश्याक करण्याचा आदेश दिला आहे.खरे तर शिवसेनेची स्थापनाच मराठी या मुद्द्यावर झाली होती आणि माननीय बाळासाहेबांच्या काळातही मराठी भाषेत फलक लावण्यासाठी बऱ्याच फलकांची मोडतोडही झाली होती. तरीही अजून पुण्यासारख्या अस्सल मराठी शहरातही दुकानावरच नव्हे तर अगदी मराठी माणसाच्या घरावरील नावेही इंग्रजीतच असलेली आढळतात ही वस्तुस्थिती.

पिठाची गिरणी

पिठाच्या गिरणीत जाऊन आता जमाना झाला आहे. आज का कोण जाणे पण मला
गिरणीची आठवण झाली. आईकडे जी गिरणी होती ती थोडी लांब होती. एखादे दळण असेल
तर आई एकटीच जायची. पण २ ते ३ दळणे असतील तर आम्ही दोघी बहिणी आईबरोबर
जायचो. दळणं टाकून परत घरी यायचो. दळण टाकताना किती वेळ लागेल असे विचारावे
लागे. मग दळणवाला जितका वेळ सांगेल त्याप्रमाणे परत जावे लागे. त्या
पीठच गिरणीत सर्वत्र पीठ पसरलेले असायचे. गिरणी मध्ये दळणे टाकणारा तर
पिठामध्ये पार बुडून जाई. त्याच्या मिशा, डोळ्याच्या पापण्यांवरील केस पण
पांढरे होत. तिथे जो दळणवाला होता त्याचे कपडे नेहमी पिठासारखेच पांढरे
शुभ्र असायचे.

गोळी कशी गिळू मी ?

   प्रत्येक शास्त्रात गेल्या काही शतकातच अतिशय नेत्रदीपक प्रगति झाली आहे.संगणकामुळे तर काही प्रकारचे काम करण्याच्या पद्धति इतक्या बदलल्या आहेत की पूर्वीचे कारखाने ,कार्यालये जशी दिसत तशी आता मुळीच दिसत नाहीत.वैद्यकशास्त्रातही प्रशंसनीय प्रगति झाली असली आणि दवाखाना या संस्थेचे स्वरूप मात्र  बदलले तरी त्यातील सुटसुटीतपणा जाऊन त्याला अधिकच गुंतागुंतीचे स्वरुप आले आहे.  आमच्या लहानपणी गावातला दवाखाना घरापासून फार दूर नव्ह्ता तरी क्षुल्लक दुखण्यासाठी तेथपर्यंत जाण्याचेही कष्ट न घेता घरात आज्जी किंवा आणखी कॉणी वडिलधारे माणूस कसला तरी पाला किंवा चाटण यांचा प्रयोग आमच्याव

समानता

समानता

अनेक सामाजिक दंभांचे बिरुद मिरवता मिरवता मेटाकुटीला येणाऱ्या माझ्या अतिसामान्य जीवाला सगळ्यात जास्त धास्ती आहे ती समानतेच्या सामाजिक दंभाची!