गेल्या पावसाळ्यातील पावसाच्या रौद्र-भीषण तांडवामुळे पावसातली गंमत,रोमांच व मजा हरवून गेली आहे व केवळ कटु आठवणी उरल्या आहेत की काय असे वाटते आहे.गेला पावसाळा 'एक वाईट स्वप्न' म्हणून विसरून जाऊ व येण्याऱ्या पावसाचे स्वागत करण्यास सिध्द होऊ या! मराठी साहित्यात पावसाची काही वर्णने माझ्या वाचनात आली आहेत.त्यापैकी (खाली दिलेले) व्यंकटेश माडगूळकरांच्या 'बनगरवाडी'तील पावसाचे वर्णन हे वाचावे असे आहे. या वर्णनाचा बाज, भाषा,खेड्यातले वातावरण अस्सल मराठी मातीतले आहे. इतर 'मनोगतीं'नींही अशी पावसाची वर्णने आढळल्यास जरूर 'मनोगत'वर द्यावीत.
मुंबईतल्या पारशांचे शौक तीन. घोलवड-डहाणु-बोर्डी येथे चिक्कूंची बाग, कुत्रा किंवा मोटार! आधीच बावाजी, त्यात मोटारीतला किडा, मग काय विचारता! माझे भाग्य थोर म्हणून असा एक अफलातून बावाजी मला लाभला आहे. पेसी साहेब. अगदी अस्सल खानदानी बावाजी. पाच बगीच्यात घर, मुलगा परदेशी, गाडीचे वेड वर थोडासा सटकीलपणा अश्या खानदानी मुंबईकर पारशाच्या सर्व लक्षणांनी युक्त असे पेसी साहेब.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.