स्त्रियांना मंदिर प्रवेश निषिद्धः एक नवी फॅशन

आजच लोकसत्तामध्ये एक लेख वाचला. त्यानुसार अलिकडच्या काळात बऱ्याच मंदिरातून स्त्रियांना प्रवेश नाकारला गेला. सध्या केरळमधील एका अभिनेत्रीने अशा मंदिरात प्रवेश केल्याची बातमी गाजते आहे. लोकसत्ताच्या त्या लेखात पुरीच्या मंदिरात इंदिरा गांधींनाही त्यांच्या आंतरजातीय विवाहामुळे प्रवेश नाकारल्याचा संदर्भ आला आहे. या सर्व घटनांमागील कारण मीमांसा काय असावी? माझे एक मत देऊन मनोगतींची मते अपेक्षित आहे.

चित्र कसे दिसेल

नमस्कार,


'ऐकावे ते नवलच ' मध्ये चित्राच्या लिंक न दिसता पूर्ण चित्र पानावरच उघडले तर स्पष्टिकरण व माहितीसाठी अधिक सोयीचे होईल. 


मनोगताच्या पानावर चित्र दिसावे ह्यासाठी काय करावे लागेल?


स्कॅन करून येथे काही आकृत्या देता येतील का? त्याला साठयाच्या काही मर्यादा आहेत का( १ M  चालेल का?)

सल (भाग-१)

मनोगतावर चाललेल्या प्रेमाच्या आणि लग्नाच्या चर्चा आणि १७६० कविता (मोजणी कमी भरल्यास क्षमस्व!) यावरुन मनात नेहमी घोटाळणारी एक सत्यकथा माझ्या अनुदिनीवरुन उचलून येथे देत आहे. कथेत नाविन्य नाही पण आयुष्यातला एक न विसरता येण्याजोगा अनुभव आहे.

हरवलेलेसे काही - भाग ४

तुझ्या भरवशाला पूर्ण करू शकलो नाही या अपराधी भावनेने मला जबरदस्त दुःखी करून सोडलं होतं. प्रत्येक क्षणी माझ्या मनात एकच विचार असायचा की मी तुझा भरोसा तोडला पीहू.. ! ज्या त्रासातून आणि वेदनांमधून तुला जावं लागलं असेल त्याचा विचारही करणं मला असह्य होत होतं.

हरवलेलेसे काही - भाग ३

नील हसत,"काय राणीसाहेब, कशात गुंग आहात एवढ्या? मी तर समीरचं प्रदर्शन बघूनही आलो. पीहू.. खरंच सांगतो तुला.. तू यायलाच हवं होतंस.. इतके सुंदर चित्रं होती की मी तुला काय सांगू ! मी भेटलो समीरला, जरा विचित्रच माणूस वाटला मला. माहीतेय का तुला? ही आसामी आधी एका मोठ्या कंपनीत कामाला होती पण मग अचानक ती सोडून चित्रकार झाली. त्याने अजून लग्नही नाही केलेलं ! लोक म्हणतात की कोणावर तरी मनापासून प्रेम करत होते पण तिला मिळवू शकला नाही.

हरवलेलेसे काही - भाग २

समीर माझा हात आपल्या हातात घेऊन म्हणाला,"येईन.. नक्की येईन, पण त्या दिवशी ज्या दिवशी मी काहितरी बनेन. माझ्या पायावर उभा असेन. प्लिज पीहू, मला थोडास्सा वेळ दे."
मलाही त्याचं बोलणं पटलं त्यामुळे मी होकार दिला. या गोष्टीला सहा महिने होऊन गेले पण त्याला नोकरी मिळाली नाही.