खरे तर हा विषय फार चघळल्या गेला आहे. परत मी हा विषय सुरू केला, काही मंडळींना ते कदाचित रुचणार नाही. निरपेक्ष आणि हेल्दी चर्चा व्हावी असा माझा प्रामाणिक हेतू आहे. अनेक विचारप्रवाह वाचताना कधी-कधी गोंधळल्यासारखे होते. अशा चर्चांमधुन त्याची उत्तरे मिळावीत/ मिळतील अशी आशा असते. म्हणून हा चर्चाप्रस्ताव पटलावर ठेवण्याचा हा मनोदय. एकमेकांना सहकार्य करत या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करू या. मागील चर्चेच्या संयोजकांचे आभार मानून या दुसऱ्या भागासाठी आपल्या सहभागाची विनंती करतो.
हल्ली देशांतर, देशाभिमान, आरक्षण अशा अनेक विषयांवरच्या चर्चांमधून "देशसेवा" हा विषय कधी निसटतेपणी तर कधी रोखठोकपणे ऐरणीवर येत आहे. त्यातून विचार आला की पाच हजारांच्या आसपास संख्या असलेले मनोगती व्यक्तिशः देशासाठी काही करतात का आणि केलं तर काय काय करतात याचीच चर्चा केली तर? मला अशा चर्चेचे खालील फायदे वाटतातः
गेले काही दिवस सातत्याने एक (error) येते आहे की "सदस्य संख्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्याची". हे फक्त माझ्या बाबतीत घडतय की इतरांनाही चुणूक मिळत्ये?
याच कारण या संकेतस्थळाला पारितोषिक मिळाल्याने सदस्य संख्येत वाढ हे असावे का? आपली सदस्य मर्यादा काय आणि ती वाढवता येणे शक्य आहे का? या बाबत काही करणे शक्य आहे का? कारण एक दोन वेळा लिहिलेला मजकूर वाया गेला.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.