ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग - ५ (अंतिम भाग)

१८ जुलै २०२०.  आज सकाळी बरोबर दहा वाजता जागतिक आरोग्य संघटनेच्या टेलिकॉन्फरन्स रुम मध्ये पुन्हा एकदा डॉक्टर लक्ष्मी आल्या होत्या.  टीव्हीवरच्या वेगवेगळ्या खिडक्यांमध्ये वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी पुन्हा एकदा जमा झाले होते.

"गुड मॉर्निंग. " नेहेमी प्रमाणेच डॉक्टर लक्ष्मींनी बोलायला सुरुवात केली. "आपल्या सगळ्यांचं जागतिक आरोग्य संघटनेच्या टेलिकॉन्फरन्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत.  आजची आपली ही सभा थोड्याच वेळाची आहे.  चीननं मुद्दाम निमंत्रण दिल्यावरून आजची ही बैठक बोलावली आहे. मी चीनचे डॉक्टर जियांग शिझेनना मायक्रोफोनवर यायची विनंती करते.  धन्यवाद."

ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग - ४

६ जुलै २०२०.  बरोबर सकाळी १० वाजता डॉक्टर लक्ष्मींनी मायक्रोफोनमध्ये बोलायला सुरुवात केली.

निवडक अ-पुलं

नमस्कार! 'निवडक अ-पुलं' हे माझं पुस्तक अलीकडेच प्रसिद्ध झालं! 
या माझ्या पुस्तकात 'मनोगत' आणि अर्थात 'मनोगतीं'चा मोठा सहभाग आहे. आपणां सर्वांचे मनः पूर्वक आभार! 
'निवडक अ-पुलं' कागदविरहित ('इ-बुक') या स्वरूपात 'ऍमेझॉन' वर उपलब्ध आहे आणि कुठल्याही 'हुशार भ्रमणध्वनी' (स्मार्ट फोन') वर ते आपण वाचू शकता. 'किंडल' हे माध्यम ('ऍप') वापरून. 'किंडल अनलिमिटेड' चे आपण जर सदस्य असाल तर ते आपणांस विनामूल्यही मिळू शकेल.
पुस्तकाविषयी थोडं -

ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग - ३

सामुद्रीय जीवशास्त्रज्ञ सिल्व्हिया अर्लनि काही मोजक्याच पत्रकारांना तातडीनं घरी बोलावलं. 

सिल्व्हिया अर्ल.  वय वर्षे ८५.  सामुद्रीय जीवशास्त्रातल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या शास्त्रज्ञ, लेखिका आणि वक्त्या.  २५ - ३० राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय पुरस्कार आणि शंभरच्यावर प्रकशित साहित्य त्यांच्या नावावर जमा होतं. 

ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग - २

बरोबर सकाळी दहा वाजता टेलिकॉन्फरन्स पुन्हा सुरू झाली.  सगळे सभासद टीव्हीच्या पडद्यावर हजर झालेलेच होते. 

ग्रिफित्शिया अर्थात लाल शेवाळाची कथा; भाग - १

(मित्रहो माझी मराठीतली एक नवीन लघु कथा आजपासून इथे टाकत आहे.  अर्थात लघु म्हटली तरीही ही बऱ्यापैकी दीर्घ आहे, त्यामुळे ती पाच भागांमध्ये विभागून टाकत आहे.  कथा आवडली, नाही आवडली किंवा तुमचा जो काय अभिप्राय असेल तो जरुर सांगा.  आणखी एक म्हणजे, मला मराठी टंकलेखनाची फारशी सवय नसल्यामुळे, यात शुद्धलेखनाच्या काही चुका राहिल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्याबद्दल आधीच क्षमस्व.

ऋणं कृत्वा --- !

        चार्वाकाचे सर्वात सुप्रसिद्ध वाक्य म्हणजे " ऋणं कृत्वा घृतं पिबेत् "  ज्यामुळे तो जास्त प्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध आहे. या वाक्यामुळे चार्वाक खरे तर महान अर्थशास्त्रज्ञ समजला जायला हवा.कारण ज्या भारतात चार्वाक जन्मला त्या भारतातच नव्हे तर जवळजवळ सर्वच देशांचा अर्थव्यवहार "ऋणं कृत्वाच चालला आहे.शिवाय आपल्यावर ऋणाचा भार असूनही आपण इतर देशांना अगदी रशियासारख्या-- सुद्धा ऋण द्यायला कचरत नाही. आणि त्यात कसा आपलाच फायदा आहे हे पटवणारेही अर्थशास्त्रज्ञही आहेत.किंग फिशर चे मल्ल्या,वगैरेनी हे आपले ब्रीदवाक्यच मानले आहे.

आईची नथ

         एक मंगळसूत्र --तेही दोन सोन्याच्या वाट्या व बाकी काळे मणी असेच --- सोडले तर दुसरा एकच दागिना लहानपणापासून आईच्या अंगावर मला पाहायला मिळाला. तो म्हणजे तिच्या कानातल्या कुड्या. आईचं माहेर कुबेर ! आणि नुसत्या आडनावानेच नाही तर खरोखरीचेच कुबेराचे वैभव तिच्या घरी नांदत होते ! जमीन जुमला भरपूर होता. पण तिच्या लहानपणीच तिचे आई वडील तिला सोडून गेले आणि आई , तिची एक मोठी बहीण आणि मोठा भाऊ या तीन अपत्यांचा सांभाळ तिच्या म्हाताऱ्या आजीलाच करावा लागला. कारण आजोबा तर अगोदरच जग सोडून गेले होते.  
     .

अवघड काळात निर्णय कसा घ्यावा? कर्ण व श्रीकृष्ण संवाद

हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे.

महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले -

"माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?"

"मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आले नाही.
याच्या उलट, मी कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असल्याचे कळल्यावर, परशुरामांनी मला शाप दिला. म्हणे "त्यांनी मला जे काही शिकवलं, ते मला आयत्या वेळेला आठवणार नाही."

"एकदा एका गायीला चुकून माझा बाण लागला. खरंतर त्यात माझा काहीच दोष नव्हता. पण तरीही त्या गाईच्या धन्याचा शाप मला झेलायला लागलाच."