या ना त्या कारणाने मृत्यू हा विषय ' मनोगत' वर घोटाळत आहे.
चित्रपटातले मृत्यू हा एक मनोरंजक विषय आहे. मला आवडलेले चित्रपटातील काही मृत्यूः
१.'आनंद' - स्वतः मृत्यूच्या दारात असताना इतरांना जगायला शिकवणारा आनंद. नकळत त्याच्यात गुंतत गेलेला बाबूमोशाय. आपला मृत्यू बाबूमोशाय सहन करू शकणार नाही म्हणून आयुष्याची भीक मागणारा आनंद. तर्क विसरून काही 'मिरॅकल' घडेल म्हणून वेड्यासारखी धावपळ करणारा बाबूमोशाय. हताश, असहाय डॉ. प्रकाश कुलकर्णी. गरगर फिरणारी टेप. 'बाबूमोशाय....' आनंदची शेवटची आर्त हाक. आनंदच्या मृत शरीरावर पडून गदगदून रडणारा बाबूमोशाय....